विषय «इतर»

आजचा सुधारक व आगरकरांचे विचार

भारतात नुकत्याच झालेल्या फूलनदेवीच्या हत्येचे कारण व कारस्थान अजून पूर्ण उघडकीस आले नसले तरी शेरसिंग राणा याने राजपुतांच्या खुनाचा बदला घेऊन ठाकूर/राजपूत जातींचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हा खून केला हे वाचून भारतात आजही जातिनिष्ठा व जात्यभिमान किती तीव्र आहे याची खात्री झाली. दोन वर्षे अगोदर फूलनदेवी जेव्हा न्यूयॉर्कला यु. एन्. ओ. मध्ये आल्या होत्या तेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. जास्त शिक्षित नसूनदेखील भारतातल्या मागासलेल्या (दलित) समाजाच्या व विशेषतः त्यांच्या स्त्रियांच्या उन्नतीकरता त्यांची कळकळ पाहून व विचार ऐकून भविष्यात गोर-गरिबांकरता त्या जोरदार आवाज उठवतील असे वाटले होते.

पुढे वाचा

शालेय शिक्षणाविषयी थोडेसे

१. आ.सु.च्या गेल्या काही अंकांतून शालेय शिक्षणाविषयी बऱ्याच चिंता व्यक्त झाल्या आहेत. “आम्हाला का विचारत नाही” असा प्रश्न जुलैच्या अंकाच्या पहिल्या पानावर पालकांतर्फे विचारला गेला आहे. ‘परभारे’ निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर टीका आहे.
२. १९८६ साली सरकारने शिक्षण धोरणावर जाहीर चर्चेचे आवाहन केले व झालेल्या चर्चेवर आधारलेली स्परेखा प्रसिद्ध केली. या स्परेखेचे पुनरवलोकन करताना NCERT या सरकारी संस्थेने अनेक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक-संस्था, गैरसरकारी संस्था यांच्यात चर्चा घडवून आणल्या व त्या आधारावर नवीन रूपरेखा तयार केली असा त्या संस्थेचा दावा आहे. या संबंधीची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर मी एका शिक्षण-संस्थेच्या वतीने NCERT कडे या स्परेखेच्या प्रतीची मागणी केली व ती मला सहजपणे मिळाली.

पुढे वाचा

मेंदू, भावना, सहजप्रवृत्ती, नैवेद्य वगैरे

मेंदूची रचना आणि कार्य यांचा अभ्यास दाखवतो की मेंदू आणि संगणक या एकाच नमुन्याच्या रचना आहेत. बाहेरून मिळणाऱ्या संवेदना आणि स्वतःत साठलेले सूचनांचे संच यांच्यावर तार्किक प्रक्रिया करून काही क्रिया घडवणे, हे संगणकाचे काम, आणि मेंदूचेही. बाहेरच्या संवेदना आणि सूचनांचे साठे वापस्न तर्क लढवणाऱ्या यंत्राची कल्पना अॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितीला १९३५ साली सुचली. १९४३ मध्ये मॅककुलक आणि पिट्स या अमेरिकन जैवभौतिकीतज्ञांनी मज्जाव्यवस्था आणि मेंदू यांचे काम टुरिंगच्या कल्पनेतल्या यंत्रासारखेच चालते, हे दाखवून दिले. तेव्हापासून आजवर मेंदूचे काम आणि संगणकाचे काम ह्यांच्या समरूपतेला पुष्टीच मिळत गेली आहे.

पुढे वाचा

देवांची गरज आणि ‘पदभ्रष्टता’

अज्ञात प्रदेशातून ध्वनी ऐकू आला, माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना, सबब भूताची कल्पना केली. निरनिराळ्या अज्ञातोद्गम ध्वनींना, हावभावांना, आकाशचित्रांना, रोगांना, दुःखांना, सुखांना, जन्माला व मरणाला एक एक भूत कल्पिले. सुष्ट भुते व दुष्ट भुते निर्माण झाली. त्यांची उपासना सुरू झाली. नंतर रोग्यांची, सुखांची व दुःखाची खरी कारणे व तन्निवारक उपाय जसजसे कळू लागले, तसतशी सुष्ट भूतांची म्हणजे देवांची व दुष्ट भुतांची म्हणजे सैतानाची टर उडून जरूरी भासतनाशी झाली. . . . देवाची आणि देवीची जरूर कोठपर्यंत, तर संकटनिवारणाचे उपाय सुचले नाहीत तोपर्यंत.

पुढे वाचा

कुटुंब-व्यवस्था – मुलांना वाढविणे (भाग २)

१०. परीकथा, कहाण्या, गोष्टी
मुलांचे जग स्वप्नांचे, अद्भुतरम्यतेचे असते. आजूबाजूच्या जगाविषयी कुतूहल अचंबा वाटत असतो. शिवाय स्वतःचे काल्पनिक जगही ती उभी करू शकतात. कल्पनेनेच चहा करून देतात, बाजारात जाऊन भाजी आणतात, घर घर खेळतात, फोन करतात. शहरातल्या मुलांचा परिसर म्हणजे रहदारी, गोंगाट, भडक जाहिराती असा धामधुमीचा असतो. आजकाल घरचे वातावरण पण धावपळीचे आणि यंत्राच्या तालावर नाचायला लावणारे असते (दूरदर्शन, पंखे, गीझर, मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन, नळ, वीज . . . .) आयुष्याची गतीच ‘चाकांवर’ आधारित. अशा मुलांना स्वप्ने तरी शांत, कल्पनारम्य, अद्भुत कोठून पडणार?

पुढे वाचा

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग १)

चिं. मो. पंडित यांनी (आ.सु. ११.११, १२.३) एका मोठ्या व महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. भविष्यातली समाजव्यवस्था ‘स्त्री-केन्द्री कुटुंबव्यवस्थे’ वर आधारित असावी असे मत मांडणाऱ्यांचा भूमिकेची ते वेगवेगळ्या अंगांनी पाहणी / तपासणी करतात. यासाठी जो ‘अप्रोच’ त्यांनी घेतला आहे व जी पद्धती अवलंबिली आहे ती फलदायी ठरण्याची शक्यता आहे.
कुटुंब हे समाजाच्या बांधणीचे पूर्वापार प्राथमिक व पायाभूत एकक राहिले आहे. पण या सामाजिक संस्थेवर गेल्या पन्नास वर्षांमध्ये सैद्धान्तिक आघातही केले जात आहेत. स्त्रीला पुरुषांच्या प्रभुत्वापासून मुक्त करावयाचे असेल तर तिला नवरा नावाच्या पुरुषाशी बांधून, जखडून ठेवणाऱ्या विवाह बंधनातून सोडविण्याची आवश्यकता मांडली गेली आहे.

पुढे वाचा

परिचायक:

द्वितीय युद्धपूर्व साम्राज्यवादातून मुक्त झालेले गरीब देश पूर्वीच्याच राज्यकर्त्या देशांच्या (काही देश त्यात जोडले गेले) कडून घेतल्या गेलेल्या कर्जाच्या (मुद्दल + व्याजाची परतफेड) विळखात सापडले आहेत. १९५५ साली ९ अब्ज डॉलर्स असलेले हे कर्ज १९८० मध्ये ५७२ अब्ज डॉलर्स झाले आणि १९९८ पर्यंत ते २२०० अब्ज डॉलर्स इतके वाढले. १९९७ मध्ये एक असा अंदाज व्यक्त केला गेला की हे वार्षिक देणे जर नसले तर एकट्या आफ्रिका खंडात दर वर्षी ७० लक्ष मुलांचे प्राण वाचतील आणि सुमारे ९ कोटी स्त्रिया व मुलींना प्राथमिक शिक्षण मिळू शकेल.

पुढे वाचा

उपजत प्रवृत्ती

आजचा सुधारक मधील लेखनात ‘उपजत प्रवृत्ती’ (Instinct) या मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे असे वाटते. मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या बुद्धी व भावना या दोन घटकांकडे आजचा सुधारक मध्ये पुरेसे लक्ष दिले जाते.
प्राण्यांचे वर्तन प्रामुख्याने उपजत बुद्धीने ठरत असते. आई-मुलांनी परस्परांना ओळखण्याच्या क्रियेपासून पिलांना पाजणेभरवणे, घरटे बांधणे, काय खावे काय खाऊ नये, अन्न कसे मिळवावे, लैंगिक जोडीदाराची निवड, आपल्या स्वामित्व-क्षेत्राचे मर्यादीकरण व रक्षण, शत्रूला ओळखणे व त्याच्यापासून संरक्षण वगैरे सर्वच क्रियांमध्ये सर्व क्षेत्रात उपजत बुद्धीच महत्त्वाची असते व शिक्षणाचे, अनुभवा-पासून शिकण्याचे महत्त्व गौण असते.

पुढे वाचा

भारत नावाचे सामर्थ्य

आ.सु.च्या जुलै अंकात प्रा. द. भि. दबडघावांनी परीक्षण केलेले ‘आय प्रेडिक्ट’ हे भारताच्या लोकसंख्येवरचे माझे तिसरे पुस्तक. जवळजवळ हजार पानांच्या पाच आवृत्त्यांचा आशय दबडघावांनी पाच पानांमध्ये खूप परिणामकारकपणे सांगितला आहे.
आ.सु.च्या वाचकांपैकी कुणाला कदाचित वाटेल की पावसाचे विज्ञान मी सांगणे ठीक, पण लोकसंख्येशी माझा काय संबंध? तेव्हा एक खुलासा करतो. इंडियन सायन्स काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनाचा अध्यक्ष असताना ‘सायन्स, पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट’ हा माझ्या अध्यक्षीय भाषणाचा विषय होता. या तीन घटकांतील समान धागे तपासावेत, त्यासाठी स्वच्छ मनाने निरीक्षण करावे अशी वैज्ञानिक भावना माझ्या डोक्यात होती.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण भूमि संपादन अधिनियम १८९४ – अर्थउकल (मार्च २००१ रोजी जसा होता तसा)

लेखकाने भूमिसंपादनाचा कायदा सहजपणे वाचता व समजून घेता यावा यासाठी हे पुस्तक लिहिले आहे तसेच या पुस्तकाचा वाचक हा खेड्यातील किंवा शहरातील या विषयात अनाभिज्ञ असलेला माणूस असेल हे गृहीत धरले आहे. लेखकाने या पुस्तकात अधिनियमावर कोणतीही टीकाटिप्पणी केलेली नाही. यातील कोणती तरतूद अन्याय्य आहे व ती कशी, याबद्दल काहीही सांगितले नाही. फक्त “कायदा काय म्हणतो” तेवढेच सांगण्याचा मर्यादित उद्देश ठेवला आहे. अशिक्षित किंवा कायदा या विषयाशी अपरिचित असलेल्या अनेक सामान्यजनांना हे पुस्तक वाचावयाचे आहे अशी लेखकाची अपेक्षा आहे. या पुस्तकात मूळ पाठ (Bare Act) व त्याचा सोप्या भाषेतील अर्थ हे दोन्ही सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे : हे पुस्तक निव्वळ या अधिनियमापुरतेच तयार केले नाही.

पुढे वाचा