वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स ‘अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत” हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेले वाक्य; पण प्रगतीचे घोडे अजून पहिल्याच पायरीवर अडलेले आहे. अर्थात, अनेकांच्या मनात पुढचे वळण घेतले की आलेच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोहचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.
जगाची लोकसंख्या आज सात अब्ज आहे आणि त्यातले एक अब्ज लोक उपाशी आहेत.