विषय «चळवळ»

मुक्काम नासिक – १५ एप्रिल २०००

नासिक शब्द कसा लिहायचा? नाशिक, नाशीक की नासिक? नासिका म्हणजे नाक. भौगोलिक संदर्भ घेऊन सह्याद्रीच्या पाच शाखांपैकी एक जी सातमाळा ती नाकासारखी पुढे येऊन हा परिसर झाला असावा. असे अनुमान करता येईल. जुन्या नाशकाचा भाग पन्नास हजार वर्षांपूर्वी जलाशयाखाली होता हे तिथे सापडलेल्या अश्मीभूत (fossils) अवशेषांवरून समजते असे भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात. पण या भौगोलिक म्हणा की प्रागैतिहासिक म्हणा, विशेषांपेक्षा नासिकचे सुधारकी मनाला चकित करणारे एक वैशिष्ट्य आहे. खरे वाटणार नाही पण तिथल्या एका चौकाचे नाव चार्वाक चौक असे आहे. आता चार्वाकासारख्या वेदनिंदक नास्तिकाचे नाव सिंहस्थपर्वणीचे माहात्म्य लाभलेल्या या गोदाकाठच्या तीर्थक्षेत्राला कसे भावले असावे?

पुढे वाचा

स्त्रीचे दास्य आणि स्त्रीमुक्तीची वाटचाल

स्त्रीचे समाजात नेमके कोणते स्थान आहे? एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून तिचा समाजात दर्जा काय आहे? या प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की सामाजिक व आर्थिक स्थित्यंतराशी आणि प्रस्थापित मूल्यव्यवस्थेच्या परिवर्तनाशी तो निगडीत आहे.

प्रत्यक्ष समाजव्यवस्थेमधील सहभाग, सहभागाचे स्वरूप, स्वतःच्या भोवताली घडणाच्या घटना संबंधी निर्णय घेण्याची क्षमता व निर्णयाचे क्षेत्र यांवर स्त्रीचे स्थान अवलंबून आहे. ऐतिहासिक स्वरूपाचा आढावा घेतल्यास आपल्या समाजातील स्त्रीचे स्थान कसे होते व ते कसकसे बदलत गेले यावर प्रकाश पडू शकेल.

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्त्रीचे समाजातील स्थान पुरुषाच्या बरोबरीचे होते असे दिसते.

पुढे वाचा