[क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट या पुस्तकाच्या आधाराने अमेरिकन शेतीचा खालील इतिहास रेखला आहे.
अश्विन परांजपे (वय वर्षे ३५) हा भारतात B.Sc. (Agri.) शिकून व अमेरिकेत फलोद्यानशास्त्रात M.S. करून आज पुण्याजवळ शेतीक्षेत्रात अनेक प्रयोग करत आहे. त्याने लेखात जागोजागी त्याची निरीक्षणे नोंदली आहेत…]
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे राष्ट्र १७७६ साली जन्माला आले. गेल्या दोन-अडीच शतकांत ते जगातील सर्वांत प्रबळ व श्रीमंत राष्ट्र झाले आहे. आज अमेरिका म्हणजे केवळ हे राष्ट्र असे लिहिले-बोलले जाते. भौगोलिक संदर्भ द्यायचे झाले तर मात्र उत्तर अमेरिका खंड, असे म्हणावे-लिहावे लागते.
विषय «इतर»
भारतीय शेतीचे काय करायचे?
अमेरिकेत सरकारने १८६० ते १९०० या काळात ५० कोटी एकर जमीन आठ कोटी शेतकऱ्यांना विकली असा एक उल्लेख आहे. (क्रिस्टफर डी. कुक : डायेट फॉर दी डेड प्लॅनेट). प्रत्यक्ष लागवडीखालील शेतजमीन ५० कोटी एकर किंवा थोडी कमी जास्त असावी. ट्रॅक्टर्सची संख्या १९११ ते १९२० या काळात चार हजारांवरून अडीच लाखांवर गेली.
भारतातील महत्त्वाच्या पिकांखाली २००३-०४ साली ३८ कोटी एकर जमीन होती. १९९९-२००४ या काळात दरवर्षी सरासरी २.३३ लाख ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. देशातील एकूण ट्रॅक्टर्स (वापरातील) संख्या भारत सरकारच्या २००४-०५ च्या वा नंतरच्या वार्षिक आर्थिक समीक्षेत दिलेली नाही.
अमेरिकन शेती आणि भारत
तसे पाहिले तर अमेरिका (यूएसए) हा कोणाचेही कुतूहल चाळवणाराच देश आहे. अवघ्या ४५०-५०० वर्षांत शून्यातून उभे राहून हा देश आज सर्व जगात बलाढ्य देश झाला आहे. साहजिकच प्रत्येक गोष्ट अमेरिकेत कशी होते हे जाणून घेण्याकडे आपला कल असतो. पण तत्पूर्वी काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे.
अमेरिकेचे क्षेत्रफळ ९३.८ लक्ष चौ. किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ ३२.९ लक्ष चौ.कि.मी. आहे. अमेरिकेची लोकसंख्या २८ कोटी (२००५) तर भारताची लोकसंख्या १०३ कोटी (२००५) इतकी आहे. म्हणजे अमेरिकेत माणशी ३.३५ हेक्टर जमीन येते तर भारतात ती ०.३१ हेक्टर इतकी कमी आहे.
भारतासाठी धडे
क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट या पुस्तकात रेखाटलेल्या अमेरिकन शेती-इतिहासापासून भारतीय शेतीच्या संदर्भात खूप काही शिकण्यासारखे आहे. बाजारव्यवस्थेचे शेतीव्यवहारातील जबरदस्त नियंत्रण व त्याद्वारे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक; शेतमाल उत्पादन व वितरण यांत गुंतलेल्या बड्या कंपन्यांमुळे उत्पादनप्रक्रियेतून उखडला गेलेला छोटा शेतकरीवर्ग; विकसित देशांमधील शेतीतील मोठ्या प्रमाणावरील यांत्रिकीकरणामुळे व रसायनांच्या वापरामुळे शेतीमाल उत्पादनात प्रतिहेक्टरी झालेली भरमसाठ वाढ; या वाढीमुळे शेतमालाच्या घसरलेल्या किंमती व त्यामुळे जागतिक, स्तरावरील स्पर्धेत टिकू न शकणारा गरीब देशांमधील सामान्य शेतकरी; रसायनांच्या अतोनात वापरामुळे मोजावी लागणारी पर्यावरणीय व सामाजिक किंमत, मातीची सतत होणारी धूप व जमिनीचा उतरत चाललेला कस; यांमुळे भविष्यात भेडसावणारी अन्नसुरक्षेची चिंता; यांसारखे अनेक प्रश्न अमेरिकन शेती-इतिहासाच्या व भारतीय शेतीच्या सद्यःस्थितीच्या अवलोकनातून प्रकर्षाने पुढे येतात.
चांगले अन्न गेले कुठे?
सुजाण नागरिकांसाठी पार्श्वभूमिपर टिपण
चांगले अन्न गेले कुठे?
अश्विन परांजपे
संघटितरीत्या सेंद्रिय शेती इ.पू. ८००० मध्ये सुरू झाली. गेली दहा हजार वर्षे ही शेती मानवजातीला आरोग्यदायी अन्न पुरवते आहे, तेही निसर्गाचा बळी न देता. पण १७८० च्या आसपासच्या औद्योगिक क्रांतीने माणूस आणि निसर्गातले हे सेंद्रिय नाते संपुष्टात आणले. ही प्रक्रिया दुसऱ्या महायुद्धापर्यंत जोमदार झाली. १९४३ साली नोबेल पुरस्कृत शास्त्रज्ञ नॉर्मन बोलाँग (Norman Borlaug) याला मेक्सिकोत पाठवले गेले. तिथे त्याने लेर्मा रोयो (Lerma Rojo) आणि सोनोरा ६४ (डेपीर ६४) या संकरित गव्हाच्या जाती प्रथम वापरात आणल्या.
प्रश्नांतील गुंता वाढतो
अमरावती जिल्ह्यातील कातपूर गावच्या पाचेक हजार शेतकऱ्यांनी यापुढे बीटी कापूस न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण सोयाबीनकडे वळत आहेत, तर काही थोडे सेंद्रिय शेती करू पाहत आहेत.
चार वर्षांपूर्वी बीटी कापसाने चमत्कार होईल, व उत्पन्न कैक पटींनी वाढेल, असे दावे केले गेले. हे नवे बियाणे कीटकनाशकांची गरज कमी करेल, हा मुख्य मुद्दा ठसवला गेला. आता असे दिसते आहे की पूर्वी दुर्मिळ असलेला लाल्या हा रोग बळावला आहे. यात पांढऱ्या माश्या रोपांच्या देठांवर हल्ला करतात, आणि पाने लाल पडून फुले अकालीच सुकून जातात.
दुभंगलेला समाज
मुंबईतील भा.ज.पा.च्या एका कार्यकर्त्याने अभिनेता इमरान हाशमीच्या विरोधात ३ ऑगस्ट २००९ रोजी तो जातीय द्वेष पसरवतो आहे अशा प्रकारची तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये महेश भट्ट ज्यांनी इमरान हाशमीच्या बाजूने विधान केले आहे, त्यांनाही गोवण्यात आलेले आहे. इमरान हाशमीने अलीकडे राज्य अल्पसंख्यांक आयोगाला भेट देऊन अशी तक्रार केली की ‘निभाना’ ही हौसिंग सोसायटी, जी मुंबईतील पालीहील भागात आहे त्यांच्याकडून भेदभावाची वागणूक दिली जात आहे. त्याची मुख्य तक्रार अशी होती की, त्याने फ्लॅट विकणाऱ्याला अगोदरच अॅडव्हान्समध्ये लाखभर रुपये दिले होते, पण हौसिंग सोसायटी त्याला ‘ना हरकत पत्र’ देण्यास तयार नव्हती कारण इमरान हाशमी मुसलमान आहे.
पुराव्यांनी धारणा बदलतात
पण माणसांचे विश्वास, त्यांच्या धारणा सहज बदलू शकतात, विशेषतः धोका पुढ्यात उभा असला की. म्हणूनच माणसे पुरावे पाहून धारणा बदलतात. याचे अभिजात उदाहरण मला भेटले. १९९०-२००० च्या मध्याजवळ मला वार्ताहर विचारत, की माझा तापमानवाढीवर विश्वास आहे का, आणि मी माझ्या विश्वासाचा उघडपणे बचाव देईन का.
आज मात्र तेच मला विचारतात, की परिस्थिती किती बिघडेल ! [मार्क मॅस्लिनच्या अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टु ग्लोबल वॉर्मिंग (ऑक्स्फर्ड युनि. प्रेस, २००४) या पुस्तकातून]
ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकरी
आपण गेल्या २-३ वर्षांत विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या व त्यावरचे विचारवंतांचे, राजकीय पक्षांच्या धुरीणांचे लेख वाचले. समित्या नेमलेल्या ऐकल्या. त्यांचे अहवाल वाचले. पण अजूनही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. याचे एक कारण असे की राज्यकर्ते नेहमीप्रमाणे या अरिष्टावर काही तरी मलमपट्टी उपाय करू पाहत आहेत व या सर्व गोष्टींच्या मागे जो मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे त्यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलेले आहे. या आत्महत्यांचा सरकारवर झालेला दृश्य परिणाम म्हणजे केंद्र व राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी! कर्जमाफीसाठी असलेले अनेक निकष फारसे योग्य नाहीत.
तापमानवाढीच्या गोष्टी
माणसांना वेगवेगळ्या वस्तू, घटनांच्या ध्वनिचित्रफिती, प्रत्यक्ष घटना वगैरे दाखवून त्या ऐकण्या-पाहण्याने मेंदूंत काय क्रिया घडतात; हे तपासायचे शास्त्र-तंत्र आता विकसित झाले आहे. त्याच्या वापरातून एक मजेदार निष्कर्ष निघाला. माणसांपुढे घडणाऱ्या दृश्यांत माणसे मनाने (मेंदुव्यवहाराने) सहभागी होतात! सिनेमे पाहताना नायक-नायिकांच्या मनांत असतील तसे व्यवहार प्रेक्षकांच्याही मनांत होतात. गोष्टी वाचताना-ऐकतानाही असे घडते. सापाचे चित्र पाहणेही साप पाहण्याला समांतर अशा शारीरिक-मानसिक प्रतिसादाला जागवते, इ.
यावरून एक मत घडते आहे, की माणसे उत्क्रांतीतून गोष्टी अनुभवण्याला अनुरूप झाली आहेत. लहान मुले गोष्टी अत्यंत मन लावून वाचतात–ऐकतात, दूरचित्रवाणी व चित्रपटांना जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.