विषय «इतिहास»

संघ काही करणार नाही,संघाचे स्वयंसेवक सारे काही करतील !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांनी अलिकडेच केलेले ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नये‘ असे विधान चर्चेत आले आहे. सरसंघचालकांच्या या विधानाचे स्वागत झाले आहे. या विधानामुळे देशातील धार्मिक वाद तूर्तास शमतील असे अनेकांना वाटत आहे. एकप्रकारे देशातील धार्मिक स्थळे जशी आहेत तशी राहावीत या ‘राव सरकार’च्या काळातील कायद्याची ही पाठराखण आहे असे वाटू शकते. संघ बदलला, असेही अनेकांना वाटू शकते. व्यक्तिशः मला तसे वाटले नाही म्हणून हा लेखनप्रपंच!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची भाषणे एरवीही सुरू असतात. संघातील प्रचलित भाषेत त्याला ‘बौद्धिक’ असे म्हणतात.

पुढे वाचा

हिंदुराष्ट्राच्या अमानुष परंपरेचे वाहक

भारताच्या आधुनिक लोकशाहीचा इतिहास आणि आज हिंदुराष्ट्राच्या स्वागतार्थ पडत चाललेली पावले पाहता लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्यांच्या मनात हे काहीतरी विपरीत, अनाकलनीय, अघटित घडते आहे असे वाटत राहते. विनाशाकडे नेणारे हे वास्तव आणि त्याच्या वेगासमोर वाटणारी प्रचंड असहाय्यता हा स्थायीभाव सतत चहूबाजूला जाणवत राहातो. आणि वाटत राहते की काल एवढे काही नव्हते ते आज कुठून आले? असे आणि एवढे विदारक?

इतिहासाच्या नजरेने पाहू लागल्यावर असेही लक्षात येते की आपण डोळे झाकले होते. पण त्यामुळे ते जे विदारक होते ते असत्याचे नव्हते होत नाही.

पुढे वाचा

स्थलान्तराचा इतिहास

या लेखापुरते आपण इतिहास म्हणजे पूर्वकालीन घटना, व्यक्ती, विचार, व्यवस्थापन, आणि परंपरा यांचे आकलन; आणि शिक्षण म्हणजे जगण्याला उपयुक्त अश्या गोष्टींचे आकलन आणि आत्मसात्करण असे समजू. या व्याख्यांना अतिव्याप्तीचा दोष लागू शकतो, पण आपण त्यांना भारतातील आजच्या शालेय आणि विद्यापिठीय शिक्षणाच्या चौकटीत पाहू शकतो. थोडक्यात भारतीय उपखंड हा आपल्या ऐतिहासिक स्थलकालाचा संदर्भ आहे. आजचा न्यूनतम LEB ( Life Expectancy at Birth) हा पन्नास वर्षे आहे असे समजू. अर्थात पन्नास ही काही लक्ष्मणरेषा नव्हे. ती मागे पुढे होऊ शकते. खरंतर प्रत्येक गेला क्षण हा इतिहासजमा होतो.

पुढे वाचा

जागतिक साथींचा इतिहास – कॉलरा

कॅरेबीअन समुद्रातील एक लहानसा गरीब देश म्हणजे हैती. या देशात डिसेंबर २०१०मध्ये अचानक जीवघेण्या अतिसाराची साथ पसरली. काही दिवसांतच हजारो लोक आजारी, तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले. ती साथ कॉलऱ्याची होती. त्यापूर्वीच्या १०० वर्षांत हैतीमध्ये कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे तिथले नागरिक या आजाराबद्दल अनभिज्ञच होते.

जानेवारी २०१०मधील विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून हैतीला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यापैकी एक म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेची नेपाळी स्वयंसेवकांची तुकडी. त्यांच्या कॅम्पमधून जमा होणारा मैला जवळच्याच आर्टीबोनाइट नदीत सोडला जाई. नेपाळमध्ये कॉलरा एंडेमिक म्हणजेच त्या भागात वर्षानुवर्षे टिकून राहिलेला आजार आहे.

पुढे वाचा

लॉन्सचा छोटासा इतिहास

ज्ञानाचा विरोधाभास

—————————————————————————–

         काही व्यवस्था किंवा रचना गुंतागुंतीच्या असतात. त्या व्यवस्थांच्या भविष्यातील स्थितीबद्दल आपण काही अंदाज (predictions) बांधतो. काही व्यवस्थांवरती आपण करत असलेल्या अंदाजांचा किंवा भाकितांचा अजिबात परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, हवामान ही व्यवस्था. उद्याच्या हवामानाचे भाकीत केल्याने हवामान बदलते असे होत नाही. मानवी व्यवस्था मात्र गुंतागुंतीच्या असतात आणि त्या व्यवस्थेसंबंधी केलेल्या भाकितांचा त्या व्यवस्थेवरती परिणाम होतो. जेवढी भाकिते जास्त चांगली, तेवढी ती व्यवस्था भाकितांना जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे मानवी व्यवस्था समजून घेण्यासाठी आपण जसजशी जास्त माहिती गोळा करत आहोत, ती माहिती ‘प्रोसेस’ करण्यासाठी आपली संगणन-क्षमता वाढवत आहोत, तसतशा व्यवस्थेतील घटना अधिकाधिक अकल्पनीय आणि अनाकलनीय होत जात आहेत असा विरोधाभास दिसतो.

पुढे वाचा

संधिकाल 

स्वातंत्र्यलढा, सत्याग्रह, टिळक, गांधी 

लोकमान्य ते महात्मा ह्या दोन युगांमधील स्थित्यंतराचा हा मागोवा. ह्या दोन्ही लोकोत्तर नेत्यांमधील साम्य-भेद व त्यांचे परस्परांविषयीचे मूल्यांकन टिपणारा. 

इ.स. 1914 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण होते. मंडालेमधील सहा वर्षांचा कारावास भोगून 16 जून 1914 रोजी लोकमान्य टिळक मायदेशी परतले. याच वर्षी साउथ अफ्रिकेतील सत्याग्रहाची यशस्वी सांगता होऊन गांधीदेखील भारताला परतण्यासाठी निघाले. परंतु वाटेत इंग्लंडला पोहोचता पोहोचता पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि गांधीचे स्वगृही परतणे जानेवारी 1915 पर्यंत लांबले. इ.स. 1914 ते 1920 हा कालखंड स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील संधिकाल होता.

पुढे वाचा

बंडखोरीची पाश्चिमात्त्य परंपरा

परंपरा आणि नवता हा संघर्ष तीव्र होतानाच्या युरोपमधील विविध घडामोडींचा, तिथल्या `बंडखोरांच्या कारवायांचा’ हा अभ्यासपूर्ण आलेख.
—————————————————————————-
‘परंपरा’ या शब्दाला आपल्याकडे खूप वजनदार संदर्भ असतात. ‘महान’, ‘समृद्ध’ अशी जी विशेषणं अनेकदा त्याला जोडून येतात,त्यांच्यामुळे हे वजन वाढत जातं आणि अखेर परंपरेचं जोखड बनतंय की काय,असं वाटू लागतं. अनेकविध परंपरांच्या सरमिसळीतून घडलेल्या आपल्या संस्कृतीच्या इतिहासात ज्या परंपरांचं असं ओझं होणार नाही अशा काही खोडकर परंपरा कदाचित असतीलही;पण त्यांची आठवण करून दिली तर ‘त्या फार महत्त्वाच्या नव्हत्या’ ,किंबहुना ‘त्या नव्हत्याच’ असं म्हणून त्यांना नाकारण्याची प्रवृत्ती (किंवा परंपरा) आपल्याकडच्या परंपरांचे पाईक म्हणवणाऱ्यांमध्ये दिसून येईल.

पुढे वाचा

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग ३)

प्रत्येक धर्मात परंपरा व नवतेचा संघर्ष सुरू असतो व तो कधीही निर्णायक असत नाही. त्यामुळे धर्माला कालसंगत बनविण्याची लढाई प्रत्येक पिढीला विविध पातळ्यांवरून लढावीच लागेल असे प्रतिपादन करणाऱ्या ह्या लेखमालेत आतापर्यंत हिंदू व ख्रिश्चन धर्मांचा आपण विचार केला. ह्या लेखात मुस्लिम धर्मातील मूलतत्त्ववादी विरुद्ध उदारमतवादी ह्या ऐरणीवर आलेल्या लढ्याचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे.
—————————————————————————–
इतर कोणत्याही धर्माप्रमाणे मुसलमान धर्म एकजिनसी, एकसंध नाही. 1400 वर्षांहून दीर्घ इतिहास असणारा व जगभर पसरलेला धर्म तसा असूच शकत नाही, कारण त्यावर स्थलकालपरिस्थितीचे प्रभाव-आघात झाल्यामुळे त्याच्या बाह्यरूपात तसेच अंतरंगात बदल होणे स्वाभाविकच आहे.

पुढे वाचा

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग २)

ख्रिश्चन धर्म, रोमन कॅथॉलिक, पोप फ्रान्सिस
—————————————————————————-
प्रत्येक धर्मातील परंपरा व परिवर्तन ह्यांच्यातील संघर्षाचा वेध घेणाऱ्या लेखमालेतील कॅथॉलिक पंथातील ह्या प्रक्रियेचे चित्रण करणारा व त्यातील पोप फ्रान्सिस ह्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारा हा लेख..
—————————————————————————–

हिंदू धर्माच्या मोकळ्याढाकळ्या रचनेमुळे, अनेकेश्वरी उपासनापद्धतींमुळे व सर्वसमावेशक लवचिकतेमुळे त्यात परंपरा आणि परिवर्तन ह्यांमधला लढा दीर्घकाळ चालत राहू शकला. इंग्रजी राजवट आल्यावर येथील सामाजिक-राजकीय -आर्थिक संरचनांना मुळापासून हादरे बसले व त्यातूनच हिंदू धर्मीयांनी आपल्या धर्माच्या चिकित्सेला प्रारंभ केला. भक्तिसंप्रदायाचा वारसा मानणारे गांधी-विनोबा-साने गुरुजी, अन्य पुरोगामी परंपरांतून आलेल्या अरविंद –विवेकानंद-कृष्णमूर्ती प्रभृतींनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाची व आचाराची पुनर्मांडणी केली.

पुढे वाचा

गांधी, मार्क्स, आंबेडकर: परस्परपूरकता शोधू या

गांधी, मार्क्स, आंबेडकर, परस्परपूरकता
—————————————————————————–
मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखून आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे कसे आवश्यक आहे ह्याची अभिनिवेशहीन मांडणी
—————————————————————————–

गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने तर आंबेडकर-मार्क्स वादाला नवी फोडणी बसली. या सगळ्या चळवळीकडे सजगपणे पाहणारा व त्यात सक्रिय सहभाग घेणारा एक कार्यकर्ता म्हणून या वादाकडे पाहताना मला काही केल्या कळत नाही की, आजच्या टप्प्यावर या वादाचे प्रयोजन काय?

पुढे वाचा