‘आजचा सुधारक एक वर्षाचा झाला तेव्हापासून एखादा वाचक मेळावा घ्यायचे वाटत होते. नागपूरच्या वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्थेच्या (जुने मॉरिस कॉलेज) राज्यशास्त्रविभागाच्या पुढाकाराने ती कल्पना साकार झाली, “धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि आजचे सुधारक’ या विषयावर एक परिचर्चा उपर्युक्त संस्थेचे राज्यशास्त्रविभागप्रमुख प्रा. कवठाळकर यांनी १४ सप्टेबर १९९१ रोजी घडवून आणली. या चर्चेसाठी शहरातील विविध क्षेत्रांशी संबंधित विचारवंत, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक, धर्मशास्त्राचे अभ्यासक, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित केले होते. योगायोगाने प्रसिद्ध विचारवंत श्री. वसंत पळशीकर नागपुरात मुक्कामाला होते. त्यांच्याही उपस्थितीचा आम्ही लाभ घेतला.
विषय «इतर»
एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता
एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता
मुसलमानांची समता फक्त मुसलमानांपुरतीच होती. इस्लाम धर्म इतका एकतर्फी आहे व स्वतःच्या अटीशिवाय कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण न करता (वन्दे मातरम् म्हणण्याससुद्धा तो तयार होत नाही) मुस्लिमेतरांबरोबर संहअस्तित्वास इतका प्रतिबंध करणारा आहे की तो फक्त मुस्लिम देशांकरिताच योग्य आहे आणि असे असले तरी तेथेही विसाव्या शतकाने कायदेविषयक बदल आवश्यक झाले आहेत. भारतासारख्या मुस्लिम नसलेल्या देशात मुस्लिमेतर बहुसंख्याकांबरोबर मुस्लिम अल्पसंख्याकांना राहावयाचे झाले तर त्यांनी एकरूप व एकात्म होणे जरूरी आहे, हे ओघानेच येते. पण इस्लाम धर्म या गोष्टीस विरोध करतो.
विवेकवाद -१७
गीतेतील नीतिशास्त्र – (उत्तरार्ध)
या लेखाच्या पूर्वार्धात गीतेत जी नीतिमीमांसा आलेली आहे तिचा माझ्या मते यथार्थ अनुवाद मी दिला आहे. आता उत्तरार्धात त्या मीमांसेचे विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करावयाचे आहे.
गीतेतील मोक्षशास्त्र खरे आहे काय?
पूर्वार्धात आपण पाहिले की गीतेतील नीतिमीमांसा मोक्षशास्त्रावर आधारली आहे. त्या मोक्षशास्त्राच्या आधारावाचून गीतेतील नीतिमीमांसेला प्रतिष्ठा नाही. म्हणून तिच्यात अभिप्रेत असलेले मोक्षशास्त्र यथार्थ आहे काय? या प्रश्नाचे उत्तर आपण प्रथम द्यायला हवे.
स्थलाभावी या प्रश्नाचा परामर्श येथे काहीशा संक्षेपानेच घेता येईल. या चर्चेवर दुसरेही एक बंधन आहे. ते असे की हा लेख केवळ तज्ज्ञ, विशेषज्ञ किंवा तत्त्वज्ञ यांनाच फक्त कळेल असा होता कामा नये, साधारण सुशिक्षित अशा सामान्य वाचकालाही तो कळेल असे त्यातील विवेचन असावे असा आमचा प्रयत्न असतो.
धर्म, धर्मकारण, धर्मनिरपेक्षता इत्यादि
गेल्या पाचपन्नास वर्षांत ह्या देशांत अनेक गोष्टींचे वाटोळे करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अर्थात् हे कर्तृत्वही परंपरेतून आले असावे. पिढ्यानपिढ्या आपण हे करीत आलो असलो पाहिजे. नाट्यशास्त्रात एके ठिकाणी जगांत अनेक वर्षे (म्हणजे देश) आहेत, पण एकट्या भारतवर्षांत दुःख आहे; म्हणून तिथे नाटक करायला हवे; असे म्हटले गेले .
त्यावरून आजकाल जे घडते आहे त्यासंबंधी फार आश्चर्य वाटायला नको. पण हा विनोदाचा भाग झाला. तो घटकाभर बाजूला ठेवू. स्थूलमानाने बोलायचे तर इतर फळ्यांप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या फळीवरही आपण अयशस्वी ठरलो आहोत असे म्हणता येईल.
१९८९ : एक अन्वयार्थ
मूळ लेखक : पॉल एम्. स्वीझी
एका युगाचा प्रारंभ किंवा शेवट म्हणून, महत्त्वाचे वळण देणारी म्हणून, विशिष्ट वर्षे ही लक्षणीय टप्पे म्हणून इतिहासात नोंदली जातात. १७७६, १७८९, १८४८, १९१७, १९३९ ही अशी काही वर्षे होती. ह्या यादीत जाऊन बसणारे आणखी एक वर्ष म्हणजे १९८९ (एकोणीसशे एकोणनव्वद) हे होय. पण कशासाठी म्हणून ते विशेष लक्षात राहील? Js_ कम्युनिझमचा शेवट झाला यासाठी, असे काही म्हणतील; तर इतर काही, भांडवलशाही आणि समाजवाद यातील संघर्षात भांडवलशाहीचाच अखेर विजय झाला यासाठी, असे म्हणतील. पण मला एक वेगळाच अन्वयार्थ सुचवावासा वाटतो.
गोर्बाचेव्ह
मिखाएल गोर्बाचेव्ह यांची सत्ता सोवियत संघाच्या जनतेने त्यांना पुनः बहाल केली. हजारो लोकांनी रणगाड्यांना तोंड देत, आपले प्राण पणाला लावून नवजात स्वातंत्र्याचे रक्षण केले. बंड करणाऱ्या पुराणपंथी लोकांचा पराभव झाला आणि जी क्रांती गोर्बाचेव्ह यांनी १९८५ साली सुरू केली होती. त्या क्रांतीतून निर्माण झालेल्या सामाजिक शाक्तींनी गोर्बाचेव्ह यांना पुनः परत सत्तेवर आणले. १० मे १९८९ पासून रुमानिया, पूर्व जर्मनी, झेकोस्लाव्हाकिया या देशातील जनतेने “जनतेच्या लोकशाह्या” उद्ध्वस्त केल्या. फक्त मे १९८९ मधील चीनच्या जनतेचे बंड अयशस्वी ठरले. कारण चीनच्या ‘जनमुक्तिसैन्याने कट्टरपंथी लोकांना साथ देऊन हजारो तरुण विद्यार्थ्यांचे शिरकाण केले.
भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती
भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे
एणेप्रमाणे (१) ध्वनीपासून भाषा, (२) रंगीत किंवा साध्या रेखाचित्रांपासून अक्षरमालिका, (३) नैसर्गिक हावभावांपासून कृत्रिम अभिनय, व (४) पाहिलेल्या आकृतींपासून बनावट भांडी-अशा चार कृत्रिम व्यावहारिक कला मनुष्याने आपल्या अकलेने संपादन केल्या. शेकडो टक्के टोपणे खाऊन व हजारो प्रयोगांत फसून मनुष्याला या चार नित्योपयोगी कला परम कष्टाने व निढळाच्या घामाने साध्य झाल्या. कोण्या काल्पनिक स्वर्गात किंवा नरकात राहणाऱ्या देवासुरानी दिल्या अशातला बिलकूल भाग नाही. शंकराच्या डमरूतून ध्वनी निघाले, चित्रलेखानामक गंधर्वकन्येने चित्रे काढण्याचे कसब शिकविले, कोण्या किन्नराने अभिनय पढविला, किंवा विश्वकम्यनि भांडी बनविण्याचा धडा घालून दिला वगैरे बोलणी केवळ भाकडकथा होत.
विज्ञान आणि वैज्ञानिकवृत्ती
विज्ञान आणि वैज्ञानिकवृत्ती
ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षणसंस्थात अतोनात महत्त्व आलेले आहे. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण मात्र निसर्गनियमांबद्दल मूलभूत जिज्ञासेपेक्षा, या अभ्यासक्रमातून पुढे तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांची दारे उघडतात आणि डॉक्टर व इंजिनियर यांसारख्या पदव्या मिळाल्याने तरुण व तरुणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवू शकतात वा चटकन श्रीमंत करणारे व्यवसाय करू शकतात, हे असते. विज्ञानाच्या अभ्यासाचा हा हेतू संकुचित असल्याने, विज्ञान हा अभ्यासक्रमामधला महत्त्वाचा पण अर्थशून्य विषय होतो. विज्ञानाची बुद्धिनिष्ठा विद्यार्थ्यांना सापडत नाही, व ते ती शोधीतही नाहीत.
विवेकवाद -१५
विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध या लेखमालेच्या दुसऱ्या लेखांकात ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या बहुतेक सर्व प्रमुख युक्तिवादांचे परीक्षण केलेले वाचकांना आठवत असेल. आज त्याच विषयाचा पण वेगळ्या दृष्टिकोणातून विचार करण्याचा विचार आहे.
भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात भगवान कृष्णांनी अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडविल्याची कथा आहे. आज एक वेगळ्या प्रकारचे विश्वरूपदर्शन वाचकांना घडविण्याचे ठरविले आहे. विज्ञानाने आतापर्यंत विश्वाचा जो अभ्यास केला त्यातून विश्वाच्या स्वरूपाचे एक चित्र निश्चित झाले आहे. त्याचे संक्षेपाने वर्णन येथे करावयाचे आहे. हेतू हा की विज्ञानाने घडविलेल्या विश्वरूपदर्शनात आपल्याला कुठे ईश्वर सापडतो का, आणि सापडल्यास त्याचे स्वरूप काय आहे ते आपल्याला सांगता यावे.
विवाह आणि नीती (भाग १४)
कुटुंब आणि शासनसंस्था
जारी कुटुंबाची मुळे जीवशास्त्रीय असली तरी नागरित (civilised) समाजांमधील कुटुंब ही कायद्याने निर्मित अशी गोष्ट आहे. विवाहावर कायद्याचे नियंत्रण असते. आणि मातापित्यांचे अपत्यांवरील अधिकार अतिशय बारकाव्याने निश्चित केलेले असतात. विवाह झालेला नसेल तर पित्याला कुटुंबात कसलाही हक्क नसतो, आणि अपत्यावर एकट्या मातेचा अधिकार चालतो. परंतु जरी कायद्याचा उद्देश कुटुंबाचे रक्षण करणे हा असतो, तरी अलीकडच्या काळात कायदा मातापिता आणि अपत्ये यांच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात पडतो आहे, आणि कायदेकर्त्यांची इच्छा आणि उद्देश यांना न जुमानता तो (कायदा) कुटुंबसंस्था मोडणारी एक प्रमुख शक्ती होऊ पाहात आहे.