विषय «इतर»

बाजारपेठा आणि नीतितत्त्वे

मूळ लेखक : मायकेल सँडेल

इंग्लंडमध्ये बीबीसीतर्फे ‘रीथ लेक्चर्स’ची एक मालिका सादर केली जाते. एखादा प्रमुख विचारवंत महत्त्वाच्या विषयावर आपले विचार ह्या मालिकेतून लोकांसमोर मांडतो. २००९ साली ह्या व्याख्यानांकरिता प्रोफेसर मायकेल सँडल ह्या हार्वर्ड विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्याला निमंत्रित केले होते. प्रोफेसर सँडल हे एक मान्यवर तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत आहेत. ‘न्याय’ ह्या विषयावरील त्यांच्या व्याख्यानांना प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात. सगळ्यांचे हित (common good) जपणाऱ्या नव्या प्रकारच्या राजकारणाचे स्वरूप कसे असावे
ह्याचा विचार करणाऱ्या ह्या व्याख्यानमालिकेचे नाव नवे नागरिकत्व (A New Citizenship) असे आहे.

पुढे वाचा

तुमच्याशिवाय नाही

तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कशी दिसतील? ती प्रतीकात्मकच असतील, की वास्तविक (realistic) असतील? बरे, तत्त्वचर्चा स्वभावानेच कोरड्या, नीरस. कला मात्र व्याख्येनेच रसाळ. मग तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कधी कलात्मक होतील का? चर्चा मुळात शब्द हे माध्यम ओलांडून बाहेर, दृश्य रूपांत जाऊ शकतील का? साधारणपणे आपल्याला हे प्रश्न पडतही नाहीत, मग अस्वस्थपणे त्यांची उत्तरे शोधणे तर दूरचेच. पण असे प्रश्न जागवणारा, ते सोडवायला चौकट पुरवणारा एक अनुभव नागपूरकरांना नुकताच आला. अमरावतीच्या संजय गणोरकरांचे मांडणी शिल्पांचे (installations) प्रदर्शन असा अनुभव देऊन गेले.
अमरावती जिल्ह्याची सुपीक जमीन, हा वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड या म्हणीचा आधार.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)

[End of Ideology (तत्त्वादर्शीचा अंत!), Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), ह्या कळीच्या संकल्पना गेल्या लेखांशांत आल्या होत्या. आता इतर काही कळीच्या संकल्पना पाहू
या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती एकमेकांच्या अगदी विरोधी असतात.

पुढे वाचा

भाग्य आणि न्याय यांच्या सीमारेषेवरून एक फेरफटका

अनुभवाला येणाऱ्या घटनांमध्ये यादृच्छिकता (रॅडमनेस) हा घटक असतोच. घटनांना आपले अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद असतातच. त्यामुळे आपल्यासाठी ही नुसती यादृच्छिकता न राहता ते भाग्य (फॉरच्युइटी) म्हणून सामोरे येतेच. निवड-स्वातंत्र्यांची जाणीव, भले ती आभासात्मक असो वा नसो आपल्याला आपल्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला लावतेच. ही मानवी स्थिती जमेस धरूनच राजकीय तत्त्वज्ञान उभे करावे लागते.
मग भौतिक जग नियत आहे की अनियत ? अनियतता मानवी ज्ञानाच्या सध्याच्या मर्यादांमुळे भासते की या मर्यादा नेहमीच राहणाऱ्या आहेत? की खरोखर अनियतता नसल्याचमुळे भावी काळात कधी तरी पूर्ण नियततेची जाणीव मानवांना होणार आहे ?

पुढे वाचा

एक दिवाणी दावा

पुस्तक-परीक्षणः
एक दिवाणी दावा
जॉनथन हॅरा
अमेरिकन संघराज्याच्या ईशान्य कोपऱ्यातले बॉस्टनजवळचे वोबर्न नावाचे खेडे. एक उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी मध्यमशी नदी, ॲबरजोना नावाची. नदीच्या पश्चिमेला वोबर्न पसरलेले. नदीजवळच्या एका वस्तीत राहणाऱ्या अॅन अँडर्सनच्या जिमी नावाच्या मुलाच्या नाकातून अधूनमधून रक्त यायचे. सहज मुक्या माराने त्याचे शरीर काळेनिळे व्हायचे. बॉस्टनचे डॉक्टर सांगायला लागले की मुलाला ल्यूकेमिया आहे, रक्ताचा कॅन्सर. साडेतीन वर्षांच्या मुलाला किरणोत्सर्गांचा मारा करण्याच्या तंत्राने मदत मिळेना. केमोथेरपी, म्हणजे कॅन्सरच्या पेशींना मारणारी औषधे देण्याचा उपचार चालू केला. हे सुरू झाले १९६६ साली. नंतरची पंधरावीस वर्षे ही महागडी आणि (त्यावेळी तर जास्तच) क्लेशकारक उपचाराच्या पद्धतीने अधूनमधून जिमीला दुरुस्त केल्यासारखे वाटायचे.

पुढे वाचा

नैतिकतेचे बदलते स्वरूप

मुळात नैतिकता कुठून येते, या प्रश्नाचे उत्तर शोधताना १८ व्या शतकातील डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्त्वज्ञापर्यंत आपल्याला जावे लागेल. त्याच्या मते नैतिकता वासनांची गुलामी करते (“the slave of the passions’). त्यांनी हे निष्कर्ष ‘चांगले काय व वाईट काय’ या अभ्यासाअंती काढले होते. आपण ज्याला चांगले वा वाईट असे म्हणत असतो त्याचे मूळ आपल्या मनात एखाद्या वस्तू वा व्यक्तीबद्दल वाटणारी सहानुभूती वा घृणा यात शोधता येईल. हे निष्कर्ष आपण आजकाल मान्य केलेल्या प्राथमिक स्वरूपातील वैश्विक नीतिमत्तेशी मिळते-जुळते आहेत, हे आपल्या लक्षात येईल.

पुढे वाचा

अणुऊर्जा अपघात भरपाई बिल २०१०

भोपाळ दुर्घटनेबद्दलच्या न्यायालय-निर्णयानंतर विरोधी पक्षांनी सिव्हिल लाकॅबिलिटी फॉर न्यूक्लीयर डॅमेज बिल २०१० च्या विरुद्ध रान उठवायला सुरुवात केली आहे. हे अणुऊर्जा अपघात नुकसान-भरपाई बिल सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरील पार्लमेंटरी स्टैंडिंग कमिटीपुढे विचारात आहे.
या बिलाबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत, त्या अशा: १. रु.५०० कोटींची नुकसानभरपाईची मर्यादा फार तोकडी आहे. २. या बिलानुसार खराब सामुग्री देणाऱ्या परदेशी पुरवठादारांना पूर्णपणे जबाबदारीमुक्त-मोकळे सोडण्यात आले आहे. ३. भरपाई मागण्यासाठी १० वर्षांच्या आत क्लेम करावा लागतो. १. चीन (२०५ कोटी), कॅनडा (३३५ कोटी), फ्रान्स (५७५ कोटी) अशा महत्त्वाच्या देशांशी तुलना करता भारताची ५०० कोटींची मर्यादा काही कमी नाही.

पुढे वाचा

“अन्नाचा अधिकार”

भारतातील गोरगरीब लोकांची उपासमार सुरू आहे. ही समस्या किती गंभीर आहे याचा दोन पद्धतीने मागोवा घेता येतो. त्यातील पहिला प्रकार म्हणजे भारतातील किती लोकांना निरोगी जीवनासाठी आवश्यक एवढी पोषणमूल्ये देणारा आहार मिळत नाही याचा अंदाज घेणे. दुसऱ्या प्रकारामध्ये जागतिक पातळीवर ‘भुकेच्या समस्ये’च्या संदर्भात भारताचे स्थान इतर देशांच्या तुलनेत कोठे आहे ते तपासणे. आपल्या पंतप्रधानांनी ‘देशातील एकाही नागरिकाला एक दिवसही अनैच्छिक उपास करण्याची वेळ येऊ देणार नाही’ अशी जाहीर ग्वाही दिली असली तरी वास्तवात देशातील बहुसंख्य जनता अर्धपोटी जीवन कंठित आहे वा कुपोषणग्रस्त आहे.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-२)

[End of Ideology (तत्त्वादर्शाचा अंत!) ही कळीची संकल्पना गेल्या लेखांशात आली. Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), मध्यमवर्गाचा संभ्रम, या काही कळीच्या राजकीय संकल्पना प्रत्यक्षदर्शी व सोप्या पद्धतीने स्पष्ट करणारा हा लेखांश आहे, मूलभूत महत्त्वाचा.]
या लोकशाहीच्या नमुन्याची रचना करताना, देशी विदेशी घटनेच्या रचनाकारांचा विचार करताना त्यांच्याकडून कदाचित काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असावे. घटना बनविताना मानवी स्वभाव, मानवी समूहांचे समूह म्हणून वागण्यामागचे विचार किंवा वागणूक याचा पूर्ण विचार केला आहे किंवा कसे, याचा अंदाज येत नाही. कारण जेव्हा आपण लोकशाहीतल्या नेत्याचे मूळ विचार व नंतर वागणूक पाहतो तेव्हा आपल्याला खटकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात.

पुढे वाचा

मेकॉलेचे चारित्र्यहननः एक लाजिरवाणा अध्याय

ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती यांचे विश्लेषण करताना आपण बरीच माहिती गोळा करतो. ते करताना एक महत्त्वाचा दंडक पाळावा लागतो, तो म्हणजे माहिती तत्कालीन संबद्ध व्यक्तींनी लिहिलेली असावी व ती व्यक्तीही विश्वासार्ह असावी. माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतापेक्षा त्या व्यक्तीने घटनेचे केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन महत्त्वाचे असते. घटना घडून काही वर्षे गेल्यावर आठवणीप्रमाणे लिहिलेले वर्णन कमी विश्वासार्ह असते. आज प्रत्यक्षात अनेक लेखक ही पथ्ये पाळत नाहीत त्यामुळे हास्यास्पद निष्कर्ष काढतात. काही वेळा असा प्रकार अज्ञानातून होतो व ते क्षम्यही आहे. पण बऱ्याच वेळा तद्दन खोटा प्रचार जाणूनबुजून केला जातो व ते अश्लाघ्य आहे.

पुढे वाचा