भारतीय संस्कृती आणि स्टेम सेल्स या सकृद्दर्शनी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी शीर्षकात एकत्र गुंफल्या आहेत. “ वा, युवा, मघवा” प्रमाणेच हे वाटेल, पण मी काही ‘पाणिनी’ असल्याचा दावा करीत नाही. त्यामुळे या दोन्हीमधील ‘अ-व्याकरणीय’ संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी मी अर्थातच स्वीकारतो. पण त्यापूर्वी या दोन्ही गोष्टींच्या मला अभिप्रेत असलेल्या व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट करणे योग्य ठरेल.
भारतीय संस्कृती :– माणूस या जगात कसा वागतो, कसा बोलतो, कसा विचार करतो याला एकत्रितपणे मानवी वर्तणूक किंवा वागणूक (Human Behaviour) असे म्हणतात. मानवी वर्तणूक ही दोनच गोष्टींवर अवलंबून असते.