लिंगभावातीत समान नागरी कायदा ही आजच्या काळाची गरज आहे. समान नागरी कायदा असावा किंवा नसावा हा प्रश्न आता गैरवाजवी आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये समानतेच्या तत्त्वावर आधारित, सर्वांना सर्व विषयांच्या संदर्भात लागू होणारा एकच कायदा असायला हवा, ह्यात वादाचा मुद्दा असूच शकत नाही. तत्त्वतः ही भूमिका मान्य आहे असे धरले तर पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे समान नागरी कायद्याचे विवाह, वारसा, दत्तक ह्या विषयावरील मसुदे लोकांसमोर आणून त्यावर चर्चा करणे. आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने असे मसुदे तयार करण्याचे प्रयत्न गेल्या ५० वर्षांत केलेले नाहीत.
विषय «इतर»
कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव
‘डीप ब्लू’ ह्या संगणकावरील कार्यप्रणालीत बुद्धिबळात अनेक वर्षे जगज्जेता असलेल्या कॅस्पोरोव्हला ‘बुद्धिमत्तेची झलक दिसली व ती एक विचित्र, अकार्यक्षम व लवचिकता नसलेली बुद्धिमत्ता आहे असे वाटले. (आजचा सुधारक जून ‘९६). नंदा खरे ह्यांना अपेक्षित असलेल्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेविषयी चर्चा न करता कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव (robot) या संपूर्ण दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या शाखांवरून बुद्धिमान यंत्रमानवाचा विकास होण्याची शक्यता आहे काह्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
यंत्रमानवाविषयीचे तंत्रज्ञान पूर्णपणे मानवाच्या शारीरिक क्षमतेस पर्यायी व्यवस्था म्हणून विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक बिनडोक, स्वतंत्र निर्णय न घेणारा पण पूर्ण आज्ञाधारक, तंतोतंत, बिनचूक काम करणारा व मानवापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या यंत्रमानवाची रचना करून मानवाचे शारीरिक श्रम व वेळ वाचवण्यास मदत होत आहे.
मृत्युशय्येवरील ह्यूम
… ७ जुलै १७७६ रोजी मी मि. डेव्हिड ह्यूम’ यांना भेटायला गेलो. ते आपल्या दिवाणखान्यात एकटेच टेकून पडले होते. ते कृश आणि भेसूर दिसत होते. ते शांत आणि समाधानी दिसले. आपण लवकरच मरणार आहोत असे ते म्हणाले … मृत्यू समक्ष उभा असतानाही मरणोत्तर अस्तित्वावरील आपला अविश्वास कायम आहे काय असे मी विचारले. त्यावेळी ते जे बोलले त्यावरून तो कायम होता असे माझे मत झाले. मरणोत्तर अस्तित्व शक्य नाही काय? असे मी विचारले. ते म्हणाले की कोळसा आगीत टाकल्यावर जळणार नाही हेही शक्य आहे.
विवेकवादाविषयी पुन्हा थोडेसे
‘विवेक’ हा शब्द मराठीत आणि संस्कृतमध्ये ‘reason’ याच्या अर्थाहून काहीशा वेगळ्या अर्थाने रूढ आहे. उदा. ज्ञानेश्वरांनी गीतेच्या विषयाचे वर्णन ‘विवेकाची गोठी’, म्हणजे विवेकाची गोष्ट असे केले आहे. परंतु आपण तो शब्द reason या अर्थी वापरीत आहोत, कारण ‘rationalism’ या शब्दाला पर्याय म्हणून आगरकरांनी ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला आणि आपण त्यांचे अनुसरण करीत आहोत. आता खुद्द इंग्रजीत ‘rationalism’ हा शब्द निदान दोन अर्थांनी रूढ आहे, आणि त्यापैकी एकच आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून ‘rationalism’ या शब्दाच्या कोणत्या अर्थी ‘विवेकवाद’ हा शब्द अभिप्रेत आहे असा प्रश्न पडतो.
सोवियत यूनियनमधील धर्मस्वातंत्र्य (प्रा. सत्यरंजन साठे यांचे पूर्वग्रहदूषित विधान)
जुलै-ऑगस्ट १९९६ च्या आजचा सुधारकच्या अंकात प्रा. सत्यरंजन साठे यांचा ‘धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय’ असे शीर्षक असलेला एक चांगला लेख प्रसिद्ध झाला
आहे. परंतु त्यामध्ये रशियामध्ये व्यक्तीला धर्माबाबतचे स्वातंत्र्यचनाकारले गेले’, असे एक विधान पान १४२ वर करण्यात आले आहे. उजव्या विचारसरणीच्या नियतकालिकांमधून अथवा ग्रंथांमधून करण्यात आलेला पूर्वग्रहदूषित अपप्रचार जर बाजूला ठेवला तर काय आढळते?
(१)१९८८ सालच्या आकडेवारीनुसार खालील विविध धर्म व धर्मपंथीयांची मिळून वीस हजार प्रार्थना अथवा उपासना मंदिरे सो. यूनियनमध्ये अस्तित्वात होती : रशियन ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथलिक, लुथेरन, ओल्ड बिलीव्हर्स, बॅप्टिस्टस्, सेव्हन्थ डे अॅडव्हेन्टिस्टस्, मोलोकन्स, सिनेगॉगस्, मशिदी, बौद्ध देवालये.
श्री पंडित आणि श्री खांदेवाले यांच्याचर्चेच्या निमित्ताने
श्री. चिं. मो. पंडितांचे पत्र व त्याला श्री. खांदेवाल्यांचे उत्तर यावरून सुचलेले कांही मुद्दे असे –
(१) वेगवेगळे व्यवसाय व त्यांच्यात ‘रूढ झालेली वेतने यांमधील असमतोल वाढत आहे, व हे पंडित आणि खांदेवाले या दोघांनाही (व मलाही) गैर वाटते. ज्या क्षणी श्रमविभाजन आले, त्या क्षणी व्यवसाय घडले. तोपर्यंत माणसे ‘बहु-उद्देशीय’ असू शकत होती.
व्यवसाय, व्यक्ती व समाज यांच्या संबंधात दोन बाजूंनी विचार करायला हवा. एक म्हणजे, प्रत्येक समाज कोणकोणत्या देशाची किती किती माणसे ‘बाळगू शकतो, हे जवळपास ठरीव असते. जसे, एखाद्या समाजातले अर्धे लोक वैद्य असू शकत नाहीत.
समतेच्या मार्गातील अडथळे
आजच्या सुधारकच्या मागच्या म्हणजे सप्टेंबर १९९६ च्या अंकामध्ये डॉ. चिं. मो. पंडित ह्यांचे एक पत्र व त्यावर डॉ. श्रीनिवास खांदेवाले ह्यांचे उत्तर असे दोन लेख प्रकाशित झाले आहेत.
डॉ. पंडितांनी मांडलेले किंवा त्यांसारखे आणखी काही मुद्दे प्रस्तुत लेखकालाही अनेक वर्षांपासून छळत आहेत; त्यामुळे अर्थकारण हा त्याच्या जिज्ञासेचा विषय राहिला आहे. त्याविषयी काही चिंतन त्याच्या मनात झालेले आहे. चालू आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने त्याचे विचार वाचकांसमोर मांडण्याची संधी घेत आहे. त्या विचारांची दिशा बरोबर आहे की नाही ह्याचा पडताळा वाचकांनी त्याला द्यावा अशी विनंती आहे.
आगरकर : एक आगळे चरित्र (भाग २)
आगरकर ले. य. दि. फडके, मौज प्रकाशन, १९९६. किंमत रु. १७५/
आगरकर उंच होते. अंगकाठी मूळची थोराड व काटक होती(११६)*, डोळे पाणीदार (९). राहणी-वेश पारंपरिक, शेंडी मोठी पण घेरा लहान, (११६). मात्र ते जानवे घालत नसत आणि संध्याही करत नसत (२४२) .त्यांचे किंचित पुढे आलेले दात झुपकेदार मिशांनी झाकले जात (११६). बुद्धी चपळ आणि वृत्ती मनमिळाऊ असलेले (९) गोपाळराव डेक्कन कॉलेजातल्या शिक्षकांना आठवतात ते ‘सर्वांत मोठा विद्यार्थी, धिप्पाड व बलवान’ असे या रूपात (२५२). आगरकरांचे हे चित्र, चरित्रग्रंथात विखुरलेले उल्लेख एकत्र करून जुळवता येते.
आगरकर : एक आगळे चरित्र (भाग १)
‘टिळक, आगरकर, गोखले वगैरे मंडळींविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे … मात्र हे लेखन कळत नकळत एकतर्फी, पूर्वग्रहदूषित होते … ज्या शिस्तीने व काटेकोरपणे व्हावयास हवे होते तसे ते झालेले दिसत नाही,” अशी डॉ. य. दि. फडके यांची तक्रार कधीपासून वाचनात आहे. अर्वाचीन महाराष्ट्राचे इतिहासकार आणि सामाजिक परिवर्तनाचे भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक विद्वन्मान्य आहे, इतकेच नाही तर राजमान्य देखील आहे. आपल्या सत्यसंशोधनाचे फलित शिस्त आणि काटेकोरपणा पाळून त्यांनी वारंवार वाचकापुढे ठेवले आहे. त्यांची शोधः बाळ-गोपाळांचा (१९७७)आणि व्यक्ती आणि विचार (१९७९) ही प्रस्तुत चरित्रविषयाशी संबंधित पुस्तके याच भूमिकेची निदर्शक आहेत.
‘सर्व माणसे समान आहेत’
मानवी व्यक्ती, जगातील सर्वच वस्तूंप्रमाणे, अनके बाबतीत असमान असतात हे नाकारणे अर्थातच शक्य नाही; आणि तसेच ही असमानता अतिशय महत्त्वाची आहे, आणि काही बाबतीत अत्यंत इष्टही आहे हेही निःसंशय….पण या सर्व गोष्टी मनुष्यांना विशेषतः राजकीय बाबतीत समान म्हणून, निदान शक्य तितके समान म्हणून वागविण्याचे आपण ठरवावे का, म्हणजे समान हक्क आणि समान वागणूक मिळण्यास पात्र समजावे का, या प्रश्नांशी पूर्णपणे अप्रस्तुत असून, आपण त्या प्रकारच्या राजकीय संस्था निर्माण कराव्या काय या प्रश्नाशी पूर्णतः असंबद्ध आहेत. कायद्याच्या दृष्टीने समानता’ ही वस्तुस्थिती नाही, ती नैतिक विचारावर आधारलेली एक राजकीय मागणी आहे, आणि तिचा ‘सर्व मनुष्य समान आहेत’ या (बहुधा असत्य असलेल्या मताशी काही संबंध नाही.