विषय «इतर»

शालेय शिक्षण – एक अभिनव प्रयोग (उत्तरार्ध)

भावनिक आरोग्याच्या शिक्षणाचे स्वरूप
वरील पद्धतीने प्रशिक्षण घेतलेले शिक्षक ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील मुलांना भावनिक आरोग्याविषयी जे शिक्षण देत असत, त्यात मुख्यतः कोणत्या संकल्पनेचा समावेश करण्यात आला होता, ते पाहू. या संदर्भात प्रथम असे स्पष्टपणे नमूद करावयास हवे, की मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देताना शिक्षक विवेकनिष्ठ मानसोपचारातील एका मूलभूत संकल्पनेवर भर देत असत. आणि वस्तुतः ती संकल्पना म्हणजे पूर्वेकडील व पश्चिमेकडील अनेक देशांमधील बऱ्याच तत्त्ववेत्त्यांनी वारंवार प्रतिपादलेल्या एका सिद्धान्ताची पुनर्मांडणी आहे. तो सिद्धान्त असा, की माणूस केवळ त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळेच भावनिकदृष्ट्या प्रक्षुब्ध होत नसतो; त्या घटनांचे तो आपल्या मनातील अविवेकी दृष्टिकोणांनुसार किंवा अविवेकी जीवनतत्त्वज्ञानानुसार जे विशिष्ट विवरण आणि मूल्यमापन करतो, त्यामुळे स्वतःला प्रक्षुब्ध करून घेतो.

पुढे वाचा

कलाम यांनी विचारले संपादकांना प्रश्न

देशाच्या राष्ट्रपतींनी पत्रकारांना प्रश्न करून बुचकळ्यात टाकावे, असा दुर्मिळ योगायोग आज घडला.

वृत्तपत्रांच्या आणि वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना ते आपल्या चिरपरिचित शैलीत म्हणाले की, आपण मला प्रश्न करीत असता. आज मला आपणास काही प्रश्न करायचे आहेत.
‘एडिटर्स गिल्ड’ या पत्रकार संघटनेने राष्ट्रपतींशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या परिषदेत कलाम यांनी संपादकांना चार प्रश्न विचारले. त्यांचे उत्तर कुणालाही देता आले नाही. विकसित भारताच्या ध्येयात वृत्तपत्रे सहभागी होऊ शकतात काय? वृत्तपत्रांना पुरेसे स्वातंत्र्य आहे काय? वांशिक संघर्ष थांबविण्यासाठी काय करायला हवे? तुम्हाला सर्वाधिक चिंतेत टाकणारी बाब कोणती?

पुढे वाचा

उपयोगितावादाचे टीकाकार

उपयोगितावाद ही उपपत्ति नीतिमीमांसाक्षेत्रात जाहीर झाल्याबरोबर तिच्यावर नीतिमीमांसक तुटून पडले. त्यांत विविध मतांचे बहुतेक सर्व नीतिमीमांसक होते. उप-योगितावादाचे खंडन हा नीतिविचारक्षेत्रात तत्त्वज्ञांचा प्रधान उद्योग होता. उपयोगिता-वादाचे विरोधक नवनवीन आक्षेप हुडकून काढीत होते, आणि ते आक्षेप प्रतिपक्ष्याला निरुत्तर करणारे आहेत असे या क्षेत्रात सामान्य मत होते. आ चर्य हे की या हल्ल्यातून उपयोगितावाद बचावला. आणि दीडदोनशे वर्षानंतर आजही तो निर्भयपणे, ताठ मानेने उभा आहे.
हे आक्षेप काय होते? ते खरोखर निरुत्तर करणारे होते काय? इ. प्रश्नांचे उत्तर आज द्यायचे आहे. विवेचनाच्या सोयीसाठी येथे फक्त महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तीन-चार आक्षेपांचा विचार करणार आहे.

पुढे वाचा

ऐलतीर–पैलतीर

या लेखात तुम्हाला ‘साठी’ पार केलेल्या पण आजही झेपेल तेवढे काम करणाऱ्या व या कामातून—किंवा विरंगुळ्यातून म्हणा हवे तर—आनंद अनुभवणाऱ्या वृद्धयुवांची ओळख करून देणार आहे. हे वृद्ध युवक किंवा युवावृद्ध ‘विज्ञानवाहिनी’ या संस्थेचे सदस्य आहेत; काही वास्तविक युवक/युवतीसुद्धा विज्ञानवाहिनीत आहेत.
या वृद्धांपैकी काही जणांचा तर ‘पैलतीर’ या संकल्पनेवरच विश्वास नाही. काहींचा असेल पण त्यांची मने ऐलतीरावरच आहेत. कदाचित बऱ्याच वेळा शालेय मुलांच्या संपर्कात असल्याने असे झालेले असेल. त्यांची वैयक्तिक ओळख करून घेण्याआधी त्यांना लाभलेल्या ‘विज्ञानवाहिनी’ या आनंदस्रोताची थोडी ओळख करून घ्यायला हवी.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ९

व्यापारी वनिकी

स्वातंत्र्याच्या चळवळीने भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि समाजाच्या पुनर्निर्माणाचे दोन ‘नमुने’ पुढे आणले. पंचायत राज, खादी ग्रामोद्योग, प्रार्थना-उपवासासारख्या लोकतंत्रांचा वापर, हा म. गांधींचा नमुना होता—-अभिजात हिंदू परंपरेपेक्षा सामान्य लोकधाटीला जवळ असलेला. गांधींची जनमानसाला ‘हलते’ करण्याची हातोटीही विलक्षण प्रभावी होती. त्यांच्या आदर्शाचा भर शेतकऱ्यावर होता, पण उद्योजकाला विश्वस्त’ मानण्याच्या ढगळ कल्पनेमुळे भारतीय उद्योजक-भांडवलशहांनाही त्या आदर्शात स्थान होते.
दुसरे आदर्श घडवणारे औद्योगिकीकरणाला (पर्यायाने पाश्चात्त्यीकरणाला) पर्याय नाही, असे मानणारे होते—- ढोबळ मानाने नेहरूंचे पाठीराखे. या आदर्शाचा एक प्रवक्ता असलेले सर मोक्षगुंडम वि वे वरय्या १९२० साली म्हणाले —-
“(भारतीयांना) सुशिक्षित व्हायचे की अडाणी राहायचे ते ठरवावे लागेल.

पुढे वाचा

शालेय शिक्षण – एक अभिनव प्रयोग (पूर्वार्ध)

प्रयोगाच्या संकल्पनेचा उदय
सुविख्यात अमेरिकी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस त्यांच्याकडे येणाऱ्या मनोरुग्णांवर अधिकाधिक परिणामकारक रीतीने मानसोपचार करण्यासाठी जे प्रयोग करून पाहत होते, त्यांमधून १९५५ साली एक नवे मानसोपचारशास्त्र उदयाला आले. त्याला विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र असे म्हणता येईल. त्या शास्त्राचा विकास व प्रसार करण्यासाठी डॉ. एलिस यांनी १९५९ साली न्यूयॉर्क शहरातील आपल्या राहत्या घरातच एका संस्थेची स्थापना केली. आज ‘अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क शहरातील या संस्थेची टोलेजंग इमारत, म्हणजे त्या संस्थेशी संलग्न असे त्या जगातील अनेक छोट्या-मोठ्या संस्थांचे केन्द्रस्थान आहे.

पुढे वाचा

फिरून एकदा रोजगार!

गेल्या वर्षी थांबवलेली अर्थकारणविषयक लेखमाला आता सुरू करीत आहे. जानेवारी अंकामध्ये श्री. जयंत फाळके ह्यांचा लेख आणि श्री. खरे ह्यांचे संपादकीय ह्या लेखमालेच्या पुनरुज्जीवनाला कारणीभूत ठरले आहेत. सध्याची अर्थकारणाची घडी बदलावयाला पाहिजे हे नक्की. रोजगार वाढता ठेवणे व तो टिकवून ठेवणे, ही समस्या एकट्या भारताची नाही; जगातल्या सर्वच राष्ट्रांची आहे.
प्रथम भारताचा विचार करू या. गेल्या दीड-दोन शतकांपूर्वीपर्यंत भारतात रोजगार हे उपजीविकेचे साधन नव्हते. त्यामुळे बेरोजगारी ही समस्याच नव्हती. इंग्रजांच्या आगमनानंतर त्यांनी ज्या अनेक घातक गोष्टी आणल्या, त्यांमध्ये रोजगारीची संकल्पना ही एक होय.

पुढे वाचा

कमीत कमी

कमीत कमी
देश गरीब आहे. एखादे वेळी हा सर्वात गरीब देश असेल. तरीही म्हणा किंवा त्यामुळे म्हणा, आपण देशातील सर्वांसाठी एका किमान उपभोगाच्या पातळीचा विचार करायला हवा. देशातील प्रत्येक व्यक्तीला एवढ्या तरी उपभोगाची हमी लवकरात लवकर देणे, हे विकासाच्या नियोजनाचे उद्दिष्ट असायला हवे. जीवनावश्यक उष्मांक (कॅलरीज) तरी पुरवणारा आहार, यापेक्षा कमी उपभोग शक्य नाही. इतर कोणता चांगला निकष हाती नाही, तेव्हा आपण ह्या उपभोगालाच देशव्यापी आणि ‘हवासा’ उपभोग मानू. एवढा तरी उपभोग करता येण्याइतके उत्पन्न देशातील प्रत्येकाला मिळायला हवे.
. .

पुढे वाचा

खादी–ग्रामोद्योग–स्वावलंबन संकल्पनासमूह

खादी हा एक स्वीकार्य अर्थव्यवहार असू शकत नाही या विचाराची मोहनींची मांडणी व्यवस्थित आहे. रोजगार केवळ निर्वाहापुरता असला तर ती एक प्रकारची गुलामगिरीच आहे. कमी श्रमांत जास्त उपभोग मिळवण्याची इच्छा, रिकामा वेळ उपलब्ध करून घेणे व त्याचा वैयक्तिक आनंदासाठी (उपभोगासाठी) वापर, कला, विद्या, शास्त्रे यांची आवश्यकता वाटणे–त्यांत रस वाटणे, इत्यादि माणसाच्या प्रवृत्ती नैसर्गिक आहेत हे मान्य केले म्हणजे खादी–ग्रामोद्योग–स्वावलंबन हा संकल्पनासमूह आता कालबाह्य झाला आहे, त्याचे वैचारिक किंवा भावाध्यात्मिक (spiritual) समर्थन होत असले तरी ते ‘काप गेले–भोके राहिली’ या सदरातले आहे, नवीन आर्थिक संकल्पनांच्या विचारांमध्ये त्याला थारा द्यायची आवश्यकता दिसत नाही.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ८

संघर्षाच्या वाटा आणि व्याप्ती

इंग्रज भारतात येण्याच्या आधीही संकलक समाजांच्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या समाजांचा दबाव असे. पण शेतकऱ्यांचा जंगलांवरचा दबाव सौम्य असे. मिरे, वेलदोडा, हस्तिदंत अशी उत्पादने वगळता शेतकरी जंगलांकडून फार अपेक्षा ठेवत नसत. व्यापारीकरणाने मात्र हे चित्र बदलले. स्थानिक लोकांचे वनावरील हक्क संपुष्टात आले; वनव्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांच्या डोक्यावरून हटली; आणि जंगलांचे स्वरूपही बदलले. ओक व बेहडा कुळातील वृक्ष सरपण, पाचोळा, फुटकळ इमारती लाकूड पुरवत असत. आता त्यांचा नायनाट होऊन सागवान– देवदारावर भर वाढला. या वृक्षांना स्थानिक उपयोगच नव्हते, ती शुद्ध व्यापारी ‘पिके’ होती.

पुढे वाचा