विषय «युवा»

नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?

संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. तरीसुद्धा नेटवर वावरणाऱ्यांसाठी काही नीती – नियम, आचारसंहिता वा स्वनियंत्रण असे काहीही नसल्यासारखे नेटिझन्सचे वर्तन असते.

पुढे वाचा

‘केस तर केस – भीमजयंतीला वाजणार २४ बेस’

१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. मध्यरात्रीपासूनच शुभेच्छांचे संदेश व्हॉट्सअपवर यायला सुरुवात झाली. त्यातला हा एकः ‘केस तर केस-भीमजयंतीला वाजणार २४ बेस’ या ओळी व खाली स्पीकर्सचे एकावर एक थर असलेला फोटो. पाठवणाऱ्याला लिहिलेः ‘मला हे मान्य नाही. आपण कायदा पाळायला हवा. इतरांना आपला त्रास होता कामा नये.’ त्याचे उत्तर आलेः ‘मलाही तसेच वाटते. आपल्या लोकांच्या काय भावना आहेत, हे कळावे, म्हणून तो फोटो पाठवला.’
दुपारीच याचा प्रत्यय आला. कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज जवळ येत गेला तसा अधिकच असह्य होऊ लागला.

पुढे वाचा

गूगल आपल्याला मठ्ठ तर करत नाही ना?

काही तुरळक अपवाद वगळता, एका निरीक्षणानुसार आजच्या तरुण पिढीच्या मेंदूचा बराचसा भाग ईमेल्स, ट्वीटर्स, चॅट्स, स्टेटस् अपडेट्स इत्यादींनी व्यापलेला असल्यामुळे बहुतेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव असतो व चित्त विचलित झालेले असते. अमेरिकेतील कॉलेजमधील 80 टक्के विद्यार्थी मॅसेजेस, फेसबुक, न्यूजफीड व इतर गोष्टी ताशी एकदा तरी, 10 टक्के ताशी सहा वेळा तरी वापरत असतात. व इतरांच्या बाबतीत ताशी किती वेळा याचा हिशोबच ठेवता येत नाही.
निकोलस कार या पत्रकाराने गूगल आपल्याला मूर्ख बनवत आहे का? या विषयी 2008 साली एक लेख लिहिला होता.

पुढे वाचा

आजचं भारतीय तारुण्य नेमकं आहे कसं?

‘भारत हा तरुणांचा देश आहे’, हे घिसंपिटं वाक्य ऐकून आपण पुरते कंटाळलो आहोत. इथं घरात चॅनल बदलण्याची सत्ता नाही, त्यासाठी बंड पुकारावं लागतं आणि या देशातली व्यवस्था, समाज, तरुण बदलतील अशी भाषणं केली जातात, असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. मात्र, ‘मार्केट’ या देशातल्या तारुण्याकडे असं पाहत नाही. बाजारपेठेचे अभ्यासक शोधतच असतात, या देशातल्या तारुण्याचं व्यक्तिमत्त्व. त्याचा बदलता स्वभाव आणि आशा-आकांक्षा.
असाच एक अभ्यास जेनेसिस बर्सन-मार्सेलर नावाच्या संस्थेनं अलीकडेच प्रसिद्ध केला. २0१५ मध्ये भारतीय तारुण्यात कुठले महत्त्वाचे ट्रेण्ड्स दिसतात, असं सांगणारा हा अभ्यास.

पुढे वाचा

अनश्व रथ, पुष्पक विमान या लेखमालिकेवरील चर्चासत्र

(रवींद्र रुक्मीणी पंढरीनाथ यांच्या आजचा सुधारक च्या सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2015 च्या अंकात अनश्व रथ, पुष्पक विमान ही लेखमालिका प्रकाशित झाली होती. त्या लेखमालिकेवरील चर्चासत्राचा हा वृत्तांत आहे. हे चर्चासत्र मुंबई सर्वोदय मंडळ, शांताश्रम, ताडदेव, मुंबई येथे दि. ७.१२.१४ रोजी आयोजित केली होती. व डॅनियल माजगावकर, सुनीती सु. र. व सुरेश सावंत या चर्चासत्राचे निमंत्रक होते. चर्चेचे शब्दांकन अनुराधा मोहनी यांनी केले आहे. – का. सं)

सुनीती: ही चर्चा केवळ वेळेवर नाही तर आशयावर अवलंबून आहे.

पुढे वाचा

वैकल्पिक माध्यमांसमोरील आह्वाने

(साम्ययोग साधना ह्या वैचारिक साप्ताहिकाचा हीरक महोत्सव जानेवारी २०१५ मध्ये धुळे येथे संपन्न झाला. येथे परिवर्तनवादी चळवळींतील नियतकालिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून चार परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच विषयांवर चांगले विचारमंथन व उद्बोधक चर्चा घडून आली. श्रोत्यांनीही चांगला सहभाग घेतला. अशा प्रकारे ह्या विषयावरील चर्चा महाराष्ट्रात तरी बèयाच वर्षानंतर झाली असावी. त्यातील एका चर्चासत्राच्या अध्यक्षपदावरून आ.सु. च्या माजी कार्यकारी संपादकांनी केलेले हे भाषण. -का.सं.)

  भौतिक ताळमेळ बसवताना जमिनी कार्यकर्त्यांना वाचन, लेखन, चिंतन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी वैकल्पिक माध्यमे कमी पडत आहेत.  

पुढे वाचा

कुटुंबसंस्था: काही प्रश्न

आजचा तरूण अस्वस्थ आहे, असंतुष्ट आहे. बेभान आहे, बेदरकार आहे, बेजबाबदार आहे हिसंक आहे, विध्वंसक आहे. त्याला कोणतीही बंधने नकोत. त्याला मुक्ती हवी आहे पण ही अराजकवादी मुक्ती आहे. हा बेबंदपणा आहे. हे आजच्या समाजशास्त्रज्ञांचे तरूणाचे विश्लेषण आणि हा राज्यकर्त्याच्या, त्याच बरोबर आईवडिलांच्या डोक्याच्या काळजीचा विषय. उपाय अनेक सुचविले जातात, तरूणांना विधायक कार्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. खेड्यात पाठविले पाहिजे. त्यांची उसळती युवाशक्ती सृजनासाठी वापरली पाहीजे. तरूणांने राजकारणात पडू नये सरकारी पातळीवर विद्यापीठातून ह्या युवाशक्तीला बांध घालण्याचे प्रयत्न होतात. आईवडिलाकंडून पैशाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न होतो.

पुढे वाचा

‘व्हॉटेव्हर’

मध्ययुग – अंधकारयुगानंतर आपण विवेकाचे युग (The Age of Reason) घडवून आपले जग बदलून टाकले. अधूनमधून आपण रक्तलांच्छित युद्धेही लढलो, पण सोबतच साहित्य, कला, विज्ञान, वैद्यक यांत उत्तम कामेही केली. कायद्याचे राज्य बऱ्याच पृथ्वीतलावर प्रस्थापित झाले. बऱ्याच जागी लोकशाही व्यवस्थाही घडल्या. आपल्या एका पिढीत ऐहिक दारिद्र्याचे परिणाम ज्या प्रमाणात कमी झाले, तेवढे आधीच्या संपूर्ण मानवी इतिहासात झाले नव्हते. राजकीय व आर्थिक व्यवस्थांच्या वापराने आपण नात्झी व सोविएत हुकुमशाह्यांवर मात केली. हे सारे असूनही आज आत्मविश्वासाचा अभाव, आपल्या कृतींच्या परिणामकारकतेवरचा विश्वास क्षीण होणे, निराशावाद, अशाने आपला समाज ग्रस्त आहे.

पुढे वाचा