सुलतानी व अस्मानी जुलुमातून सोडवणूक शक्य?
अतिशय दाहक आणि धक्कादायक स्थितीमध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कुपोषणाचे बालमृत्यू हे वर्तमानपत्रात ठळकपणे आले. न आलेले पण तेवढेच दाहक आणखी एक सत्य लपलेले आहे पन्नास कोटींपेक्षा अधिक स्त्रिया या देशात अनीमिया या जीवघेण्या स्थितीत अर्धमेल्या जगताहेत मरायच्या शिल्लक आहेत म्हणून.
सुलतानी व अस्मानी जुलुमाच्या दुहेरी कात्रीत सापडलेला, शेतीप्रधान राष्ट्रातला शेतकरी स्वतःची सोडवणूक कशी करणार?
या ज्वलंत आणि होरपळणाऱ्या परिस्थितीतून शेतीची सोडवणूक करणारी वाट काढणे काळाची निकड आहे. ही वाट शोधताना काही महत्त्वाच्या अटींची मर्यादा घालून पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे.