मथुरेच्या जवळचे वृन्दावन म्हणजे विधवांचे क्षेत्र. हतभागिनी, फुटक्या कपाळाच्या मानल्या गेलेल्या ह्या विधवा येथे समाजापासून तोंड लपवून कृष्णाची पूजाअर्चा करीत कसेबसे आयुष्य कंठतात. ह्या वर्षी त्यांच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट घडली. त्या चक्क होळी खेळल्या. सण-उत्सवात त्यांना सहभागी होऊ न देणाऱ्या प्रथा-परंपरा धाब्यावर बसवून त्यांनी जल्लोष साजरा केला. त्या गाणी गायल्या, नाचल्या. एकमेकींच्या अंगावर त्यांनी गुलाल आणि फुले उधळली. कुटुंबसंस्थार्फत महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या बळी ठरलेल्या महिलांचे हे पवित्र क्षेत्र तसे दरवर्षीच धुळवडीचा सण साजरा करते, पण अगदी हळू आवाजात. आपापल्या आश्रमांच्या आतमध्येच कृष्णाच्या रासलीलेतील दृश्ये त्या साकार करतात.
विषय «इतर»
पत्रसंवाद
प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक gpraven 18feb@gmail.com
बंजारा समाजातील ढावलो गीते हा सुनंदा पाटील यांचा लेख आजचा सुधारक च्या डिसेंबर २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. मी गेल्या काही वर्षांपासून आजचा सुधारकचा नियमित वाचक आहे. माझं अत्यंत नम्र आणि प्रामाणिक मत आहे की, आजचा सुधारकमध्ये असं लेखन प्रसिद्ध झालेलं नाही. त्यामुळे अंकात हा लेख बघून थोडासा धक्का बसला. काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. या लेखाच्या गुणवत्तेबद्दल मत अथवा अभिप्राय व्यक्त करण्याचा माझ्यापाशी अभ्यास नि अधिकार नाही. पण गेल्या काही वर्षांचा वाचक म्हणून माझ्याकडे असलेल्या अनुभवाच्या आधारे हे मत मी मांडत आहे.
विक्रम आणि वेताळ
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
राजा, खरेतर नियमाप्रमाणे मला तुला गोष्ट सांगणे आणि त्यानंतर प्रश्न विचारणे भाग आहे, पण खरे सांगू? आज कोणतीही नवीन गोष्ट तुला सांगण्याची अजिबात इच्छा नाही बघ. त्यापेक्षा असे करू या का? आपला जो हा उद्योग कित्येक वर्षांपासून, नव्हे शतकांपासून चालू आहे, तू, म्हणजे राजा विक्रमादित्याने, प्रेत उचलून खांद्यावर टाकायचे आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागायचे, मग मी जागे होऊन तुला एक गोष्ट सांगायची आणि त्या आधारावर प्रश्न विचारावयाचे, त्यावर तुला उत्तर द्यावयास बाध्य करून तुझ्या मौनव्रताचा भंग करावयाचा आणि मी लगेच झाडावर जाऊन लोंबकळावयास लागावयाचे.
मानवी अस्तित्व (८)
मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?
आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुरूप वागतो की आपल्याकडून कोणी हे करून घेते याबद्दल नेमके भाष्य करणे जवळजवळ अशक्य आहे. रेने देकार्त (१६४४) म्हणून एक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याने हे जग खरोखर आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. जग आहे का म्हटल्यावर त्यातील चराचर सृष्टी आहे का असाही प्रश्न ओघाने आलाच. पैकी चेतन सृष्टीतला जो मी आहे, तो तरी खरा आहे का इथपर्यंत त्याची शंका पोहोचली. मग त्यावर, अशी शंका घेणारा कुणीतरी आहे, म्हणजे मग तोच मी आहे असे त्याने स्वतःच्या प्रश्नाला उत्तर दिले.
पुनर्निर्मितिक्षम ऊर्जा : भविष्यातील ऊर्जाप्रणालीचा पाया
मानवाच्या विकासासाठी व उपजीविकेसाठी पुरेशी, किफायतशीर व अप्रदूषित ऊर्जा अत्यावश्यक आहे. मानवाला सुस्थितीत सन्मानाने जगण्यासाठी ज्या मूलभूत सोयी लागतात त्यासाठी ऊर्जा गरजेची आहे. परंतु भारतातील ऊर्जेची परिस्थिती या दृष्टीने खचितच समाधानकारक नाही. विविध ऊर्जानिर्मिती करताना होणारे प्रदूषण आपल्याला माहीत आहे. या अंकातील इतर लेखांमध्येही त्याबद्दल मांडणी आलेली आहे. प्रदूषण न करणारी म्हणून पुनर्निर्मितिक्षम ऊर्जेबद्दल बोलले जात आहे.
पुनर्निर्मितिक्षम ऊर्जेबद्दल विस्ताराने चर्चा करण्यापूर्वी ऊर्जेच्या स्रोतांविषयी जाणून घेऊ या. निसर्गात दोन प्रकारचे ऊर्जास्रोत आढळतात, 1) ऊर्जेचे साठे उदा. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व युरेनियम, 2) ऊर्जेचे प्रवाह उदा.
ऊर्जेचे झाड
अंतर्गोल भिंगातही वस्तूंचा आकार लहान दिसतो, आपल्या दृष्टिकोणात मावतो.
आपल्याला ऊर्जा हवी असते आणि ती वेगवेगळ्या मार्गांनी उपलब्ध होते. समजा, ऊर्जेचे एक झाड आहे. त्या झाडालाही एकूण 1000 फळे आहेत. सर्वजण ह्या ऊर्जेच्या झाडाकडे फळे गोळा करण्यासाठी जातात.
या फळांचे दोन प्रकार आहेत. एक व्यापारी ऊर्जेचा (कोळसा, तेल, वीज), आणि दुसरा अव्यापारी म्हणजे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या शेणगोवऱ्या, जळाऊ लाकूडफाटा इ.चा आहे. अर्ध्या लोकसंख्येला अव्यापारी- 450 फळे मिळतात.
उरलेल्या अर्थ्यांना 550 – व्यापारी ऊर्जेची फळे मिळतात. (140 कोळसा, 330 खनिज तेल उत्पादने व 80 वीज.)
कार्यक्षम ऊर्जावापर
विजेची परिणामकारक बचत होण्यासाठी कार्यक्षम ऊर्जा-वापर करणाऱ्या विद्युत-उपकरणांचा वापर वाढावा लागेल. त्याच उद्देशाने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी या संस्थेने दोन कार्यक्रम आखले आहेत. पहिला विद्युत-उपकरणे कार्यक्षमतेनुसार तारांकित करण्याचा आणि दुसरा अतिकार्यक्षम उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना आर्थिक उत्तेजन देण्याचा आहे. त्यांची आखणी आणि अंमलबजावणी यांचा चिकित्सक आढावा घेणारा लेख.
भारतातील 1/3 घरांत अद्याप वीज पोहोचलेली नाही. जेथे वीज आहे, तेथेही विजेचे भारनियमनाचा काच आहेच. एकीकडे भारताची ऊर्जा-गरज येत्या 20 वर्षांत दुपटी-तिपटीने वाढणे अपेक्षित आहे; तर दुसरीकडे विजेची कमतरता जी 1990-91 मध्ये 7.7 टक्के होती ती 2009-2010मध्ये 10.1%नी वाढलेली आहे.
ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य
ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य
जनतेला ऊर्जासेवा देण्यासाठी अनेकविध तंत्रविज्ञानात्मक संधी आता उपलब्ध आहेत. त्यामुळे विकसनशील देश विकसित देशांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून सरळ पुढच्या टप्प्यावर पोहोचू शकतात. त्यांच्या सर्जनशील प्रयत्नांमधून जगाला लक्षवेधी वाटावे असे तंत्रज्ञानही निर्माण होऊ शकते.
विकसित देशांत नवीन ऊर्जा प्रतिमान अंमलात आणले गेले तर कमी ऊर्जावापराची शक्यता निर्माण होईल व त्याद्वारे विकसित व विकसनशील देशांच्या ऊर्जावापरातील दरी कमी होत जाईल.
मुख्य म्हणजे आजवरच्या सामान्य समजुतींपेक्षा वेगळा असला तरी समुचित उद्दिष्टांवर आधारित योग्य धोरणात्मक दृष्टिकोण ठेवला तर आपल्याला दिसून येईल की ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य हे नियतीवर नसून आपल्या निवडीवरच अवलंबून आहे.
संपादकीय
भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारभूत संरचनेमध्ये ऊर्जाक्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. 1980 पर्यंत भारतीय ऊर्जाक्षेत्रात भरीव प्रगती झाली, परंतु त्यानंतरच्या काळात जवळजवळ सर्व राज्यांच्या वीज मंडळांच्या कामकाजात आर्थिक, तांत्रिक, शासकीय पाळ्यांवर अपयश येऊ लागले. 1990मध्ये राज्यसरकारच्या मदतीने खाजगी कंपन्यांनी वीज-उत्पादन-क्षेत्रात प्रवेश केला, परदेशी वित्तसंस्थांच्या मदतीने अनेक राज्य वीजमंडळांची पुनर्रचनाही करण्यात आली.
हे करूनही पुरेसे यश पदरात पडले असे नाही. त्याउलट या सुधारणांच्या काळातच एन्रॉन घोटाळा, ओडिशातील सुधारणांना आलेले सर्वमान्य अपयश असे घडत गेले आहे. नवीन धोरणे व त्यांची तंत्रे याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न-शंका उभ्या राहिल्या, त्यानंतर सरकारतर्फे नवीन शासनपद्धती, नवी व्यूहरचना व नवे वीजदर-धोरण ठरवण्यात येत आहे.
ऊर्जासंकटावर उपाय
अनुवाद : नीलिमा सहस्रबुद्धे
स्वस्त देशी खनिज कोळसा गरिबांच्या ऊर्जागरजांसाठी राखीव ठेवावा. श्रीमंतांना मात्र पुनर्निर्मितिक्षम ऊर्जास्रोतच वापरण्यास भाग पाडावे.
मोटारीने 35 कि.मी. प्रवास करायला जितकी ऊर्जा खर्च होते, तेवढ्याच ऊर्जेत एक LED ट्यूबलाईट वर्षभर रोज चार तास वापरता येतो.
जगातल्या बहुसंख्य देशांना, त्यातल्या समाजांना आप्पलपोटेपणाने ऊर्जावापर करत राहाण्याची सवय जडलेली आहे. गेल्या काही काळातच आपले त्याकडे लक्ष जायला लागलेले आहे. हा मंदीचा काळ असल्यामुळे आणि आपल्याला सर्वांनाच पर्यावरणीय संकटांची चाहूलही लागलेली असल्याने ऊर्जावापर कमी करणे आता अगदी अत्यावश्यक झालेले आहे. असे असूनही संपूर्ण जगाचा ऊर्जावापर गेल्या दहा वर्षात अगदी जोरकस वेगाने वाढतच चाललेला आहे.