मी ललित किंवा तत्सम साहित्य क्वचितच वाचले आहे. श्री भालचंद्र नेमाडेंना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या लेखनाच्या साहित्यिक आणि सामाजिक मूल्यांची अधिक चर्चा होणार आहे. कला मूल्यांपेक्षा मी कलाकृतीच्या सामाजिक परिमाणाला अधिक (कदाचित अवास्तव) महत्त्व देतो. परंतु प्रत्यक्ष लिखाण न वाचता (आणि तसे परिश्रम न घेता) काही एक सर्वसाधारण स्वरुपाचे विचार व्यक्त करता येतात.
नेमांडेंचा स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट आहे – “मी परंपरेचे जे समर्थन करतो ते नीरक्षीरविवेकाने परंपरेचा अर्थ लावण्याच्या बाबतीत म्हणतो आहे. कुठल्याही माणसाला तो ज्या घरात जन्मतो, ज्या धर्मात जन्मतो, ज्या प्रदेशात जन्मतो, तिथली शेकडो वर्षांची परंपरा त्याला आपसूक वारशाने मिळते.