विषय «इतर»

‘ल्यूटाइन बेल’

लॉइज ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्याव-सायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात. लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती आणि लॉइड्जच्या दालनातील बहुतेकांचा प्रत्येक जहाजाच्या प्रत्येक सफरीच्या विम्यात सहभाग असे. एखादे जहाज बुडाल्याची वार्ता आली की दालनाच्या एका कोपऱ्यातील ‘ल्यूटाइन बेल’ (Lutine Bell) वाजवली जाई.

पुढे वाचा

समाजसुधारकांचा वर्ग

प्रत्येक वर्ग तत्त्वे आपल्या वर्गाच्या दृष्टीने किंवा आपल्या विशिष्ट अनुभवाच्या दृष्टीने मांडीत असतो. त्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची तपासणी करताना तत्त्वे मांडणारांचा वर्ग कोणता होता आणि त्यांची परिस्थिती काय होती याचा नि चय आपणास केला पाहिजे. सामाजिक भावना आणि शासनसंस्था यांचा निकट संबंध असला तरच सामाजिक सुधारणेस प्रवृत्ती होणार आणि कर्तव्यात्मक समाज-शास्त्राची उत्पत्ती होणार. सामाजिक भावना असेल तरच विविध कार्यक्रम लोकांमध्ये उत्पन्न होईल. हिंदुस्थानात १९१९ च्या सुधारणा आल्या तरी समाजाच्या सुखाची आणि संरक्षणाची जबाबदारी घेणारी सामाजिक भावना जन्मास आली नाही. काँग्रेसचे लक्ष ती मवाळ वर्गाच्या ताब्यात होती तोपर्यंत केवळ सिव्हिल सर्व्हिसच्या नोकऱ्या हिंदी लोकांस अधिक मिळाव्यात आणि त्यासाठी त्या नोकरीभरतीच्या परीक्षा हिंदु-स्थानात व्हाव्यात इकडेच होते.

पुढे वाचा

स्त्री: पुरुष प्रमाण

२००१ साली झालेल्या जनगणनेनुसार सर्वच भारतात व विशेषतः काही राज्यांत दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९२७ इतकी कमी झाली आहे व आणखीच कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे काही मोठे नुकसान होणार आहे, या कल्पनेने भयभीत होऊन अनेक व्यक्ती धोक्याची घंटा वाजवत आहेत.

समाजातील स्त्रियांची संख्या कमी होणे याचा अर्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात स्त्री-हत्या होत आहे. शास्त्र-तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे स्त्रीहत्येचे स्वरूप अधिकाधिक सोपे, निर्धोक, वेदनारहित व ‘मानवी’ (Humane) बनत आहे. पूर्वीचे स्त्रीहत्येचे प्रकार असे:

(१) नवजात स्त्री अर्भकाला मारणे — उशीने दाबून, पाण्यात/दुधात बुडवून, जास्त अफू घालून, न पाजून, भरपूर मीठ किंवा विष पाजून, थंडीत उघडे ठेवून, कचरा कुंडीत किंवा अन्यत्र टाकून वा अन्य रीतीने.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला, तेव्हा प्रेतातील वेताळ बोलू लागला:
आटपाट नगर होते, तेथे एक राजा राज्य करत होता. राजा प्रगतिशील होता आणि प्रजेला सुशिक्षित, संपन्न करण्यासाठी झटत होता. परंतु इतक्यात त्याची झोप एका विचित्र प्रश्नामुळे उडाली होती. त्याची प्रजा जरी सुशिक्षित व संपन्न होत चालली होती तरीही प्रजेतील मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात न राहता घसरत चालली होती. राजाने निरीक्षण केल्यावर एक भयानक गोष्ट त्याच्या लक्षात आली. मुलींचे आईबापच त्यांच्या जिवावर उठले होते.

पुढे वाचा

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग २)

‘स्त्रीकेन्द्रित कुटुंब’ याचा अर्थही स्पष्ट करण्याची गरज आहे. कुटुंब हे किमान द्विकेन्द्री तर असते, व असायलाही हवे. ते बहुकेन्द्री असणे अधिक इष्टही ठरेल. पण ‘स्त्रीकेन्द्री’ असे म्हणण्यामागे, आजचे बिघडलेले संतुलन पुन्हा एकवार दुरुस्त करण्याची गोष्ट प्रधान असावी.
कुटुंबाच्या गाभ्याशी मुले व त्यांचे संगोपन ही गोष्ट आहे. याचाच अर्थ मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य रीत्या पार पाडणारे कुटुंब असले पाहिजे. पति-पत्नींचे दांपत्यजीवन त्यांच्या परस्परपोषणासाठी स्वतंत्रपणेही महत्त्वाचे असतेच. पण त्यांच्या पोषणासाठी त्यांना कुटुंबाबाहेर पोचणारे अन्य मैत्रीसंबंध व त्यावर उभारलेले सहजीवन यांचीही तेवढीच आवश्यकता असते.

पुढे वाचा

शिक्षणाचे स्वातंत्र्य

श्री. निर्मलचंद्र यांच्या ‘नयी तालीम का नया आयाम—-लोकशिक्षण’ या हिन्दी पुस्तकात एक प्रसंग वर्णन केला आहे. हा प्रसंग आहे १९४७ सालचा. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांमधला. एका कार्यक्रमात ध्वजारोहणाला विनोबा होते. त्यांनी तिरंगी ध्वज फडकावला. नंतर म्हणाले, “हा तिरंगी ध्वज मिनिटभर उतरवून ‘युनियन जॅक’ तेथे फडकवण्याची मला इच्छा आहे.” लोक चकित झाले. गहजब माजू लागला. लोकांनी प्रखर विरोध केला. तेव्हा समजावणीच्या सुरांत विनोबा म्हणाले, “तिरंगी ध्वज हे आमचे पवित्र प्रतीक आहे. ज्याप्रमाणे गुलामीचे प्रतीक असणारा ध्वज (युनियन जॅक) आम्ही उतरवला, त्याचप्रमाणे आपली गुलामी कायम राखणाऱ्या सर्व गोष्टींचा आपण ताबडतोब त्याग केला पाहिजे.

पुढे वाचा

अर्थनीतीमागील वास्तवता आणि वैचारिका

१. एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे भाव काय आहेत हे दर आठवड्याला, महिन्याला, तिमाहीला, टिपून ठेवले गेले, आणि त्याचप्रमाणे त्या वस्तूची किंवा सेवेची किती विक्री (खरेदी) झाली याचे मोजमाप टिपलेले असले तर एक तालिका आपल्याला उपलब्ध होते. अशी तालिका (Time Series) सातत्याने ठेवली असली तर अभ्यासाला अत्यंत उपयुक्त ठरते. कोळसा, सोनेचांदी आणि अन्य धातु, आगगाडीची प्रवासी वाहतूक व मालाची वाहतूक, टिकाऊ उपभोग्य वस्तू (जशा की धुलाई यंत्रे, शीतकपाटे, शिवणयंत्रे इ.), दुचाकी-तीनचाकी-चारचाकी वाहने, शाळांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी, कापूस व कापडचोपड, तयार कपडे, पोलाद, पेट्रोल, अशा अनेक तालिका उपलब्ध असल्या तर (आणि तरच) देशांतील एकंदर उलाढालीचा अंदाज करता येतो.

पुढे वाचा

आजचा सुधारक व आगरकरांचे विचार

भारतात नुकत्याच झालेल्या फूलनदेवीच्या हत्येचे कारण व कारस्थान अजून पूर्ण उघडकीस आले नसले तरी शेरसिंग राणा याने राजपुतांच्या खुनाचा बदला घेऊन ठाकूर/राजपूत जातींचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हा खून केला हे वाचून भारतात आजही जातिनिष्ठा व जात्यभिमान किती तीव्र आहे याची खात्री झाली. दोन वर्षे अगोदर फूलनदेवी जेव्हा न्यूयॉर्कला यु. एन्. ओ. मध्ये आल्या होत्या तेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. जास्त शिक्षित नसूनदेखील भारतातल्या मागासलेल्या (दलित) समाजाच्या व विशेषतः त्यांच्या स्त्रियांच्या उन्नतीकरता त्यांची कळकळ पाहून व विचार ऐकून भविष्यात गोर-गरिबांकरता त्या जोरदार आवाज उठवतील असे वाटले होते.

पुढे वाचा

शालेय शिक्षणाविषयी थोडेसे

१. आ.सु.च्या गेल्या काही अंकांतून शालेय शिक्षणाविषयी बऱ्याच चिंता व्यक्त झाल्या आहेत. “आम्हाला का विचारत नाही” असा प्रश्न जुलैच्या अंकाच्या पहिल्या पानावर पालकांतर्फे विचारला गेला आहे. ‘परभारे’ निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर टीका आहे.
२. १९८६ साली सरकारने शिक्षण धोरणावर जाहीर चर्चेचे आवाहन केले व झालेल्या चर्चेवर आधारलेली स्परेखा प्रसिद्ध केली. या स्परेखेचे पुनरवलोकन करताना NCERT या सरकारी संस्थेने अनेक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक-संस्था, गैरसरकारी संस्था यांच्यात चर्चा घडवून आणल्या व त्या आधारावर नवीन रूपरेखा तयार केली असा त्या संस्थेचा दावा आहे. या संबंधीची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर मी एका शिक्षण-संस्थेच्या वतीने NCERT कडे या स्परेखेच्या प्रतीची मागणी केली व ती मला सहजपणे मिळाली.

पुढे वाचा

‘धोरणामागचे धोरण’

१२ जून २००१ च्या ‘हिंदू’ मध्ये श्री. राजपूत यांचा लेख वाचायला मिळाला. Inculcating a sense of pride. श्री. राजपूत हे NCERT चे, या धोरणाचा आराखडा मांडणाऱ्या संस्थेचे प्रमुख आहेत, धोरण बनवण्याच्या कामात त्यांचा ‘प्रमुख’ सहभागही आहे. लेखात या धोरणामागचा खरा हेतू श्री. राजपूत यांनी स्पष्ट केलेला आहे, आणि तो आहे, लेखाच्या शीर्षकाचाच — राष्ट्रीय अस्मिता जागवण्याचा. श्री. राजपूत यांची नेमणूक हे धोरण ह्या हेतूनेच घडावे यासाठी झाली आहे असे वाचायला मिळाले. राजपूतांनी म्हटल्याप्रमाणे धोरण बनवताना अनेक चर्चा झाल्या पण प्रत्यक्ष धोरणात त्यांना स्थान मिळालेले नाही असेही अनेक लेखांमध्ये वाचले.

पुढे वाचा