विषय «लैंगिकता»

स्त्री आणि पुरुष – शॉर्टफिल्म

स्त्री आणि पुरुष
स्त्री आणि पुरुष

स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात काही चुंबक (मॅग्नेट) नसतो. पण तरीही ते एकमेकांकडे कसे आकर्षित होतात?

स्त्री आणि पुरुष यांच्यातील याच निसर्गनिर्मित अनंत आकर्षणाची आणि मानवनिर्मित अथांग राजकारणाची गोष्ट विनोदी पद्धतीने सांगणारी ‘स्त्री आणि पुरुष’ ही अवघ्या दहा मिनिटांची शॉर्टफिल्म खालील लिंकवर विनामूल्य पहा.

https://www.mxplayer.in/movie/watch-stree-and-purush-short-film-movie-online-23b8f449f024f4dd9b22431ec250fa67

एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…

पुस्तक: एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…
लेखक: विजय पाष्टे

प्रकाशक: सिंधू शांताराम क्रिएशन्स

अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग आणि ‘एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…’ असं भलंमोठं, भडक, अंगावर येणारं नाव हा या कादंबरीचा प्रथम नजरेत भरणारा दोष! त्याकडे दुर्लक्ष करून ही कादंबरी वाचावी का? हरकत नाही, वाचू. पण त्यावर समीक्षा लिहायची? का नाही लिहायची? लेखन अशुद्ध आहे, प्रूफ रीडिंग गलथान आहे, नाव भडक आणि अंगावर येणारं आहे म्हणून काय झालं? लेखनातला आशय हा अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग, भडक आणि अंगावर येणारं नाव आहे म्हणून रद्दी समजायचा?

पुढे वाचा

पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था

माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नीक-एकपतिक पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बरेचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही.

यात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का? आपण अमुक गोष्ट करावी की करू नये? अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक?

पुढे वाचा

नव्या समजुतीची गरज

नवरा-बायको, आई-बाप, नातेवाईक व शेजारी मित्रांचे समूह ही नाती, वर्ग, धर्म व राज्य या संस्था आणि त्या सार्‍यांच्या जोडीला कायदा, परंपरा आणि नीतिनियमांची बंधने या सार्‍यांनी मिळून स्त्रीपुरुष संबंधाविषयीच्या आजच्या भूमिका घडविल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एवढ्या जीवनव्यापी आणि मजबूत की त्यांच्या वजनदार सर्वंकषतेने या संबंधातली वैयक्तिक कोवळीक पार चिरडून टाकली आहे.

सगळ्या विचारसरणी, मग त्या मनूच्या असोत नाहीतर मार्क्सच्या, माणसाच्या सहजसाध्य संबंधांना एका घट्ट चौकटीत ठामपणे फिट्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना अपरिहार्यपणे येणार्‍या अपयशासाठी विचारसरणीला दोषी न ठरवता माणसालाच दोषी ठरवून निकालात काढतात.

पुढे वाचा

ती बाई होती म्हणुनी….

इंग्लंडमधल्या विपश्यनाकेंद्रात एका जर्मन साधक-गुरूची गाठ पडली. त्यांच्याशी बोलताना ते असं म्हणाले, “कोणताही आध्यात्मिक विषय शाळांमध्ये आणताना आम्हांला खूप परवानग्यांना सामोरं जावं लागतं. कारण पुन्हा आम्हांला मूलतत्त्ववादाकडे जायचं नाही…कारण तुम्हांला माहीतच आहे…!” असं म्हणून ते खजील होऊन हसले. मला उगीचच अपराधी वाटलं… त्यांच्या अकारण अपराधी वाटण्याबद्दल…! खरं तर त्यांचा जन्मच हिटलरच्या अंतानंतर झालेला. कुठल्याही प्रकारे ते त्या अत्याचारी कालखंडाचे समर्थक असण्याची शक्यताच नव्हती. पण तरीही त्यांचा चेहरा अपराधी झाला. जणु काही ‘हिटलरच्या देशातला म्हणून माझी मान आता कायमच शरमेने खाली राहणार,’ असं त्यांना म्हणायचं होतं.

पुढे वाचा

शिक्षणात लैंगिकताशिक्षणाचा उतारा हवाच हवा

वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकताशिक्षण देणे. दुर्दैवाने ‘फाशी’, ‘नराधम’, ‘हिंसा’ वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो.

लैंगिकताशिक्षणाला नाव काहीही द्या. ‘जीवन शिक्षण’ म्हणा, ‘किशोरावस्था शिक्षण’ म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेटच्या जमान्यात पुढच्या पिढीपर्यंत, या बाबतीतली अत्यंत विपर्यस्त, चुकीची आणि चुकीच्या स्रोतांद्वारे पसरवली जाणारी माहिती सदासर्वदा पोहोचत असते. ती थोपवणे आता सरकार, पालक, शिक्षक, शाळा कोणालाच शक्य नाही. तेव्हा योग्य त्या वयात, योग्य त्या स्रोतांकडून, योग्य ती माहिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे, एवढेच आपण करू शकतो.

पुढे वाचा

बलात्कार प्रतिबंधार्थ – एक सूचना पण एकमेव नव्हे

काही वर्षांपूर्वी, वर्षाअखेरीस, जपानच्या टोकिओ शहरात, सुमारे आठवडाभरच्या सुट्टीमुळे, विनाकाम अडकून पडल्याने, आम्ही शहरात पायी भटकून त्या शहरातील बरीच ठिकाणे (गिंझा, अखियाबारा, आदि) नजरेखालून घातली आणि तेव्हा तेथून मिळविलेली माहिती नंतर आमच्या मित्रांना सांगता ते आश्चर्यचकित झाले. कारण त्यांनी तेथील काही विभाग आमच्याएवढे नजरेखालून घातलेच नव्हते. मुंबईकराने राणीचा बागही पाहू नये, अगदी तसाच हा प्रकार.

असेच भटकत असताना आम्ही त्या शहराच्या आडवळणांनाही स्पर्शून आलो आणि आता अडचणीत सापडतो की काय असे वाटून घाबरून परतलो. अशाच एका ठिकाणी लैंगिक समाधानाची साधने विक्रीस होती व आसपास संबंधित विषयांचे व्हिडीओ दाखविणारे अड्डेही खुल्लमखुल्ल्ला होते.

पुढे वाचा

जगण्याचे वियाग्रीकरण : जगाची नवी ओळख

“प्रिय आईबाबा आणि माझ्या बंधूंनो,

इथे फार कठीण दिवस आले आहेत, आणि मी जवळपास दर आठवड्याला तुम्हांला पत्र का लिहितोय, हे तुम्हांला समजत असेलच. आज मी तुम्हांला लिहीत आहे ते मुख्यतः आणखी काही पेर्वीटीन गोळ्यांसाठी…..”

तुमचा आवडता
हेन

तो दिवस होता ९ नोव्हेंबर १९३९. नाझीव्याप्त पोलंडमध्ये २२ वर्षांचा एक तरुण जर्मन सैनिक आपल्या आईवडिलांना पत्र लिहीत होता. २० मे १९४०ला त्याने पुन्हा आईवडिलांना लिहीले:

“रसद म्हणून तुम्ही आणखी काही पेर्वीटीन गोळ्या पाठवाल, अशी आशा वाटते.”

त्यानंतर १९ जुलै १९४० रोजी त्याने आणखी एक पत्र लिहिले,

“जर शक्य असेल तर आणखी काही पेर्वीटीनपाठवा, प्लीज.”

पुढे वाचा

चल कत्तली करूया

तुझं तू तिकडे अन् माझं मी इकडे
रोजचंच झालंय हे घुसमटणं
नको निभावूस दुनियादारी;
नाहीस तू अबला
अन् नाहीस रणरागिणी आणि दुर्गाही!
ह्या फसव्या शब्दावर फिरव तू हातोडा;
तू एक मुक्त जीव!
इथं रोजच तुझ्या पावित्र्याची घेतली जाईल अग्निपरीक्षा
कित्येक सीता ह्या अग्निकुंडात खपल्या
मर्यादा पुरुषाची जपत.
ठेवू नकोस आदर्श सावित्री, सीता अन् द्रौपदीचा.
नको देऊस संस्कृतीच्या गारद्यांपुढे तुझ्या भावनांचा बळी!
तू मुक्त हो, स्वाभिमानी हो!!
जिवंत ठेव तुझ्यातील ज्योतीची सावित्री!
मी नर अन् तू मादी
निसर्गाची हीच किमया !
जप रीत त्या निसर्गाची अन् दे झुगारून बंधने;
मी झुगारतो पुरुषपणाची कवचकुंडले!

पुढे वाचा

भारतीय पुरुष आणि लैंगिक सुखाचे व्यसन

भारतात ८०च्या दशकाच्या मध्यापर्यंततरी अश्लील व्हिडियो पाहता येणे सामान्य माणसांसाठी सहजसाध्य नव्हते. त्यामुळेच असेल कदाचित, पण ह्या काळात मराठी रंगभूमीवर कामुक, अश्लील नाटकांची लाटच आली होती. असल्या नाटकांमधे प्रत्यक्ष रंगमंचावर उन्मादक, हॉट, अश्लील दृश्ये दाखवली जातात असं ऐकायला मिळत होतं.
‘हिट अँड हॉट’ नाटके असं वर्णन वृत्तपत्रांमधून होत असे.

वय वर्षे पंधरा-सतरा ह्या वयोगटातील मित्रांचा आमचा गट होता. असल्या नाटकात कायकाय दाखवत असतील ह्याबद्दल चर्चा जवळपास रोजच रंगत होत्या. आमच्या गटातील एका मित्राला अशी नाटके बघण्याबद्दल अगदी टोकाची आवड, असोशी वाटत होती.

पुढे वाचा