विषय «उत्क्रांती»

मानवी स्वभाव व डार्विनवाद (१)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), या इंग्लंडमधील मुक्त विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्या होत्या. सध्या त्या जैवनीतिशास्त्र (Bioethics) या विषयाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन, येथे प्रपाठक (Reader) आहेत. त्यांचे द स्केप्टिकल फेमिनिस्ट हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत.

पुढे वाचा

नैतिक प्राणी (भाग ३)

माणसांच्या समूहांमध्ये पूर्ण समता कधीच आढळत नाही. सर्वच समाजांमध्ये घटकव्यक्तींना श्रेणींमध्ये विभागलेले असते. ह्या श्रेणींचा उच्चनीच क्रम कधी वयावर अवलंबून असतो, कधी शारीरिक शक्तीवर, कधी संपत्तीवर, तर कधी इतर कोणत्या घटकांवर. समाजाप्रमाणे हे घटक बदलतात, पण त्यांच्यानुसार घडलेली श्रेणींची उतरंड (Hierarchy) मात्र सगळ्याच समाजांमध्ये निरपवादपणे आढळते. हे कसे उपजले? पूर्वी एक आडवळणाचे स्पष्टीकरण दिले जाई. जास्त काटेकोरपणे श्रेणीबद्ध असलेले समाज सैल श्रेणींच्या समाजांपेक्षा जास्त सबळ असतात, असे मानले जाई. म्हणजे दोन समाजांमध्ये भांडण झाले, तर जास्त श्रेणीबद्ध समाज जिंकणार, आणि असे होत होत कठोर श्रेणीबद्ध समाजच टिकून राहणार, असे हे स्पष्टीकरण होते.

पुढे वाचा

नैतिक प्राणी (भाग २)

“We should probe our commonsense reactions to evolutionary theories carefully before concluding that the commonsense itself isn’t a cognitive distortion created by evolution” – (‘द मॉरल अॅनिमल’ – रिचर्ड राईट).

प्रश्न : व्यक्तींच्या आनुवंशिक गुणांपैकी जगण्याला आणि प्रजोत्पादनाला मदत करणारे गुण साऱ्या जीवजातींत पसरतात आणि असे अनेक पिढ्यांमध्ये घडून जीवजातीच्या गुणांचा संच बदलतो. नैसर्गिक निवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीचे हे वर्णन आपण पाहिले. ह्याचा एक अर्थ असा की स्वार्थीपणाने स्वतःचा आणि स्वतःच्या प्रजेचाच विचार करणाऱ्या व्यक्ती टिकून राहायची शक्यता जास्त आहे, तर उलटपक्षी स्वार्थत्याग, परोपकार, असे गुण असलेल्या व्यक्तींची प्रजा आणि गुण ह्यांचा प्रसार व्हायची शक्यता कमी.

पुढे वाचा