विषय «इतर»

रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार

“आज शाळेत जायचं म्हणून रडतो आहेस, उद्या शाळेत जाणार नाही म्हणून यापेक्षा जास्त रडशील.”
रवींद्रनाथांच्या लहानपणी त्यांच्या घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना एक थप्पड मारून ही जी भविष्यवाणी उच्चारली तीच त्यांच्या शिक्षणविषयक अनुभवांतील पहिली पायरी म्हणायला काहीच हरकत नाही. रवींद्रनाथांचा भाऊ सोमेंद्रनाथ आणि भाचा सत्यप्रसाद हे त्यांच्यापेक्षा केवळ दोनच वर्षांनी मोठे. त्यामुळे ही तीनही मुले तशी एकत्रच वाढली. दोन वर्षांच्या वडिलकी-मुळे हे दोघे शाळेत जायला लागले. पण छोटा रवी मात्र अजून शाळेत जायच्या वयाचा झालेला नाही असे घरच्यांनी ठरवून टाकले होते.

पुढे वाचा

शिक्षण नकोच —- प्रत्यक्ष करणे आवश्यक

मी शिक्षणाला विरोध करतो. कृतिशील आयुष्यापासून वेगळे काढलेले शिक्षण आणि धमक्या, भीती, लोभ, लाच यांच्या दबावाखाली घडवून आणलेले शिक्षण यापेक्षा प्रत्यक्ष (काम) करणे उपयुक्त. स्वतः दिशा ठरवलेले, हेतुपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी केलेले काम.
आज जगभर शिक्षणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे—-काही लोकांनी स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्यांना वळण लावणे, त्यांना आकार देणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिकायला लावणे—-असा. मी त्याचा विरोधक आहे. हे शिक्षण प्रभावी, कार्यक्षम, मानवी कसे करता येईल यावर वेळ घालवण्यात अर्थच नाही. ते आता नव्याने मानवी करता येणार नाही कारण त्याचा हेतू मानवी नाही.

पुढे वाचा

शिक्षणाचा हेतू : आनंद-निर्मिती

[“त्युन्साबरो माकीगुची’ या जपानी शिक्षणतज्ज्ञाची ओळख त्यांच्या ‘एज्युकेशन फॉर क्रिएटीव लिव्हिंग’ या पुस्तकातून होते. शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकांपैकी काहींनी कदाचित माकीगुचींचे नाव ऐकले असेल. १९४४ साली म्हणजे जपानमधील अणुसंहारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. माकीगुचीना कधीही फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेशी, आणि धर्मव्यवस्थेशी त्यांनी जन्मभर लढा दिला. एज्युकेशन फॉर क्रिएटीव लिव्हिंग वाचताना त्यांच्या संवेदनशील, बालककेंद्री शिक्षणविचारांची ओळख होते, तेव्हा त्यांच्या सखोल विचारांची प्रदीर्घ अनुभवांची आणि विलक्षण प्रेमळ, प्रसन्न स्वभावाची जाणीव होते. शिक्षण आनंदासाठी हवे, असे म्हणणाऱ्या माकीगुचींच्या व्यक्तिगत जीवनात मात्र आनंद अभावानेच आढळतो. तीन वर्षांच्या या मुलाला पोटाशी बांधून आईने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

पुढे वाचा

प्रज्ञांचे सप्तक

[शिक्षणाचा एक हेतू क्षमता-विकसन हा असावा हे अनेकांनी मांडलेले आहे. क्षमता असते आणि ती विकसित होते, होऊ शकते यावर विश्वास ठेवणे फारसे अवघड नाही. अजूनही काहींची ‘मूल म्हणजे मातीचा गोळा किंवा संगणक’ आणि ‘आकार देऊ तसे किंवा डाटा भरू त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व तयार होते’—-अशी कल्पना आहे. तर काहींचा संपूर्ण विश्वास ‘मूल आपल्यासोबत खास काही घेऊन येते, तेच व्यक्त होते’ असा आहे.
बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त बाब असून त्यात जीवनभरात फरक पडत नाही असे म्हटले जात होते. मूळ क्षमतेत फरक पडतो की नाही ही गोष्ट वेगळी पण बुद्धिमापनासाठी जी चाचणी वापरली जाते त्या पद्धतीची परीक्षा एकदा देऊन, पुन्हा दिली तर त्या ओळख झालेल्या परीक्षेत माणूस अधिक गुण मिळवू शकतो हे मात्र सिद्ध झालेले आहे.

पुढे वाचा

शिक्षणाचे बदलते हेतू : भारतातील दोनशे वर्षांचा इतिहास

कोणतीही समाजव्यवस्था ज्या अनेक खांबांवर उभी असते त्यांतील शिक्षण हा एक महत्त्वाचा खांब आहे. ‘शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे.’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो व उच्चारतो; पण हे अर्धसत्य आहे. शिक्षण हे जसे परिवर्तनाचे साधन आहे तसे ते परिवर्तन होऊ न देण्याचे, म्हणजेच आहे तीच व्यवस्था अधिक भक्कम करण्याचेही साधन आहे. उदाहरणार्थ भारतात ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य ह्या वरच्या तीन वर्णांव्यतिरिक्त अन्य समाजाला म्हणजे शूद्रातिशूद्रांना व सर्वच वर्णातील स्त्रियांना जे शिक्षण नाकारले गेले ते जातीच्या आधाराने उभारलेली पुरुषप्रधान रचना मजबूत करण्यासाठी. शूद्र जातीतील मुलांनाही आपल्या जातीचा धंदा चालविण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आपल्या बापाकडून शिकण्याची केवळ मुभाच नव्हे तर सक्ती होती.

पुढे वाचा

शिक्षण? कोण कोणाला हा प्रश्न विचारतोय?

१. नुकत्याच आमच्या घरकामाच्या बाई काम सोडून गेल्या. त्या नववी पास झालेल्या होत्या. त्यांच्या जागी ज्या बाई आल्या त्या अक्षरशत्रू. त्यामुळे बरीच गैरसोय झाली आहे. पूर्वी बाई कामावर आल्या तरी मी घरी असणे आवश्यक नसे. कागदावर सूचना लिहून ठेवल्या की भागत असे.
माझ्याकडे कार्यालयात साफसफाई, झाडलोट करण्यासाठी एक शिपाई होता. पाच वर्षांनीपण कामाचे स्वरूप तेच राहणार. मग त्याच कामासाठी पगारवाढीच्या स्वरूपात मी दरवर्षी जास्त पैसे का द्यायचे? पण मी त्या शिपायाची उपयुक्तता वाढवली. त्याला मुंबईतले सर्व पत्ते शोधायला शिकवले. अगदी कागदावर नकाशा काढून देऊन.

पुढे वाचा

भाषा शिक्षण कशासाठी?

भाषेची गोष्ट ‘अति परिचयात् . . .’ अशी आहे. एक तरी भाषा प्रत्येकाला अवगत असते. म्हणून तिच्याबद्दल कोणी स्वतंत्रपणे विचारच करत नाही. भाषा ही गोष्ट आपल्या अवयवांसारखी आपण गृहीत धरतो. आपल्याला हात असतात, पाय असतात, तशी आपली एक भाषा असते. भाषाक्षमता उपजत असते, पण भाषा उपजत नसते. पहिली भाषा माणूस सहज शिकतो, इतकी सहज, की आपण ती प्रयत्नपूर्वक शिकलो आहोत, हेच त्याला जाणवत नाही. भाषा, विशेषतः स्वभाषा किंवा मातृभाषा आपल्याला ‘आपोआप’ येते, अशी एक समजूत असल्यामुळे पुढे ‘मातृभाषा कशाला शिकायची?’ ‘मातृभाषेचे कोश कशाला पाहिजेत?’

पुढे वाचा

विज्ञान-शिक्षणाचा हेतू

शिक्षणाबद्दल चर्चा ही बरीचशी ‘आंधळे आणि हत्ती’च्या गोष्टीसारखी होत असते. शिक्षणतज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज इ. प्रत्येक घटकाचा शिक्षणाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. शिक्षणाविषयीच्या चर्चेत सहभागी होणाऱ्या व्यक्ती आपापल्या दृष्टिकोनातून विषयाची मांडणी करत राहतात. एकमेकांशी संवाद साधण्याचा फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. विज्ञान-शिक्षणाबाबत तर ही गोष्ट जास्तच प्रकर्षाने जाणवते. या संवादाच्या अभावामुळेच विज्ञान-शिक्षणाचा हेतू काय, या वरकरणी सरळ वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र गुंतागुंतीचे होते.
भावी पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, जिज्ञासू वृत्ती जोपासणे, या . . . उद्देशाने विज्ञान-शिक्षणाची आखणी व्हावी, अशी शिक्षणतज्ज्ञांची व समाजातील जबाबदार घटकांची अपेक्षा आहे.

पुढे वाचा

आरोग्यशिक्षणाचा हेतू

“आरोग्यशिक्षणाचा माझा हेतू काय?”, असा माझ्या वैयक्तिक हेतूंबद्दल कोणी प्रश्न विचारला तर मी म्हणेन की “मला जे वैद्यकीय ज्ञान मिळाले आहे त्यातील किमान आवश्यक तो भाग तरी लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात मला आनंद वाटतो म्हणून मी हे काम करतो.” या वैयक्तिक आवडीच्या शिवाय तितकाच महत्त्वाचा हेतू म्हणजे आज सामान्यपणे जे आरोग्यशिक्षण दिले जाते ते बरेचसे असमाधानकारक आहे, त्यामुळे चांगले आरोग्यशिक्षण करणाऱ्या प्रवाहात भर घालावी या हेतूनेही मी आरोग्यशिक्षण देतो.
अगदी थोडक्यात सांगायचे तर आरोग्याबद्दल त्याच्या सामाजिक पैलूंकडे दुर्लक्ष करून फक्त जीवशास्त्रीय पैलूंवर लक्ष केंद्रित करणारे, अनावश्यक माहितीचा डोलारा मांडून तज्ज्ञांचा अकारण दबदबा निर्माण करणारे किंवा त्याहून वाईट म्हणजे “हा प्रकार फार गुंतागुंतीचा मामला आहे.

पुढे वाचा

लैंगिकता शिक्षण कशासाठी? कुणासाठी?

‘आमच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम करायचाय. इ. ८ वी / ९ वी च्या मुलांसाठी/मुलींसाठी, तर तुम्ही याल का?’, असा प्रश्न प्रत्यक्ष किंवा फोनने, आणि सोबत एक त्याच मजकुराचे पत्र ही माझ्यासाठी वारंवार घडणारी गोष्ट. मी येईन’ असे म्हणते आणि विचारते, ‘हा कार्यक्रम का आयोजित करावा असे वाटते आहे?’ या प्रश्नाच्या उत्तरात, ‘आम्ही दरवर्षी करतो/आम्हाला तसा आदेशच असतो’, अशी उत्तरे तरी असतात किंवा मुला मुलींचा या वयात पाय घसरू नये, त्यांना आजारांचा, गर्भारपणाचा धोका समजावा असा समस्यानिवारणाचा हेतू असतो.
माझ्या प्रश्नाला अपवाद म्हणून सुद्धा आजवर एकानेही मुलामुलींना स्वतःच्या लैंगिकतेची जाणीव होताना न्यूनगंड येऊ नये, मोकळेपणाने प्रश्न विचारायला अवकाश मिळावा, असे उत्तर दिलेले नाही.

पुढे वाचा