विषय «इतर»

इतर

आम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. माझ्या मनात आले, ह्या तुरुंगाच्या भिंती बोलू लागल्या तर किती क्रौर्याच्या करुण कहाण्या कानावर येतील! लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या!

पुढे वाचा

खरं, पुनर्जन्म आहे?

आपण नसावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटून काय उपयोग? जन्माला आला तो जाणार हे ध्रुवसत्य आहे. तसे मृताला पुन्हा जन्म आहे का? तेही ध्रुवसत्य आहे काय? । सश्रद्ध भावनावादी म्हणतो, ‘हो, आहे. कारण पुनर्जन्म पूर्वजन्म मानला नाही तर कशाची संगती लागत नाही. जीवनाला आधार मिळत नाही. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें.’ या विचाराने दुःख सहन करायला धीर मिळतो. ‘सदाचार तो थोर सांडूं नये तो का बरे,तर त्यामुळे मनाचे समाधान करता येते, या जन्मी फळ न का मिळेना’.

पुढे वाचा

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ७)

उद्याचे जग आजच्यापेक्षा जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे अधिक सुखी असावे असे विधान मी केले तर माझ्याशी कोणी विवाद करणार नाही. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांवर आज अधिक बन्धने आहेत. आणि त्यांची स्वायत्तता आज कमी आहे हे माझे विधानही बहुधा विरोधाशिवाय स्वीकारले जाईल. इतकेच नाही तर पूर्वीच्या मानाने ती बंधने आता कमी होत चालली असून स्त्रीची शारीरिक आणि आर्थिक शक्ती वाढावी ह्यासाठी समाजामध्ये ज्यूडोकराटेचे वर्ग कसे सुरू केले गेले आहेत आणि तिला नोकर्यांवमध्ये कसे सामावून घेतले जात आहे, अनुकंपेच्या आधारावर विधवांना आज नोकर्याक कश्या मिळत आहेत ते मला सविस्तरपणे समजावून दिले जाईल.

पुढे वाचा

चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?

सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे.
मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना क्रान्तदर्शनाची दिव्य अंतर्दृष्टी (clairvoyance) त्यांच्या पौर्वात्य गुरूंकडून प्राप्त झाली होती. ह्या दिव्य अंतर्दृष्टीमुळे सूक्ष्मात सूक्ष्म अणूदेखील मोठ्या आकारात ते आपल्या अंतर्मनात पाहू शकत असत. पातंजल योगसूत्रांत ‘अणिमा’ नामक ह्या सिद्धीची प्रक्रिया सांगितली आहे.

पुढे वाचा

अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही

टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु हा समज नवा नाही. विश्लेषण, संश्लेषण, विवेक, तर्क आणि प्रत्यक्ष पुरावा याभक्कम पायावर आधारलेल्या विज्ञानाने दिलेली आव्हाने पारंपारिक धर्मकल्पनांना पेलताआली नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान धोकादायी आहे अशी कल्पना गेल्या शतकात : रूढ झाली.

पुढे वाचा

आगरकर विशेषांक – सुधारणांचा शोचनीय व्युत्क्रम

… सामाजिक सुधारणांपेक्षांहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत, आणि म्हणून राजकीय सुधारणा अगोदर झाल्या पाहिजेत. सुधारणांचा वास्तविक पाहतां असा क्रम असून आमचे सरकार त्याचा व्युत्क्रम करूं पाहाते, हे आश्चर्य नव्हे काय!.
….. जातिभेद, बालविवाह, असंमत वैधव्य, केशवपन वगैरे दुष्ट चालींपासूनआम्हांस पुष्कळ त्रास होत आहे; पणमिठावरील जबरदस्त कर, दर तीस वर्षांनी आमच्या जमिनीच्या बोकांडीस बसणारा रेव्हेन्यू सर्वेचा फेरा, व यमोदराप्रमाणे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये भक्ष्यस्थानी पडले तरी फिरून आपलें हपापल्यासारखे करणारे लष्करी खाते इत्यादिकांपासून आम्हांस जो त्रास होत आहे, त्यापुढे सामाजिक शोचनीय दुराचारापासून होणारा त्रास कांहींच नाही, असे म्हटले तरी चालेल.

पुढे वाचा

आगरकर व रानडे यांच्यातील वैचारिक द्वंद्व

दहा मे १८५८ रोजी पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर एक ऐतिहासिक चर्चा घडून आली. ही चर्चा पूर्वनियोजित नव्हती. सुप्रसिद्ध प्राच्यविद्याविशारद रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात भांडारकरांनी मांडलेल्या एका मुक्ष्याच्या निमित्ताने ही चर्चा उत्स्फूर्तपणे सुरू झाली. इच्छित सामाजिक बदलासाठी धर्मसुधारणा आधी घडून येणे अत्यंत आवश्यक आहे, असा भांडारकरांचा मुद्दा होता. माधवराव रानडे, विष्णु मोरेश्वर महाजनी, लोकमान्य टिळक आणि गोपाळराव आगरकर इ.विख्यात व्यक्ती त्या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. ‘अज्ञेयवादी तत्त्वज्ञानाचे प्राथमिक धडे देऊ पाहणारे अनिष्ट पुस्तक’ अशी ज्याची रानड्यांनी संभावना केली होती त्या ‘बटलर्स मेथडऑफ एथिक्स’ या पुस्तिकेचे लेखक व डेक्कन कॉलेजचे प्राचार्य फ्रांसिस सेल्बी आणि विश्वविख्यात कवी वर्डस्वर्थचे नातू व एलफिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य विल्यम वर्डस्वर्थ हेही त्यावेळी उपस्थित होते.

पुढे वाचा

शारदासदनासंबंधीचा वाद

(पं. रमाबाईंनी शारदासदनाची स्थापना करून त्यामध्ये अनाथ स्त्रियांना आश्रय दिला. तेथील वातावरणामुळे त्या स्त्रियांना ख्रिस्ती धर्माबद्दल आपुलकी वाटू लागली व त्यांपैकी काहींनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याबरोबर शारदासदनाची लोकप्रियता घटू लागली व पालकांनी भराभर आपल्या मुली तेथून काढून घेतल्या. य. दि. फडके लिखित आगरकरचरित्रामधल्या त्या कालखंडाविषयी ..- सं.)
टिळकांनी संमतिवयाच्या विधेयकाविरुद्ध रान उठवण्यास सुरुवात केली तेव्हा नोव्हेंबर १८९० च्या नॅशनल रिव्ह्यू या नियतकालिकाच्या अंकात लायनेल अॅशबर्नर या साहेबाने हिंदु विधवा या ‘सनदी स्वेच्छाचारिणी’ असतात असा निर्गल आरोप करताच गोपाळराव आगरकर संतापले.

पुढे वाचा

विवेकवाद आणि आगरकर

आगरकरांच्या संपूर्ण विचाराचे सूत्र सांगायचे झाले तर ते विवेकवाद (rationalism) होय असे आपण निभ्रांतपणे म्हणू शकतो. या विवेकवादाचे स्वरूप त्यांनी कोठे तपशीलवार सविस्तर सांगितले आहे असे म्हणता येत नाही. त्यांनी आपल्या सुधारणावादाचा पुरस्कार करण्याकरिता साप्ताहिक वृत्तपत्र हे माध्यम स्वीकारल्यामुळे त्यांच्या विवेचनाला मर्यादा पडल्या होत्या. राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय, तत्त्वज्ञानात्मक, धार्मिक इत्यादि विषयांची साधकबाधक, सविस्तर आणि मूलगामी चर्चा त्या माध्यमात करणे अशक्यप्राय होते. त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यामुळे त्यांना ग्रंथरचना करण्यासही सवड झाली नाही. शिक्षण संपल्याबरोबर ते वृत्तपत्रीय व्यवसायात पडले, आणि प्रथम सात वर्षे केसरीचे संपादन करून पुढील सात वर्षे सुधारकचे संपादन करीत असतानाच त्यांचे वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी अकाली निधन झाले.

पुढे वाचा

आगरकरप्रणीत धर्मचिकित्सेचा आशय

गोपाळ गणेश आगरकर (१८५६ ते १८९५) हे धर्मवेत्ते नव्हते. डॉ. भांडारकर किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याप्रमाणे ते तुलनात्मक धर्मशास्त्राचे अभ्यासकही नव्हते. रूढ अर्थाने ज्याला आपण धार्मिक वृत्ती म्हणतो तिचा त्यांच्या ठायी अभावच होता. अशी व्यक्ती जेव्हा धर्मविषयक प्रश्नांसंबंधी बोलू लागते तेव्हा आपल्या मनात दोन प्रतिक्रिया निर्माण होतात. एक, अशा अधार्मिक व्यक्तीला धर्मसंबंधाने बोलायचा खराच काहीअधिकार आहे काय, आणि दोन, अशी अधार्मिक व्यक्ती जेव्हा धर्माबाबत बोलेल तेव्हा ते धर्मविरोधीच असणार. आगरकरांना त्यांच्या हयातीतच या दोन्ही प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागले होते आणि त्यांनी ते समर्थपणे दिलेही!

पुढे वाचा