गोपाळ गणेश आगरकरांचे निधन झाले त्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.या विलक्षण ताकदीच्या माणसाला अवघे एकोणचाळीस वर्षांचे आयुष्य मिळाले आणि त्यातही जेमतेम पंधरा वर्षांचा काळाचा तुकडा आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्या हाती लागला. या अवधीमध्ये त्यांनी कितीतरी विषयांची, सखोल विचार आणि अभ्यास करून, मांडणी केली. त्यापैकी स्त्रियांच्या संदर्भात किंवा स्त्रीपुरुप-समतेच्या संदर्भात त्यांनी मांडलेल्या काही विचारांपुरताच माझा लेख मी मर्यादित करून घेतला आहे.
१ ऑगस्ट १८८८ या दिवशी सुधारक या त्यांच्या साप्ताहिकांसंबंधीचे एक जाहीर पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सुधारक सुरू करण्याचा उद्देश काय आणि त्यामध्ये प्रसिद्ध होणार्या साहित्याचे स्वरूप कसे असेल यासंबंधीची माहिती या पत्रकात आहे.
विषय «इतर»
आगरकरांचे समाजशास्त्र
महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात सामाजिक परिस्थितीचा व समाजरचनेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यास सुरुवात झाली. त्याबाबतचे आपले परखड विचार प्रथम लोकहितवादी यांनी मांडले आणि म. ज्योतीराव फुले यांनी ह्या विचारांना एक नवे वळण दिले. त्यांच्या मांडणीत जातिव्यवस्थेस विरोध आणि समतेच्या आधारावर नव्या विवेकनिष्ठ समाजाची स्थापना या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. सुधारकार गोपाळ गणेश । आगरकर हे सामाजिक शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते आणि समाजाच्या स्थितिगतीबाबतचे त्यांचे विचार आधुनिक आणि परंपराविरोधी होते. त्यांच्या सामाजिक शास्त्रविषयक विचारांवर स्पेन्सरच्या व मिल्लच्या विचारांचा प्रभाव पडला होता. म्हणून निसर्ग व मानवयांच्या विकासाची ते सातत्याने तुलना करताना दिसतात.
आगरकर आणि हिंदू-मुस्लिम प्रश्न
महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत विवेकवादाचे अध्वर्यु गोपाळराव आगरकर यांचे स्थान हे अग्रमानाचे आहे. गोपाळराव आगरकरांनी विवेकाधिष्ठित सर्वांगीण सुधारणेच्या विचाराला राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही जास्त महत्त्व दिलेले होते. अर्थात सामाजिक प्रश्नांवर लढत असतानाच आगरकरांनी राजकीय प्रश्नांना चाच्यावर सोडलेले नव्हते. नातू देशपांडे संपादित “आगरकर-वाङ्मयाच्या दुसर्या खंडात आगरकरांचे राजकीय विषयावरील लेख आहेत. त्यांमध्ये त्यांनी मुंबईत आणि इतर ठिकाणी झालेल्या हिंदू-मुसलमान दंग्यांच्या संबंधाने लिहिलेले सहा लेख आहेत. त्यातून हिंदूमुसलमान प्रश्नासंबंधीची त्यांची संतुलित दृष्टी दिसते. या लेखांच्या अनुषंगानेच या प्रश्नावरील आगरकरांच्या विचारांचे हे विश्लेषण असल्याने माझ्या विश्लेषणाचे मर्यादित स्वरूप कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.
आगरकरांचा जातिविचार भास्कर
आगरकरांनी आपल्या लिखाणातून कौटुंबिक सुधारणांवर अधिक भर दिला असला तरी काही राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नही हाताळले आहेत. एवढेच नव्हे तर ब्राह्मणी परंपरेतील अन्य सुधारकांपेक्षा अधिक साक्षेपाने त्यांनी त्यांचा ऊहापोह केला आहे. हिंदु समाजातील जातिभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता यावर आगरकरांनी टीका केली आहे. जातिभेदांची उपयोगिता संपली असून ते सामाजिक प्रगतीच्या आड येत असल्यामुळे क्रमशः ते नष्ट व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जन्माधिष्ठित जातिव्यवस्था व्यक्तिविकासाला कशी मारक ठरते हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यांच्या मते, जन्मतः सारखेच हक्क व योग्यता घेऊनआलेल्या व्यक्तींचे ते हक्क व योग्यता पुढे त्याच्या जातिधर्मावर नव्हे तर कमीअधिक बुद्धिविकासावर व उद्यमशीलतेवर अवलंबून असावी.
तेहतीस कोटी देव आणि एक असहाय अबला
हिंदू कायदा स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती धरत नाही, नवर्या.ची मालकी मानतो. इंग्रजी सरकार सामाजिक रूढीत हात घालायचा नाही म्हणून स्वस्थ बसते. ही तटस्थता जिथे लाभाचा प्रश्न येतो तेव्हा का दाखवत नाही? पारंपारिक हिंदूपेक्षा हे सरकार जास्त जुलमी आहे. कारण एका बाजूला ते स्त्रीला शिक्षण व स्वातंत्र्य घ्यायला सांगते आणि रखमाबाईसारखी एखादी सुशिक्षित स्त्री नकोशा नवर्याषची गुलामगिरी नाकारू लागली तर तिला बंधनात बांधायला साधन होते. माझा हिंदू कायद्याचा अभ्यास आहे, त्यात अशा प्रकारची सरकारची कृती कुठेही बसू शकत नाही. हिंदू कायद्यानुसार नवर्यासकडे न गेल्यास तिला जातिनियमाने काही शिक्षा होऊ शकेल.
धर्म आणि मूलगामी मानवतावाद (Radical Humanism)
Radical Humanism (मूलगामी मानवतावाद) या नावाने सुमारे साठ वर्षे अस्तित्वात असलेल्या तत्त्वज्ञानाचे मुखपत्र ‘The Radical Humanist’ या नावाने श्री. व्ही. एम. तारकुंडे यांच्या संपादकत्वाखाली दिल्लीहून प्रसिद्ध होत असते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्थापन केलेल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रसाराकरिता त्याचे प्रकाशन होत असते. विवेकवाद (rationalism) आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यावर आधारलेल्या आणि स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याकरिता Radical Humanist Association ही संस्था प्रयत्न करीत असते.
या संस्थेचे स्मरण आज होण्याचे कारण तिच्या मुखपत्राच्या फेब्रुवारी ९५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख.
बंडखोर पंडिता (भाग ३)
रमाबाईंनी हिंदू धर्म सोडला, पण हिंदुस्थानची नाळ तोडली नाही, बाईंनी हिंदुसंस्कृतीचा त्याग केला नाही याची विपुल उदाहरणे त्यांच्या चरित्रात आहेत.
‘तुमचे आईवडील सद्धर्माने (ख्रिस्ती धर्माने) देऊ केलेल्या तारणाला वंचित झाले’, असे कुणीसे म्हणाले. त्यावर ताड्कन त्या उत्तरल्या : ‘माझे आई-वडील इतके परमेश्वरभक्त, कनवाळू व सच्चरित्र होते की, त्यांच्या बाबतीत असा संशय व्यक्त केला तरी मला सहन होणार नाही. अमेरिकेत अल्पावधीत लोकप्रियता पावलेले त्यांचे पुस्तक The High-Caste Hindu Woman आईला अर्पण करताना त्या लिहितात, ‘जिचा मधुर संस्कार व समर्थ शिकवण माझ्या जीवनाला सतत मार्गदर्शक ठरली व माझ्या जीवनाला प्रकाशित करीत राहिली त्या माझ्या प्रियतम आईस – आदरपूर्वक समर्पण.’
अमेरिकेतील लोकांची लैंगिकता
सैन्य पोटावर चालते अशी जुनी सार्थ म्हण आहे! सैन्यच नव्हे, तर प्राणिमात्र पोटाखातरच चालत असतात असे म्हटले तर वावगे ठरू नये, उदरभरण ही प्रत्येक जीवाची दैनंदिन प्रेरणा असून या प्रेरणेमुळेच सर्व जीवांच्या जीवनातील मोठा काल व यत्न व्यतीतहोतात. उदरभरणानंतर प्रत्येक जीवाची धडपड असते प्रजननासाठी, जगण्याइतकीच महत्त्वाची प्रजोत्पादनाची प्रेरणा जीवसृष्टीत आढळते. मानवी समाजातही प्रजोत्पादनाची प्रेरणा फार महत्त्वाची आहे. सृष्टीतील बहुसंख्य जीव लैंगिक प्रजोत्पादनच करतात. या प्रकारच्या प्रजोत्पादनासाठी प्रत्येक जीवास लिंगपेशी उत्पन्न करून, त्यांचा दुसऱ्या जीवाने उत्पन्न केलेल्या लिंगपेशींबरोबर संयोग घडवून आणावा लागतो.
समतेचे मिथ्य!
गेल्या काही अंकांत सुरू असलेल्या स्त्रीस्वातंत्र्याच्या चर्चेत नी. र. वऱ्हाडपांडे यांचा “समतेचे मिथ्य” हा लेख काही मौलिक भर घालील असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. उदाहरणार्थ, समता, न्याय या संदर्भात दि. य. देशपांडे म्हणतात तसे वऱ्हाडपांडे वेड घेऊन पेडगावला जातात. पूर्वी दसर्यानला एका ताटात तांदूळ घेऊन, त्यात “रावण” रेखूनत्या रावणाला मारीत असत. वऱ्हाडपांडे असेच करतात.
जेव्हा आपले विवेचन एखाद्या पूर्वपक्षाला दिलेल्या उत्तराच्या रूपात असते, तेव्हा पूर्वपक्ष निःपक्षपातीपणाने व त्याच्या सर्व बलस्थानांसह मांडून मगच त्याचा समाचार घ्यायला हवा. त्याऐवजी पूर्वपक्षाचे दुर्बल व विकृत रूप मांडण्याने चर्चेची पातळी खालावते.
विक्रम आणि वेताळ
विक्रमादित्याला आता अनेक शतके वेताळाला खांद्यावर घेऊनच हिंडायची सवय झाली होती. त्याचे उत्तर तयार होते. ‘वेताळा, मला संभ्रमात पाडण्याचे तुझे नियत कार्य तू आपल्यापरीने केलेस. तसे करताना तू मूळ प्रश्नावर अनेक रंगांचे थरही दिलेस. तणाव असह्य होऊन कोवळ्या वयात आत्महत्या करणे भाग पडावे ही घटना निःसंशय दुष्ट.’
‘जगातले सर्व विचारवंत एखादी कृती करणे असेल तेव्हा प्रश्न व्यक्तिगत, फार तर कौटुंबिक पातळीवर सोडवतात. तुझ्या तिरस्काराला पात्र असलेल्या इंग्रजीत याला micro-level असे म्हणतात. जेव्हा क्रिया करणे नसेल तेव्हा तोच प्रश्न व्यापक पातळीवर macro-level वर नेऊन सर्वव्यापी उत्तर शोधतात.