विषय «चरित्र»

विनोबा विचार

मिलिंद बोकील ह्यांनी २००३ साली ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना.

डॉ. जयंतराव पाटील यांनी विनोबांच्या या लेखसंग्रहाचे संकलन करून प्रस्तावना लिहिण्याचे काम मला जेव्हा सांगितले तेव्हा आयुष्यात पूर्वी कधीही नाही इतका प्रचंड संकोच वाटला. मन अतिशय दडपल्यासारखे झाले. संकलन करण्याचे काम अवघड नव्हते, पण प्रस्तावना लिहिणे? त्या कामाला आपण पात्र नाही एवढे आत्मज्ञान मला जरूर होते. अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर विनोबांसारख्या महात्म्याच्या लेखांची ओळख माझ्यासारख्याने करून देणे म्हणजे सूर्याला काजव्याने ओवाळण्यासारखे होय. पण डॉ. पाटील यांनी सांगितले की सध्याच्या पिढीतील एका माणसाला विनोबांबद्दल काय वाटते ते कळण्यासाठी हे काम तू करायला हवेस.

पुढे वाचा

श्रद्धांजली : अनिल पाटील सुर्डीकर

गावगाडा- शतकानंतर – अनिल पाटील सुर्डीकर

दशावतारांच्या गोष्टींपैकी वामनाची गोष्ट मला नेहेमीच अस्वस्थ करत आली आहे. एरवी देव पाप्यांना शिक्षा देतो, तर बळीचं पापच मला दिसत नाही. एरवी देव दुर्बलांचा घात करतो. हो;
घोडा नको, हत्ती नको, वाघ तर नको रे बाबा
बकरीच्या पोराचा बळी दे,
असा देव दुर्बलांचा घात करतो!
वामन मात्र बळीचा दडपून वर टर्रेबाजी करतो! आणि बळीही हसतखेळत वामनाला झेलून आपले महत्त्व अबाधित ठेवतो. एक वर्षारंभ आपल्या नावाशी जोडून घेतो. इडा-पिडा टळून आपले राज्य येवो, अशी प्रार्थना लोकांना करायला लावतो.

पुढे वाचा

अजून एका पुरोगामी विचारवंताची हत्या

कर्नाटकातील हंपी विश्वविद्यालयाचे माजी उपकुलगुरू, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथील त्यांच्या राहत्या घरी 30 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 8.40 वाजता 2 अज्ञात इसमांकडून गोळी घालून हत्या करण्यात आली. कुठल्याही उपचारापूर्वीच त्यांचा जीव गेला होता. मृत्यु समयी त्यांचे वय 77 वर्षाचे होते. डॉ. एम. एम. कलबुर्गी हे ख्यातनाम साहित्य संशोधक, विमर्शक व जुन्या कन्नड लिपीचे अभ्यासक होते. कन्नड संस्कृती, कन्नड इतिहास, लोकगीत (जानपद) साहित्य, व्याकरण, ग्रंथ संपादन शास्त्र, इत्यादी विषयात त्यांनी संशोधन पर प्रबंध लिहिलेले होते. त्यांनी 41 प्राचीन ग्रंथांचे संपादन केले व शंभराहून जास्त संशोधित लेख लिहिले.

पुढे वाचा

जीर्णशीर्ण हवेलीतला मार्क्सवादी!

संसदेच्या कॉरीडॉर किंवा प्रांगणात अनोळखी असणाऱ्याने जरी अभिवादन केले तरी आवर्जून सस्मित प्रतिसाद देण्याचा सुसंस्कृतपणा जपणारे तसेच आपण कोणी तरी बडे राजकीय आसामी आहोत याचा मागमूसही न लागू देता दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळात सहजपणे वावरणारे सीताराम येचुरी आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणजे ‘सेनापती’ झाले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, जनाधार गमावल्याने सध्या अत्यंत हालाखीच्या अवस्थेत असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते आता भारतातील सर्वोच्च नेते आहेत. चेहेऱ्यावर मुक्कामाला आलेले हलकेसे स्मित, कपाळावर उडणारी केसाची एक-दोन झुल्पे तसेच नजरेत भरणाऱ्या दोन उभ्या अठ्या आणि चुरगळलेला कुडता घातलेला माणूस म्हणजे सीताराम येचुरी!

पुढे वाचा

रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रवाद

पुराणात भस्मासूर नावाच्या राक्षसाची गोष्ट प्रसिद्ध आहे. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याची जळून राख व्हायची. आजकाल संघ परिवाराने ह्याच भस्मासूराचा अवतार धारण केला आहे. संघाने आपल्या राष्ट्रपुरूषांच्या डोक्यावर आपला हात ठेवायला सुरूवात केली आहे. स्वामी विवेकानंदापासून योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी हे सर्वच संघाच्या क्षुद्रीकरणाच्या मोहीमेचे शिकार झाले आहेत, आणि आता पाळी आलीय रवींद्रनाथ टागोरांची. आजी सरसंघचालक मोहन भागवत मध्यप्रदेशच्या सागर येथील संघ शिबिरात आपल्या भस्मासूरी अवताराची ओळख करून देत म्हणाले की, रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या ‘स्वदेशी समाज’ नावाच्या पुस्तकात सर्वप्रथम हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली आहे.

पुढे वाचा

जगावेगळे

(विदर्भातील तत्त्ववेत्ते व विचारवंत दि.य. देशपांडे ह्यांनी आपल्या विदुषी पत्नी मनू गंगाधर नातू ह्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजचा सुधारक ह्या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ह्या जगावेगळ्या दांपत्यावरील, लोकमत २०१४ च्या दिवाळी अंका पूर्वप्रकाशित झालेला हा लेख – का.सं.)

गोष्ट खूप जुनी आहे. पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची म्हणजे जवळजवळ गेल्या जन्माची वाटावी अशी. पण मला अद्यापही तो काळ विसरता येत नाही. लहानशा खेड्यातून मी विदर्भ महाविद्यालयात शिकायला आले होते. शहरात छोटीशी खोली घेऊ न राहात होते आणि सायकलने कॉलेजात येत होते.

पुढे वाचा

आहे असा कवण तो झगडा कराया?

पु. ल. देशपांडे यांच्या कलेचे वैशिष्ट्य असे आहे ,की तिने जसा आणि जितका आनंद जीवनसंग्रामातल्या विजयी वीरांना दिला आहे तसा आणि तितकाच तो पराजितांना आणि पळपुट्यांनाही दिला आहे. जीवनात येणाऱ्या विसंगतीकडे त्यांनी विनोदबुद्धीने पाहायला आम्हाला शिकविले आहे. त्यामुळे ते सर्वांनाच आपले वाटत आले आहेत. टिळकांना जसे जनतेने आपल्या मर्जीने ‘लोकमान्य’ केले तसेच पुलनांही जनतेनेच ‘महाराष्ट्रभूषण’ मानले आहे. सरकारने केवळ या लोकमान्यतेवर राजमान्यतेची मुद्रा उठविली आहे इतकेच. तसे नसते तर ठाकरे यांनी क्षणिक शीघ्रकोपाच्या उद्रेकात जे असभ्य आणि अश्लाघ्य उद्गार काढले त्यावर अख्खा महाराष्ट्र प्रक्षुब्ध सागरासारखा खवळून उठला नसता आणि ठाकरे यांनी कितीही नाही म्हटले तरी जनक्षोभासमोर ते जे तूर्त मूग गिळून बसले आहेत तसे, चूप ते बसले नसते.

पुढे वाचा