विषय «इतर»

उपयोगितावादाचे टीकाकार

उपयोगितावाद म्हणजे काय याविषयी आजचा सुधारक या मासिकात आजपर्यंत अनेक वेळा लिहून झाले असल्यामुळे त्याच्या टीकाकारांनी घेतलेल्या आक्षेपांचा विचारही अनेक वेळा केला गेला आहे. परंतु आज एक नव्या आक्षेपाचा विचार करायचा आहे. त्यामुळे त्याच्यावर घेतल्या गेलेल्या जुन्या आक्षेपांचा विचार त्रोटकस्याने केला तरी चालण्यासारखे आहे असे मी धस्न चालतो. उपयोगितावादावर गेल्या शंभरावर वर्षांत अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. पण त्यापैकी बरेच आक्षेप शाब्दिक आहेत, आणि अनेक गैरसमजावर आधारले आहेत. उदाहरणार्थ एक आक्षेप असा होता की जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे जे उपयोगितावादानुसार आपल्या कर्मांचे अंतिम उद्दिष्ट ते मुळात अशक्य आहे.

पुढे वाचा

मी “गृहिणी’ होतो

एकोणीसशे सत्याण्णवच्या मार्च महिन्यात माझी पत्नी निवर्तली. घरात मी, वय वर्षे ६४, चार हृदयविकाराचे झटके आलेल्या माझ्या सासूबाई, वय वर्षे ७७ आणि माझा नोकरी करणारा अविवाहित मुलगा, वय वर्षे २७, असे उरलो. ओघानेच घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पत्नी जाण्याआधी तिच्या दुखण्यात पोळीभाजी करायला एक बाई ठेवल्या होत्या, ती व्यवस्था चालू ठेवली. मला स्वतःला सर्व स्वयंपाक येत असल्यामुळे सकाळची न्याहरी, दुपारचे चहा खाणे, रात्री काही लागले तर करण्याची जबाबदारी मी स्वीकारली. सर्वसामान्यपणे आता मुलाचे लग्न करून टाकून प्रश्न सोडवावा असा विचार असतो.

पुढे वाचा

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग ३)

४. शाळा–परिसर, सोयी, वातावरण १. अपुऱ्या सोयी —-
प्रोब सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात शाळांची संख्या वाढली आहे. शाळेला क्रीडांगण असणे, शाळेत खडू–फळा असणे, ह्यासारख्या सोयीही वाढल्या आहेत. पण तरीही शाळेच्या एकूण घडणीसाठी ह्या सोयी फार अपुऱ्या आहेत. नियमानुसार शाळेला निदान दोन पक्क्या खोल्या, दोन शिक्षक, शिकवण्यासाठी फळे, नकाशे, तक्ते, ग्रंथालये यांसारखी साधने असायला हवीत. प्रोब राज्यांमधल्या अगदी मोजक्या शाळांमध्ये ह्या सोयी आहेत. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह ह्यासारख्या किमान गरजासुद्धा अनेक शाळा भागवत नाहीत त्यामुळे स्त्रीशिक्षिकांची फार अडचण होते. शाळेचा वापर इतर कामांसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो.

पुढे वाचा

“AIDS”! : एडसची भयावहता

आज आपण २००१ च्या—-नव्या वर्षाच्या, नव्या शतकाच्या—-नव्या सहस्रकाच्या जानेवारी महिन्यात पोचले आहोत. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. त्यात Information & Technology Industry च्या बरोबर Genetic Engineering पासून क्लोनिंग आणि मानवी Genome पर्यंत पोचलो आहोत. अनेक रोगांचा नायनाट करण्याचे सामर्थ्यही आपल्यात आज आहे. आपण बऱ्याच रोगांपासून बचाव करू शकतो. मनुष्याच्या आयुष्याची लांबी वाढत जाते आहे. लांबी बरोबरच व्याप्तीही वाढते आहे का? असा प्रश्न मला पडतो. या वैज्ञानिक प्रगतीच्या बरोबरीने मानवी संस्कृती, मानवी वर्तन यातही प्रगती झाली असती तर समाजाचा खऱ्या अर्थाने विकासही झाला असता.

पुढे वाचा

तत्त्वज्ञ मे. पुं. रेगे

(प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान ह्या ग्रंथ प्रकाशनसमयी दि. १७ डिसेंबरला, प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांनी केलेले भाषण)
हा गौरवग्रंथ आहे. रेग्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सिद्ध केलेला. रेगे तत्त्वज्ञ आहेत. त्यांच्या विद्यार्थिनी, नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख, प्राध्यापक सुनीती देव यांनी तो संपादित केलेला आहे.
प्रा. रेग्यांचे समग्र तत्त्वज्ञान या ग्रंथात नाही. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा-बाहेरही रेग्यांना ओळखणारे, चाहणारे, त्यांच्या विचारांकडे आणि मांडणीकडे आस्थेने आणि आपुलकीने पाहणारे पुष्कळ विद्वान आहेत. त्यांना आवाहन केले असते तर अधिक सांगोपांग, अधिक भरीव ग्रंथ निर्माण होऊ शकला असता.

पुढे वाचा

भारतीय संघराज्य व नवे प्रवाह

भारतीय संघराज्याच्या स्वरूपामध्ये बदल होत असणाऱ्या घटना गेल्या काही वर्षात घडत असलेल्या आपणास दिसतात. भारताचे संघराज्य हे पूर्णतः संघराज्यीय स्वरूपाचे नसून त्यात केंद्र सरकारचे अधिकार वाढवणाऱ्या आणीबाणीसारख्या अनेक तरतुदी आहेत. त्यामुळे ले अर्धसंघराज्यीय आणि अर्थ एकात्मिक संघराज्य आहे असे संघराज्यांच्या विकासाचा अभ्यास करणारे विचारवंत व घटनातज्ञ सांगत होते. पण १९९० नंतरच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय बदलांमुळे संघराज्याचे स्वरूप बदलत असताना आपणास दिसते. राज्यघटनेची पुनः समीक्षा करणाऱ्या आयोगाला हे जे नवे बदल घडून येत आहेत त्याचा विचार करणे अपरिहार्य बनत चाललेले आपणास दिसते.

पुढे वाचा

धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता

निसर्गसृष्टीतील घडमोडींविषयीचे वैज्ञानिक अज्ञान, त्यापोटी वाटणारे भय आणि येणारे दुबळेपण, निसर्गाच्या अनाकलनीय शक्तींना ‘संतुष्ट’ करून स्वतःचे जीवन आश्वस्त, सुरक्षित व समृद्ध करण्याची कांक्षा व धडपड यामधून ‘धर्म’ या गोष्टीचा उदय झाला, ही एक ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ वर्तुळातील प्रतिष्ठित व शिष्टमान्य मांडणी आहे.
आधुनिक विज्ञानाच्या युगाच्या उत्कर्षाने ज्ञानाची प्रभा सर्वदूर पसरल्या-नंतर, ज्ञानांधकारात भरभराटलेल्या धर्माची व धर्मसंस्थेची गरज संपुष्टात आलेली आहे. भौतिक विज्ञानांच्या जोडीला, सतराव्या शतकापासून, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानवस्वभावप्रकृतिशास्त्र, समाजशास्त्र अशी मानवी व्यापारांचे नियम, त्यांचे गतिशास्त्र यांची उकल करणारी शास्त्रे उत्कर्ष पावली आहेत. जे जसे वास्तवात आहे, वास्तवात जे घडते त्यांचा वैज्ञानिक (शास्त्रीय) विचारपद्धतीचा अवलंब करून अभ्यास करून निष्पन्न झालेले ज्ञान (‘पॉझिटिव्ह नॉलेज’) यावर ही सर्व मानवीय शास्त्रे रचलेली आहेत.

पुढे वाचा

सखोल लोकशाही

[रल्फ नेडर (Ralph Nader) हा ग्राहक चळवळीचा एक प्रणेता. ‘अन्सेफ ॲट एनी स्पीड’ हे पुस्तक लिहून अमेरिकन मोटर-कार उद्योगाला ‘वळण’ लावणारा, ही त्याची ख्याती. २५ जून २००० रोजी ‘हरित पक्ष’ (Green Party) या नव्या अमेरिकन राजकीय पक्षाने नेडरला २००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत आपला उमेदवार म्हणून नेमले. ही नेमणूक स्वीकारताना नेडरने केलेल्या भाषणाचा सारांश सोबत देत आहोत.
हरित पक्ष हा पर्यावरणवादी आणि सामान्य माणसांचे हित पाहणारा पक्ष असणार आहे. येती निवडणूक हा पक्ष नक्कीच हरेल! पण जर्मनीसकट अनेक युरोपीय देशात असले हिरवे पक्ष आज दहा-दहा टक्के मते खेचत आहेत.

पुढे वाचा

आडनाव हवेच कशाला?

नावाच्या आड येणारे ‘आडनावच नको’ हे म्हणणे आडमुठेपणाचे वाटेल; परंतु सखोल विचारांती ते आपणास पटेल. ‘लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?’ या लेखात सुरेखा बापट यांनी स्त्री-पुरुष समानतेत येणारे अडथळे यांची चर्चा केली आहे. परंतु ‘आडनाव हवेच कशाला?’ याचे विवेचन पुढीलप्रमाणे देत आहे.
आडनावामुळे येणारे अडथळे खालीलप्रमाणे —-
१. भारतीयांच्यात असलेला धर्मभेद, जातिभेद आडनावामुळे चटकन लक्षात येतो. उदा. कांबळे—मागासवर्गीय, पाटील—मराठा इ.
२. आडनावात प्राणी, पक्षी, यांची नावे येतात. तेव्हा माणसांनासुद्धा नावात प्राणिमात्रांची गरज आहे हे दिसून येते. परंतु गाढवे, विंचू, कोल्हे, लांडगे इ.

पुढे वाचा

दुर्दशा

१. संगणकासारख्या अत्याधुनिक विषयात भारतीय अग्रेसर दिसतात व त्यात भारताचे काही लोक लक्षाधीश, कोट्यधीश व अब्जाधीशही होऊ लागले आहेत.
२. भारताचे अन्नधान्य उत्पादन वाढत्या प्रमाणावर आहे व त्यात भारत निर्यातक्षम होणार आहे.
भारताचे संरक्षणसामर्थ्य कमी लेखण्यासारखे नाही व भारताची विदेशी चलनाची गंगाजळी समाधानकारक आहे अशा काही मोजक्या बाबी भारताच्या जमेच्या बाजूने असल्या तरी भारताचे केंद्रशासन हिंदुत्वाच्या अहंकाराकडे झुकलेले, विस्कळीत, दुर्बळ व अकार्यक्षम झाले आहे.
राज्य-सरकारे अर्धशिक्षित व स्वार्थी मंत्र्यानी भरलेली आहेत, देशभर शिक्षण-क्षेत्रात भयानक दुरवस्था आहे. सर्व शासकीय व निमशासकीय पातळ्यांवर पराकोटीचा भ्रष्टाचार माजलेला आहे.

पुढे वाचा