‘जयभीम’ हा तमीळ सिनेमा जबरदस्त आहे. इतर अनेक भाषांत तो OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आपण जातीय अन्यायग्रस्तांना कसा न्याय मिळवून देऊ शकतो याचे, हा सिनेमा उत्कृष्ट उदाहरण आहे. सामाजिक भान असलेल्या वकीलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा सिनेमा आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच जेलमधून सुटलेल्यांना त्यांची जात विचारून त्यातील SC/ST ना जेलर वेगळे उभे करतो व इतरांना घरी सोडतो. त्यांना घेण्यासाठी विविध पोलिसस्टेशनचे इन्स्पेक्टर आलेले असतात, जे यांना प्रलंबित खटल्यांमध्ये अडकवण्यासाठी पुन्हा घेऊन जातात हे दाखवले आहे.
विषय «चित्रपट परीक्षण»
थप्पड – पितृसत्ताक व्यवस्थेवर
‘थप्पड’ चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि आम्ही सर्व स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी तो बघण्याचा निश्चय केला. संध्याकाळी पाचच्या शोचा ‘थप्पड’ बघण्यासाठी आम्ही सिनेमागृहात प्रवेश केला तेव्हा सिनेमागृहात मोजून ३० ते ४० प्रेक्षक होते. त्यांत महिलांचे प्रमाण अधिक होते. बहुतेक प्रेक्षक हे तरुण व मध्यमवयीन होते तर काही बोटावर मोजण्याइतक्या पन्नाशीपुढच्या महिला होत्या. प्रेक्षकांमधील पाच-सहा तरुण तर चित्रपट सुरू असताना मध्येच उठून गेले. बहुदा त्यांना चित्रपट आवडला नसावा. सदर चित्रपटातील मोलकरणीला तिचा नवरा मारतो हे दृश्य आले तेव्हा बहुतेक तरुण मुली-मुले हसली. परंतु नायिकेला तिच्या नवऱ्याने ‘थप्पड’ मारल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटले हे त्यांच्या स्तब्धतेतून कळाले.
आर्टिकल १५ – जातिव्यवस्थेचे व नोकरशाहीचे योग्य चित्रण
बड़े बड़े लोगन के महला-दुमहला
और भइया झूमर अलग से
हमरे गरीबन के झुग्गी-झोपड़िया
आंधी आए गिर जाए धड़ से
बड़े बड़े लोगन के हलुआ पराठा
और मिनरल वाटर अलग से
हमरे गरीबन के चटनी औ रोटी
पानी पीएं बालू वाला नल से
कहब त लगीजाइ धक से
डाव्या कम्युनिस्टांच्या या गाण्यानेच चित्रपटाची सुरुवात होते व लगेचच दिग्दर्शक अनुभव सिन्हा फारसा वेळ न दवडता दोन लहान दलित मुलींवरील अत्याचाराची दृश्ये दाखवून चित्रपट वेगवान असल्याची जाणीव करून देतो व प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो.
‘पिंक’च्या निमित्ताने
चित्रपट, पिंक, बलात्कार, हिंसा, नकाराचा अधिकार, योनिशुचिता
—————————————————————————–
लैंगिक संबंधांना नकार देण्याचा स्त्रीचा अधिकार हा तिच्या स्वतःच्या शरीरावर असणाऱ्या मुलभूत अधिकाराचा भाग आहे, हे वास्तव व्यावसायिक चित्रपटाच्या माध्यमातून जोरकसपणे मांडणाऱ्या ‘पिंक’ ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या आधुनिक स्त्रीच्या विचारपटाचा हा आलेख.
—————————————————————————–
शुजित सरकार यांचा ‘पिंक’ हा अलीकडच्या काळातील एक महत्वाचा चित्रपट आहे. सिनेमा ही केवळ वैचारिक नाही तर भावनिक अनुभूतीही असते. त्यामुळे मला (किंवा इतर कुणाला) या सिनेमाचे (किंवा कोणत्याही कलाकृतीचे) भावणे हे अतिशयोक्त आणि सापेक्ष असू शकते. थेट सामाजिक संदर्भ असलेला एक महत्त्वाचा विषय हाताळल्याबद्दल आणि या विषयातले वैचारिक बारकावे टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याबद्दल, तसेच अभिव्यक्तीतील ठाशीवपणा आणि साधेपणा यांसाठी ‘पिंक’ मला खूप आवडला.
‘सैराट’च्या निमित्ताने
‘सैराट’ चित्रपटाने इतिहास घडविला. त्याच्या लोकप्रियतेचे व वेगळेपणाचे विश्लेषण अनेकांनी अनेक दृष्टिकोनातून केले. त्या निमित्ताने एका तरुण कार्यकर्त्याने व्यक्ती किंवा समूहाला एखादी गोष्ट का आवडते ह्या प्रश्नाचा घेतलेला हा वेध.
————————————————————————————
देख रे शिंदे,
उपर चाँद का टुकडा
गालिब की गज़ल सताती है
बेकार जिंदगी ने इसल्या को निकम्मा कर दिया,
वरना इसल्या भी आदमी था,
‘इश्क‘ के काम आता!
– नारायण सुर्वे
* * * *
“सैराट पाहिला का रे?”
‘तलवार’च्या निमित्ताने
तलवार, मेघना गुलजार, विशाल भारद्वाज, गत-अवलोकन परिणाम
आरुषी खून खटल्यावर आधारित ‘तलवार’ चित्रपटाच्या निमित्ताने मानसशास्त्रातील गत-अवलोकन परिणाम ही संकल्पना व तिचेसामाजिक निर्णयप्रक्रियेवरील परिणाम ह्यांची तोंडओळख करून देणारा हा लेख.
—————————————————————————
दोन हजार आठ साली दिल्लीतील नॉईडा येथे झालेल्या आरुषी तलवार आणि हेमराज बनजाडे यांच्या हत्येच्या तपासावरती ‘तलवार’ हा मेघना गुलजार दिग्दर्शित आणि विशाल भारद्वाज लिखित चित्रपट बेतला आहे. चित्रपटाविषयी बोलण्याआधी या खटल्याची पार्श्वभूमी समजावून घेऊ या.
खटल्यासंबंधी
आरुषी ही नुपूर आणि राजेश तलवार ह्या दांपत्याची एकुलती एक मुलगी होती आणि हेमराज हा त्या कुटुंबाचा त्यांच्याकडेच राहणारा नोकर होता.
चित्रपट-परीक्षण/ ॲज अग्ली ॲज इट गेट्स
अग्ली, अनुराग कश्यप
—————————————————————————
अनुराग कश्यप ह्या प्रयोगशील दिग्दर्शकाच्या ‘निओ-न्वार’ शैलीतील नव्या ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’चे सौंदर्य उलगडून दाखविणारा नव्या पिढीतील एका सिनेरसिकाचा दृष्टीकोन
—————————————————————————
माणूस जितका क्लिष्ट त्याहून महानगरातील माणूस थोडा अधिक क्लिष्ट. जगणं पैशाशी बांधलेलं आणि पैशानेच सुटणारं. वाट, आडवाट, पळवाट यांतला फरक इथे धूसर होत जातो आणि नाहीसाही होऊ शकतो. ‘अग्ली’या खरोखरीच ‘अग्ली’[चित्रपटाची कथा ही कुठल्याही माणसांची कथा असू शकली तरी ती महानगरातील माणसांची कथा आहे हे जाणवत राहतं.
‘अनुराग कश्यपचा चित्रपट’ ही काही चित्रपटांची विशेष ओळख आहे. ‘अग्ली’हा त्याच यादीतला चित्रपट.
हिटलरसंबंधी दोन चित्रपट
हिटलर, एकाधिकारशाही, फॅसिझम
आधुनिक मानवी इतिहासातील काळाकुट्ट पट्टा म्हणून दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंची वंशहत्या या घटनेकडे बघितले जाते. त्यासाठीचा खलनायक म्हणून आणि प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या आणि युद्धाच्या काळातील जर्मनीचा हुकूमशहा म्हणून हिटलर आपल्याला ज्ञात आहे. हिटलरसंबंधी दोन चित्रपटांची ओळख करुन देणे हा या लेखाचा हेतू आहे. यातील पहिला चित्रपट आहे ’डाऊनफॉल’; ज्याची मांडणी हिटलरच्या आयुष्यातील शेवटच्या दहा दिवसांतील घटनांवरती आधारलेली आहे. दुसरा चित्रपट आहे ’हिटलर : द राईज ऑफ इव्हिल’; ज्यात हिटलरच्या राजकारणातील प्रवेशापासून तो हुकुमशहा बनण्यापर्यंतच्या कालावधीतील राजकीय घटनांवर आधारलेले चित्रण आहे.
`हैदर’ आणि `डॉ. प्रकाश बाबा आमटे’
सुप्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा `हैदर’ आणि `समृद्धी’ पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे चित्रपट आपल्या समाजापुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुढे आणतात. जरी या चित्रपटांचा हेतू वेगळा असला तरी या चित्रपटांतून या विषयांची मांडणी अतिशय समर्थपणे पुढे येते. एक विषय काश्मीरमधील दहशतवादाचा, जो हैदरमध्ये हाताळला आहे. तर दुसरा नक्षलवादाचा, जो डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात हाताळला आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे विषय या चित्रपटांचे मूळ विषय नाहीत. पण चित्रपटाच्या मुख्य विषयांच्या अनुषंगाने हे विषय अपरिहार्यपणे या चित्रपटात दाखल झाले आहेत आणि या प्रश्नांमुळेच या चित्रपटांना गांभीर्य आणि खोली प्राप्त झालेली आहे.
‘यू टर्न’च्या निमित्ताने
आनंद म्हसवेकर लिखित ‘यू टर्न’ ह्या नाटकाचा १४३ वा प्रयोग नुकताच पहिला. या नाटकाविषयी, कथानकाविषयी, प्रयोगाविषयी पूर्वी वाचलेलेच होते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोग पाहण्याची उत्सुकता होती व तशी संधी मिळाली म्हणून ती सोडली नाही. नाटकाच्या तांत्रिक बाबींविषयी मी लिहिणार नाही कारण त्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. मला फक्त कथानकाविषयी व त्यात मांडणी केलेल्या समस्येविषयी काही लिहायचे आहे.
नाटकाचे कथानक म्हटले तर अभिनव आणि म्हटले तर ते तसे नाहीही. कारण यापूर्वी ह्याच कथानकाच्या आशयाचे ‘दुर्गी’ हे नाटक पाहिल्याचे मला आठवते आहे. कोणी लिहिले, कोणी दिग्दर्शित केले हे आज आठवत नाही.