महाराष्ट्र फौंडेशन या अमेरिकेतील संस्थेचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आगमन ही मुळातच एक स्वागतार्ह घटना आहे यात शंका नाही. पुरस्कार, अनुदान, अर्थसाहाय्य इत्यादी स्पांनी ललित साहित्य, वैचारिक वाङ्मय, प्रकाशकीय व्यवहार, समाजकार्य इत्यादींना ती खरोखरच ‘भरघोस’ म्हणावी अशी मदत करते. मात्र तिचे निवडीचे निकष आणि निवडयंत्रणा यांबाबत कोठे चर्चा झाल्याचे आढळत नाही. एक महत्त्वाची सांस्कृतिक संस्था म्हणून तिचे अशा दृष्टीने परीक्षण होणे अवश्य आहे. त्या संदर्भात काही विचार मांडीत आहे.
१. ललित साहित्याच्या निवडीचे निकष (संदर्भ : संवादिनी, १९९९ पृ. ६२)
प्रथमदर्शनी एक गोष्ट जाणवते ती अशी की यात ‘ललित्या’चा उल्लेख कोठेच नाही.