विषय «इतर»

टिप्पणीविना: स्वच्छतेची झळी

गेल्या दोन वर्षांपासून पुणे येथील कचरावेचक संघटना सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या कंपन्यांचे लक्ष वेधू पाहात आहेत. ह्या संघटना सॅनिटरी पॅडही उचलतात, परंतु त्यांनी शेवटपर्यंत ह्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यामुळे स्वच्छ पुणे सहकारी संस्था मर्यादित ह्या संस्थेला एक आगळे पाऊल उचलावे लागले. ह्या कामातील प्रॉक्टर गॅबल्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, जॉन्सन जॉन्सन आणि किंबले क्लार्क लिव्हर ह्या चारही कंपन्यांना, वापरलेल्या सॅनिटरी पॅडचे गट्ठे बांधून त्यांनी चक्क परत पाठवले. आम्ही ह्याचे काय करायचे ते सांगा, असा त्यांचा खडा सवाल आहे.
आपल्या वस्त्रांध्ये होऊ लागलेला कृत्रिम धाग्याचा बेसुार वापर आणि प्रजननक्षम वयातील युवतींना बराच वेळ घराबाहेर राहण्याची करियरसक्ती ह्यांळे सॅनिटरी पॅड आजच्या युगात अनिवार्य मानले गेले आहेत.

पुढे वाचा

तुह्या धर्म कोंचाः एका महत्त्वाच्या विषयाचे हृदयस्पर्शी चित्रण

आदिवासी’ ह्या शब्दाचा अर्थ मूळचे निवासी असा असला, तरी भारतातल्या सुारे पावणेसात कोटी आदिवासींचे अनेक शतकांपासून येथे पद्धतशीरपणे शोषणच होत आहे. आपल्या देशात नक्षलवादी चळवळ सुरू होण्याचे मूळ कारणदेखील हेच आहे हे आता सर्वान्य झाले आहे. हे आदिवासी पूर्वीपासून जंगलातच राहत आले आहेत, मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्वतःला येथील वनांचे मालक जाहीर करून त्यांचे मूळ मालक असलेल्या आदिवासींना एका झटक्यात अतिक्रमित ठरवून टाकले. स्वातंत्र्यानंतर गेल्या साठ वर्षांत जर काही बदल झाला असेल तर तो एवढाच की आदिवासींच्या आपत्ती आणखी वाढल्या आहेत. लेखक-दिग्दर्शक सतीश मनवर ह्यांनी ‘गाभ्रीचा पाऊस’ हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरचा उत्कृष्ट चित्रपट काढून चित्रपटाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (१०)

हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का?

प्रचंड अंतरावरील एखाद्या दुसऱ्या दीर्घिकत आपल्यासारखीच एक आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेतसुद्धा आपल्या येथील सूर्यासारखा तारा आहे. या तारेपासून पृथ्वीसारखाच दिसणाऱ्या एका तिसऱ्या ग्रहावर तुच्यासारखाच दिसणारा अस्तित्वात आहे. तुच्यासारखाच तो जीवन जगत आहे. एवढे कशाला, तुम्ही आता जे वाचत आहात तेच तो तिथे वाचत आहे. अगदी तीच ओळसुद्धा….
आश्चर्याचा धक्का बसला ना? ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्यासारख्या दिसणाऱ्या लाखो दीर्घिका या ब्रह्मांडात आहेत व यापैकी एखाद्या दीर्घिकेतील ग्रहावर तुचीच छाया प्रती असलेली माणसे राहतात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

श्याम कुलकर्णी, sgk664@gmail.com
वाढता हिंसाचार व स्त्रीपुरुषसंख्येतील असमतोल
श्री. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या लेखातील विचार एकांगी वाटतात. प्रत्यक्षात बलात्काराच्या वाढत्या घटना व स्त्रीगर्भाची हत्या करण्याची प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी अतिशय तिरस्करणीय व दंडनीय आहेत. परंतु या दोन्ही गोष्टींकडे जितक्या गांभीर्याने राज्यकर्त्यांनी पहायला हवे तितक्या गांभीर्याने त्यावर विचार केला जात नाही हेच या समस्योगील मूळ कारण आहे. किंवा राज्यकर्त्या जमातीतील काही व्यक्ती त्यात सामील असल्यामुळेच अशा गुन्ह्यांना अतिशय कठोर शिक्षाच काय पण शिक्षाच होण्याची शक्यता दिसत नाही. अश्या व्यक्ती लैंगिक भूक न भागल्यामुळे नाही तर केवळ सहज उपलब्ध होतात व नंतर त्याचा कोणास पत्ताही लागत नाही याची खात्री असल्यामुळेच अशा संबंधांना चटावतात.

पुढे वाचा

भाकीत

पोर नागवे कभिन्न काळे
मस्त वावरे उघड्यावरती
बाप बैसला झुरके मारीत
चूल पेटवी मळकट आई
भिंतीमागे पॉश इमारती
कंपनी तेथे संगणकाची
थंड उबेधी लठ्ठ पगारी
कोडी सोडवत जगप्रश्नांची
कोण सोडवील कोडी इथली
उघड्यावरच्या संसाराची,
रस्त्यावरच्या अपघातांची,
मरू घातल्या वन रानांची?
पोर नागवे चालत चालत
जाईल का त्या इमारतीत
बसेल जर ते संगणकावर
कोडी सोडवील तेही झटपट
– अनिल अवचट (मस्त मस्त उतार मधून साभार)

स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आणि मार्क्सवाद

मार्क्सवादाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्क्सवादात किंवा साम्यवादी राज्यकर्ता असलेल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य नसते. मार्क्सवाद हा लोकशाहीविरोधी आहे; असे मत होण्याला अर्थात काही कारणे आहेत. काही मार्क्सवाद्यांच्या भूमिकाही त्याला कारणीभूत आहे. एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत अप्रगत अशा भांडवली देशात म्हणजे रशियात क्रांती झाली. तिकडे झारशाही होती. भांडवली लोकशाही नव्हती. प्रगत भांडवली देशात पहिली क्रान्ती होईल असे मार्क्सने भाकित केले होते. परंतु क्रांती झाली ती लोकशाही नसलेल्या झारशाही रशियात. ग्रामशी या इटालिअन मार्क्सवाद्याने त्या क्रांतीला मार्क्सविरोधी क्रान्ती असे म्हटले आहे.

पुढे वाचा

भाषा, जात, वर्ग इत्यादी

[पालकनीती मासिकात आलेल्या किशोर दरक ह्यांच्या शिक्षणाच्या माध्यमाचे राजकारण ह्या लेखावर दिवाकर मोहनी ह्यांनी दिलेला प्रतिसाद, त्यामध्ये भाषिकदृष्ट्या महत्त्वाचे अनके मुद्दे असल्यामुळे, आसु च्या वाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीतआहोत. – संपा.]

श्री. दरक म्हणतात, “शालेय शिक्षणाची भाषा किंवा जगाची कोणतीही भाषा Nutral (तटस्थ) नसते, तर त्या भाषेला जात, लिंग, धर्म, वर्ग, भूगोल व इतिहास असतात.” माझ्या मते भाषेचे हे गुण तिच्या ठिकाणी अंगभूत (जन्मजात) नसतात, तरते चिटकविलेले असतात. भाषा मुळात तटस्थच. पुढे त्यांनी इंग्रजीची तरफदारी केलेली आहे. आणि तिच्या वापरामुळे मुलांचे कल्याण होईल असे सुचविले आहे.

पुढे वाचा

अनवरत भंडळ (३)

मन व अंतःकरण
आपल्या अस्तित्वाची अनेक अंगे अथवा घटक असतात. पदार्थय भौतिक शरीर हा एक घटक, प्राण दुसरा, मन तिसरा, बुद्धी चौथा आणि जाणीव हा आणखी वेगळा घटक आहे. त्याखेरीज आत्मा हाही एक घटक अति-महत्त्वाचा असल्याचे अध्यात्म मानते, परंतु आत्म्याचे अस्तित्व हा वादाचा विषय आहे. प्राण आणि बुद्धीच्या मधात मन आहे. मन म्हणजे वासना, भावना, विचार अथवा कल्पना नव्हे. माझ्या मनात कल्पना आली किंवा विचार आला असे आपण म्हणतो. म्हणजेच आपण मनाला कल्पनेपेक्षा किंवा विचारापेक्षा वेगळे मानतो. थोडे तटस्थ होऊन आपण आपल्या मनाला न्याहाळले तर असे दिसून येते की त्यात अनेकानेक भावना, कल्पना, विचार तरंगत येतात.

पुढे वाचा

संयत पण ठाम

एक मे महाराष्ट्र दिन. अलिकडे तो राजभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्या दिवशी एक वाईट बातमी कळली. सामंत बाई गेल्याची… अगोदर राजभाषा मराठीची व त्यानंतर शेवटपर्यंत मराठी भाषेची निरलसपणे सेवा करणाऱ्या बाईंनी अखेर जाण्यासाठीही तोच दिवस निवडावा!
अभ्यास, करियर वा चळवळ करण्यासाठी ‘भाषा हा विषय अगदीच दुर्लक्षित व बिनमहत्वाचा वाटला जाण्याच्या काळात त्यांनी तो आपल्या आवडीचा विषय म्हणून स्वीकारला, जोपासला. सुसंस्कृत समाजाला चांगल्या भाषेची आवश्यकता का असते, ती कशी पूर्ण व्हायला हवी, तसेच तिचे संवर्धन न केल्यामुळे समाजाचे काय नुकसान होते ह्यावर त्यांनी जोरकसपणे मांडणी केली.

पुढे वाचा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीविचार

शिांतिवन कुष्ठधाम ह्या गांधीवादी संस्थेत काही महिन्यापूर्वी रा. स्व. संघाची उच्चस्तरीय बैठक पार पडली व तीत मोहन भागवतांपासून ते तोगडियांपर्यंत अनेक नेते हजर होते ह्या बातमीने सध्या सर्वत्र खळबळ माजवली आहे. महत्त्वाची बाब ही की त्यामुळे गांधीवादी संस्था व संघपरिवार ह्यांच्या परस्पर-संबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुळात गांधींचे रामराज्य व संघाचा हिंदुत्ववाद ह्यांतील मूलभूत फरक खुद्द गांधीवादी मंडळी विसरली व त्यामुळे खादी व खाकी ह्यांच्यातील फरकही—विचाराच्या तसेच आचाराच्या पातळीवर – दिसेनासा झाला, ही प्रक्रिया बरीच जुनी आहे. हिंदुत्वाला खरा धोका गांधींपासून आहे, बोलघेवड्या निधर्मीवाद्यांपासून नाही हे सर्व छटांच्या हिन्दुत्ववाद्यांना फार आधीपासून माहीत आहे.

पुढे वाचा