आस्तिकता आणि विज्ञान
– हेमंत आडारकर
जानेवारी ९७ च्या अंकातील प्रा. ठोसर यांचा ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स…’ हा लेख आणि मार्च ९७ च्या अंकातील दि. य. देशपांडे यांनी लिहिलेला, ‘प्रा. ठोसर, प्रा. एकल्स …’ हा लेख वाचून मनात आलेले विचार आजचा सुधारकच्या वाचकांपुढे मांडावेत ह्यासाठी हा लेखनप्रपंच.
आस्तिकता आणि विज्ञान ह्या परस्परविरोधी गोष्टी आहेत असे गृहीत धरणे बरोबर नाही. माझा स्वतःचा विज्ञानक्षेत्रातला दहा वर्षांचा अनुभव आणि अवांतर वाचन जर गाठीशी धरले तर एक वेगळीच स्थिती समोर येते. वैज्ञानिक पेशा आणि आस्तिकता ह्यांचा घनिष्ठ संबंध दिसतो.
विषय «पत्र-पत्रोत्तरे»
पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक, यांस
श्री. केशवराव जोशी यांच्या (फेब्रु. ९७) पत्राला हे उत्तर.
श्री. जोशी लिहितात ‘‘इंदुमती यार्दी ह्यांचे विचार बरोबर असले तरी त्यांनी दिलेले गिलचे उदाहरण चुकीचे आहे. एक ओली पार्टी होती. अशा पार्टीला बजाज यांनी जावयास नको होते. दारू पिलेल्या गिलने त्यांना जवळ बोलावल्यावर त्या गिलजवळ गेल्या व गिलने चापटी मारली.”
थोडक्यात श्री जोशींच्या न्यायाने श्री. गिल हे (गुन्हेगार) दारू प्यालेले म्हणून निर्दोष, तर त्यांच्या गुन्ह्याला बळी पडणारी व्यक्ती दोषी.
श्री. जोशी हे दारू पिणा-यांना गैरवर्तन करण्याची परवानगी देतात का?
पत्रव्यवहार
श्री. संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपल्या मासिकाचा एक फार जुना वाचक आहे. जो विवेकवाद आपल्या लेखांमधून आपण वेळोवेळी मांडला आहे तो सगळा मी काळजीपूर्वक वाचला आहे आणि तो मला पटला आहे. त्यामुळे मी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत साशंक झालो आहे. एवढेच नाही तर त्यामुळेच मी कोणत्याही एका धर्माचा अनुयायी नाही असे मानू लागलो आहे. माणूस आपल्या जातीने किंवा धमनि सांगितलेले आचार सोडून देऊ शकतो व आपल्या स्वतःच्या बुद्धीने आपले आचरण ठरवू शकतो असे मला वाटू लागले आहे.
पण तरीसुद्धा मला एक गुंता सोडविता आलेला नाही; आणि त्यासाठीच हे पत्र आपणाला पाठवीत आहे.
पत्रव्यवहार
संपादक,
आजचा सुधारक,
जाने. ९७ चा अंक मिळाला. इंदुमती यार्दी ह्यांचे विचार योग्य असले तरी त्यांनी दिलेले गिलचे उदाहरण चूक आहे. एक ओली पार्टी होती. अशा पार्टीला बजाज ह्यांनी जावयासच नको होते. दारू प्यालेल्या गिलने त्यांना जवळ बोलाविल्यावर त्या गिलजवळ गेल्या व गिलने चापट मारली. बजाजांनी गिलजवळ जावयाचे नाही.
आम्ही पुरुषसुद्धा रस्त्यात दारू प्यालेला कोणी असेल तर लांबून जातो. जवळ गेले तर तो भटांना शिव्या देतो. हा अनुभव अनेकांना असेल. माझ्या मते गिल खुर्चीतून उठून बजाजकडे जाऊन त्यांनी चापट मारली असती तर ते दोषी ठरतात.
पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक, यांस
आपल्या जुलै-ऑगस्टच्या अंकाचे अभ्यागत संपादक श्री. सत्यरंजन साठे यांचे अभिनंदन. समृद्ध, वाचनीय लेखांबद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या विस्तृत लेखातील सुबोध मांडणीबद्दल. या विषयांशी अपरिचित असल्यामुळे असेल, मला दोन शंका पडल्या. पृ. १४८ वर ‘बोम्मई वि. भारत’ खटल्यात (भा.ज.प. सरकारे यांच्या) बडतर्फीचा हुकूम अवैध ठरवावा लागला नाही, पण वैध म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करायचेही टाळता आले.’ हे कसे काय?जे अवैध नाही ते वैधठरते. मग या लिहिण्याचा अर्थ?दुसरे शंकास्थळ पृ. १४६ वर, न्यायालयाने बोम्मई वि. भारतआणि फारुकी वि. भारत या दोन्ही खटल्यांत कोणता आक्षेप तपासला?पहिल्यात
पत्रव्यवहार
संपादक
आजचा सुधारक
‘धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय’ ह्या विशेषांकाविषयी ही माझी प्रतिक्रिया.
अनुक्रमणिकेत बॅ. पालखीवालांचे नाव बघून सखेद धक्का बसला. बॅ. पालखीवाला हे Champion of Democratic Rights म्हणून ओळखले जातात. तरी समाजातील काही अनिष्ट प्रथांवर डोळेझाक करण्यात व ह्या अनिष्ट प्रथांचा ज्यांनी पायंडा पाडला त्या व्यक्तींशी गोडीगुलाबीने वागण्यात बॅ. पालखीवाला निपुण आहेत. दाउदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना बुर्हााणुद्दीन उर्फ बडा मुल्लासाहेब हे जगभर पसरलेल्या दहा लक्ष बोहरांच्या तन, मन आणि धनावर मालकी हक्क गाजवतात. ह्यालाच इंग्रजीत government within government असे म्हटले जाते.
पत्रव्यवहार
श्री दि. य. देशपांडे यांस स. न.
आपला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दलचा लेख वाचला. श्री. रेगे यांनी महाराष्ट्र फौंडेशनच्या बक्षीससमारंभाच्या वेळच्या भाषणात मराठी भाषांतर केलेल्या तत्त्वज्ञान इत्याबद्दलच्या पुस्तकांची आवश्यकता आहे असे म्हटले होते. श्री. भटकळ यांना अशी पुस्तके कॉलेज- विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात रस आहे असे मला समजले. (महाराष्ट्र फौंडेशनच्या बक्षिसांची योजना करणार्या श्री. देशमुखांनी मला ही माहिती दिली.)
अशी पुस्तके, म्हणजे जी मराठी माध्यमातून तत्त्वज्ञानासारख्या लिबरल आर्टच्या शिक्षणासाठी वापरता येतील त्यांचे भाषांतर सुरू करण्याची योजना स्पॉन्सर करावी अशी माझीकल्पना आहे.
पण भारतात कुठली पुस्तके, ती वापरली जातील का?
पत्रव्यवहार
सम्पादक, आजचा सुधारक ह्यांस,
आपण आपल्या नियतकालिकाच्या एप्रिल १९९६ च्या अंकात प्रा. स. ह. देशपांडे ह्यांच्या भूमिकेचा जो प्रतिवाद केला आहे त्यासंबंधी काही शंका. ह्या शंकाच आहेत ह्याचा विसर न व्हावा.
(१)“एका बाजूला धर्मसंस्थापक ईश्वर असल्यामुळे…” ह्या शब्दांनी सुरू होणारा तुमचा तर्क घ्या. त्यात ईश्वर व प्रेषित हे शब्द येतात. आता ह्या संज्ञा सेमिटिक धर्मातल्या आहेत; पौर्वात्य धर्मपरंपरात त्या नाहीत, किंवा ईश्वराच्या संकल्पनेत उभय परंपरांत मूलभूतफरक आहे हे लक्षात घेतले तर धर्मसुधारणा अशक्य आहे किंवा तो व्याघात आहे असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरते?
पत्रव्यवहार
श्री. संपादक, आजचा सुधारक यांस
आपल्या मार्च १९९६ च्या अंकात प्रा. मधुकर देशपांडे ह्यांचे पत्र आले आहे. त्याविषयी मला काही खुलासा करावयाचा आहे.
(१)३९४ पानावरील त्यांच्या तिसर्याम परिच्छेदाशी मी पूर्णपणे सहमत आहे. स्त्रीपुरुषांची लैंगिक गरज कमीजास्त कशीही असो, लैंगिक स्वायत्तता दोघांनाही सारख्या प्रमाणात असावी असेच माझे मत आहे.
(२)आता कुटुंब : आजचे आणि उद्याचे ह्यासंबंधी.
‘पाश्चात्त्य कुटुंबात मुले एकदा आईपासून सुटी झाली की ती पूर्ण बिरादरीची होतात’ हे माझे विधान अतिव्याप्त आहे ह्यात संशय नाही.
मी हे विधान मुख्यत: भारतीय आईबापांच्या तीन जबाबदार्यांदच्या संदर्भात केले होते.
पत्रव्यवहार
मा. संपादक
आजचा सुधारक यांस स. न.
श्री. ह. चं. घोंगे यांचा ‘हिदुत्व अन्वेषण’ हा आक्टोबर ९५ च्या अंकातील लेख वाचनात आला. या आधीच्या म्हणजे सप्टेंबर ९५ च्या अंकातील ‘शारदेच्या पुनर्जन्मावरील त्यांचा लेख वाचलेला होताच. आधीचा लेख वाचल्यानंतर लेखकाच्याबद्दल काही अपेक्षा आधीच निर्माण झाल्या होत्या. मात्र ‘हिन्दुत्व अन्वेषण हा लेख वाचून भ्रमनिरास झाला. लेखकाच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास केवळ ‘शाब्दिक चावटीचाच नव्हे, तर ‘वैचारिक चावटीचाही आश्रय घेऊन लिहिलेला हा लेख वाटला. जागोजाग ‘हिंदुत्व आणि ‘हिंदु यांतील वैयर्त्य दाखविताना लेखकाने ‘वैचारिक चावटीचा केलेला उपयोग निषेधार्ह वाटतो.