मानवी जीवन हे सतत आपल्या अडचणी आणि गरजांमधून शिकत, त्यावर तोडगा म्हणून नवनवीन उपकरणे, युक्त्या, क्लृप्त्या, तंत्र इत्यादी शोधत, विकसित होत गेले आहे. या सगळ्यामुळे मानवी जीवन सुरुवातीला नेहमीच सुखकर, सहज झाले खरे, पण या सर्व उपायांमुळे नवे प्रश्न नक्कीच उभे राहत आले आहेत. हे चक्र अखंड सुरू आहे आणि यापुढेही राहील. मागील काही दशकांपासून विकसित झालेले तंत्रज्ञान, उदाहरणार्थ विमान, अणुऊर्जा, वीज, टीव्ही, फोन, इंटरनेट, मोबाईल, स्मार्टफोन, सीसीटीव्ही, क्लाऊड टेक्नॉलॉजी इत्यादी, आणि आता कृत्रिमप्रज्ञा.
या सर्वांचा दैनंदिन जीवनात समावेश/वापर वाढत गेला, आणि या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यावर प्रथमदर्शनी आपले जीवन सहज/सोपे/सुखकारक झाले असे नक्कीच म्हणता येईल.