विषय «इतर»

चर्चा

त्या अनाठायी औदार्याने काय साधले?
श्री संपादक, आजचा सुधारक यांसी स. न. वि.
त्या घटनेला आता ४५ वर्षे होऊन गेली आहेत. तिचा विचार आज अलिप्तपणे करता येतो का, हे पहावे अशा उद्देशाने हे लिहीत आहे. सुरुवातीलाच हे अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की गांधी-हत्येशी या चर्चेचा संबंध जोडायचा नाही ही या चर्चेची पूर्व अट आहे.
सर्वानाच माहीत असलेली पाश्वभूमी मी माझ्या पद्धतीने थोडक्यात सांगतो. काश्मीर नरेशांनी पाकिस्तानी आक्रमणामुळे हतबल होऊन भारताशी सामीलनामा केला, आणि काश्मीर हा भारताचा भूभाग बनला. भारतीय फौजा श्रीनगर वाचवण्यासाठी धावल्या, आणि एका अघोषित युद्धास तोंड लागले.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
मुस्लिम प्रश्नासंबंधात श्री वसंत पळशीकरांना ‘वाळूत डोके खुपसून बसणाऱ्या शहामृगाची उपमा देणारे मा. श्री. रिसबूड यांचे पत्र वाचले. (नोव्हें. ९३) “(हिंदूंच्या) सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे कोणते प्रयत्न (हिंदूंकडून) झाले.?” असा पळशीकरांचा प्रश्न आहे. या प्रश्नाची मूलगामी चिकित्सा नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई यांनी केलेली आहे. मुस्लिमांचे मन वळविण्यापूर्वी त्यांचे ‘मन’ आहे तरी काय? त्यांना पाहिजे आहे तरी काय ? हे समजून घ्यावे लागते. कुरुंदकरांनी या प्रश्नाची . मूलगामी चिकित्सा त्यांच्या ‘अन्वय’ ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या प्रकरणात पुढीलप्रमाणे केलेली आहे:
भारतीय मुसलमानांची कायमची एक तक्रार असते की, त्यांना भारतीय घटनेने धर्मस्वातंत्र्य दिलेले नाही.

पुढे वाचा

इतर

‘मला कोणी शत्रू नाही ही तुझी बढाई आहे ना !
माझ्या मित्रा ! तुझी ही प्रौढी व्यर्थ आहे..
शूराला साजेशा पद्धतीने जीवनाच्या संघर्षात जे उडी घेतात
त्यांना अनेक शत्रू निर्माण होतातच
तुला जर कुणी शत्रूच नसेल तर….
त्याचा अर्थ एवढाच की तुझ्या हातून
काही घडलेलेच नाही.
कोणाही विश्वासघातक्याच्या पेकाटात
तू लाथ घातली नाहीस.
दुष्टाच्या तावडीतील शिकार तू सोडवून आणली नाहीस.
कोणत्याही अन्यायाचा मुकाबला करण्यास तू धजावलाच नाहीस.
खरं सांगू ? तूं एक भ्याड आहेस भ्याड !

जातीय दंगली आणि त्यामागील विचारप्रणाली

१८९३ साली मुंबईत पहिली जातीय दंगल झाली. म्हणजे एका अर्थी यावर्षी आपण जातीय दंगलींचा शतकोत्सव साजरा करीत आहोत. गेल्या शंभर वर्षांत अशा जातीय दंगलींचा उद्रेक अधून मधून सतत होत आला आहे व त्या दंगलींतून माणसातील पशुत्वाचे दर्शनही भरपूर झाले आहे. प्राणहानी व वित्तहानी किती झाली याचे तपशीलवार आकडे या दंगलींच्या अहवालातून उपलब्ध आहेत. अशा दंगलींमुळे राष्ट्राची एकता धोक्यात येते, त्याच्या प्रगतीला खीळ बसते, हे मान्य असूनही आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातून अशा दंगलीना कायमचे निपटून काढण्यात आपण अपेशी ठरलो आहोत. उलट बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर उफाळलेल्या दंगलीत परस्पर-विद्वेषाचा व हिंसाचाराचा एक नवाच उच्चांक गाठला गेला.

पुढे वाचा

इंग्रजी: एक पुनरवलोकन

Why is some Jat teenager in Meerut reading Jane Austen ? Why does a place like Meerut have a course in English at all ? Only because the Prem Kishens of the country need a place where they can teach rubbish?
– English, August Upamanyu Chatterjee
भारतात इंग्रजीचे स्थान काय असावे यासंबंधी आजवर बरेच लिहून झाले आहे. बरीच उलट-सुलट चर्चाही झाली आहे. तेव्हा परत या विषयाकडे कोणी का वळावे असा प्रश्न मनात स्वाभाविकच उभा राहू शकतो. त्याचे समाधानकारक उत्तर देणे कठीण आहे.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ९)

उद्गमन (२)

गेल्या लेखांकात आपण उद्गमनाची समस्या समजावून घेतली. ती समस्या अशी आहे की निसर्गाचे ज्ञान मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे उद्गमन. परंतु ही क्रिया अवैध असल्यामुळे तिचे निष्कर्ष कधीही पूर्णपणे सिद्ध झाले असे म्हणता येत नाही. ते कमीअधिक प्रमाणात संभाव्य असू शकतात, पण पूर्णपणे निश्चित असू शकत नाहीत. म्हणून मग उद्गामी अनुमाने त्यातल्या त्यात विश्वासार्ह कशी होतील असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर या लेखांकात द्यावयाचे आहे.
निसर्गातील प्रक्रम (Order in Nature)
निसर्गाची वाटचाल नियमबद्ध आहे, आणि प्रत्येक घटना कोणत्या तरी नियमानुसार घडते असे वैज्ञानिक मानतो.

पुढे वाचा

अकुतोथय गीता साने – १

वाशीमला भटगल्ली संपते तिथे थोडीशी मोकळी जागा आहे. हा टिळक चौक. त्या चौकात आजूबाजूच्या जुनेर घरांच्या मानाने एक नवी नेटकी इमारत ताठ उभी होती. तिला साने वकिलांचा वाडा म्हणत. पण आम्ही पाहिला तेव्हा तिथे रामभाऊची खाणावळ असे. मधू कायन्देबरोबर मी तिथेअधेमधे गेलो आहे. या वास्तूत थोड्याच वर्षामागे अग्नीसारखी तेजस्वी माणसे वसतीला असत याची आम्हाला तेव्हा बिलकूल कल्पना नव्हती. वाशीम साने वकीलांना विसरत चालले होते ?
एकोणपन्नास-पन्नास सालच्या या गोष्टी. साने वकिलांच्या मृत्यूनंतर दोन-तीन वर्षांतल्या. वाड्याचे मालक भाऊसाहेब साने ज्वलंत देशभक्त आणि कृतिशूर सुधारक.

पुढे वाचा

वृत्त आणि विवेक

एन्.टी. रामाराव यांचे लग्न ही मोठीच खबर आहे. राष्ट्रीय आघाडी आणि तेलगू देसम् या राजकीय पक्षांचे अध्यक्ष, आंध्राचे माजी मुख्यमंत्री असे हे बडे प्रस्थ आणि मुख्य म्हणजे त्यांचे (जवळपास ‘अवघे पाऊणशे वयमानं’. असे असताना त्यांनी ३६ वर्षाच्या घटस्फोटिता लक्ष्मी शिवपार्वती या आपल्या चरित्र – लेखिकेशी दुसरे लग्न केले आहे. सदान्कदा भगवे कपडे परिधान करून स्वामी विवेकानंदांची मधून मधून आठवण द्यायला ते विसरत नसत. या प्रौढा- वृद्धविवाहाने त्यांची प्रतिमा आणि निवडणुकीच्या मोसमात मते खेचण्याचे सामर्थ्य यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याची त्यांना जाणीव नसेल असे कोण म्हणेल ?

पुढे वाचा

नागपूरपासून दूर – मागे, मागे

सध्याची पंचायत समिती, ‘राष्ट्रीय विस्तार योजना’ या दुर्बोध नावाने जन्माला आली. चारपाच वर्षांत तिचेच ‘सामूहिक विकास योजना’ असे नामांतर झाले. आणि तिला सध्याचे नामरूप येऊनही आता तीस वर्षे उलटली आहेत. या विकास योजनेत मी उमेदीची सहासात वर्षे घालवलेली. मधूनच जुने सोबती भेटतात. कुणी मोठ्या पदापर्यंत पोचलेले असतात. असेच एकदा जोशी भेटले. मी उत्सुकतेने विचारले, ‘खेड्यांचे चित्र आता पार पालटले असेल नाही ?’ माझा आशावाद पाहून म्हणाले, ‘मेड इन इंडिया वाचली का ? आपल्या अकोल्याच्या पुरुषोत्तम बोरकरची ती कादंबरी वाचा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.’

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक यांस स.न.वि.वि. आपल्या मासिकाच्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात श्री. शांतिलाल मुथ्था ह्यांचा ‘समाजातील मुलींची घटती संख्या: कारणमीमांसा व उपाययोजना’ ह्या शीर्षकाचा लेख व त्यावरील श्री. दिवाकर मोहनी ह्यांचे भाष्य वाचावयास मिळाले. श्री. मुथ्था ह्यांची चिंता सार्थ आहे व त्यांनी केलेली कारणमीमांसा व सुचविलेली उपाययोजनाही बुद्धीला पटणारी आहे. पण श्री. मोहनींनी ह्या संदर्भात व्यक्त केलेले विचार मात्र तर्कसंगत वाटले नाहीत.

मूळ प्रश्नाचा विचार करणे व त्यावर उपाय कोणते करावेत ह्याचा शोध घेणे सोडून, श्री. मोहनी ‘पुरुषांकडून स्त्रियांची होणारी छेडखानी’ ह्या विषयाकडे वळले आहेत.

पुढे वाचा