विषय «इतर»

अक्कलखाते

यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही संस्था लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांना देशातील उद्योगांमध्ये ‘थेट’ गुंतवणूक करता यावी यासाठी घडली. सरकारी नियंत्रणाखाली आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या संस्थेत गुंतवलेले पैसे उद्योगांचे समभाग (शेअर्स) घेण्यासाठी वापरुन ही गुंतवणूक होत असते. बँका उद्योगांना कर्जे देतात तर युनिट ट्रस्ट थेट मालकीचा भाग विकत घेते, असा हा प्रकार असतो. सध्या यू.ट्र.ऑ.इं.ची यूएस ६४ ही योजना चर्चेत आहे. हिच्यात गुंतवणूक होती १४० अब्ज रुपये, आणि आज हिचा तोटा आहे ४५ अब्ज रुपये. काही उद्योगांचे समभाग अवास्तव किमतींना विकत घेतले गेले, व नंतर ते उद्योग अकार्यक्षम (किंवा फसवणूक करणारे) असल्याने तोटा आला, हे आता जगजाहीर झाले आहे.

पुढे वाचा

हक्क केवळ मातेचाच

वसंत पळशीकर यांच्या लेखात (आ.सु. सप्टें. २००१) पुढील विधान आहे. “मुलांना जन्म देणे, अर्भकावस्थेत त्यांचे पोषण व संगोपन करणे हे कार्य सामान्यपणे माता बनणाऱ्या स्त्रीचे राहावे हे स्वभाविक व इष्टही आहे. ते अटळही आहे.”
“एकदा मुलाचा जन्म झाल्यावर त्याचे पोषण व संगोपन करणे हे मातेचे काम व ते स्वाभाविक व इष्टही आहे” ह्या वसंत पळशीकरांच्या भूमिकेला माझा विरोध आहे. आपल्या मुलांचे संगोपन कुणी करावे हा मातेचा निर्णय आहे. आपल्या मुलांसाठी काय इष्ट आहे हे ठरवण्याचा हक्क फक्त मातेला आहे. तीच स्वतःची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेऊन स्वतःच्या व मुलांच्या हिताचा विचार करू शकते.

पुढे वाचा

‘मातृत्व’च्या निमित्ताने (Pair-bonding and Parenting)

नव्हें २००१ च्या आ.सु.च्या अंकात ललित गंडभीर यांनी लिहिलेला ‘मातृत्व’ हा विचारांना चालना देणारा लेख वाचला. त्यावर सुचलेले काही विचार असे —-
मातृत्व म्हणजे काय केवळ मुलांना जन्म देणे? पालनपोषणही त्यात येते का? वडलांचा त्यात किती भाग असावा? मुलांचे संगोपन करत असताना मातेची बौद्धिक भूक कशी पुरी करावी? आजच्या समाजाला पडलेल्या प्रश्नांपैकी हे काही प्रश्न आहेत.
आपण काळात मागे जाऊन आपला समाज कसा उत्क्रांत झाला ते थोडक्यात पाहू. माणूस पाचेक लाख वर्षात अग्नीपासून अग्निबाणापर्यंत कसा पोचला याची कहाणी नाट्यमय आहे. पण आज धोका संभवत आहे की या सर्वाने दिपून जाऊन माणूस विसरेल की झिलईदार पृष्ठमागाखाली तो एक कपीच आहे.

पुढे वाचा

रोजगार

रोजगाराचा विषय अजून थोडा शिल्लक आहे. त्याचा विचार पुढे करू:

बाबा आमटे ह्यांचे सार्वजनिक संस्थाचे संचालन/ह्या नावाचे एक छोटे पुस्तक आहे. त्यांनी त्या पुस्तकामध्ये सार्वजनिक संस्थांनी दानावर किंवा अनुदानावर अवलंबून राहू नये, प्रत्येक संस्थेने आपला प्रपंच उत्पादनाच्या योगे चालवावा, कोणत्या तरी मालाचे उत्पादन करणे व ते विकणे हे प्रत्येक संस्थेचे अपरिहार्य कार्य असले पाहिजे असा मुद्दा मांडला आहे.

सार्वजनिक संस्था कितीही समाजोपयोगी कार्य करीत असल्या तरी त्यांचे कार्य समाजाच्या प्रत्येक थरामध्ये किंवा आर्थिक वा प्रादेशिक गटामध्ये स्वीकारले जात नाही (ते सर्वत्र स्वीकारले गेले असते तर त्या कार्याची गरजच राहिली नसती.

पुढे वाचा

‘खादी आणि रोजगार’ या लेखाच्या निमित्ताने

नोव्हेम्बर २००१ च्या १२/८ या अंकात श्री. मोहनी यांनी ‘खादी आणि रोजगार’ या विषयावर रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने व्यावहारिक तशीच तात्त्विक चर्चा केली. रोजगार-निर्मितीमागील प्रेरणा, उपभोग्य वस्तूंचे उत्पादन, उत्पादन-प्रक्रियेत होणारे बदल वगैरेचा धावता आढावा घेऊन काही उपयुक्त प्रमेये मांडली. जसे “उपभोग्य वस्तूंचे प्रमाण सतत वाढवीत नेल्याशिवाय रोजगार वाढत नाही.” “संपन्नता श्रमाचे परिमाण वाढवून कधीच येत नाही ती बुद्धीच्या वापरामुळे येते.” “संपन्नता ह्याचाच अर्थ कमी श्रमांत जास्त उपभोग” वगैरे वगैरे. एकूण त्यांच्या लेखाने रोजगार-निर्मितीच्या संदर्भात नवीन दृष्टिकोण समोर आणला. आपल्या देशाचे औद्योगिकीकरण फार अलिकडचे आहे आणि आपण वापरीत असलेली यंत्रसामुग्री (किंबहुना बुद्धी-माझा शब्द) ही उसनवारीने आणून (माझे शब्द) कारखानदारी पुष्कळशी परदेशातून तयार कारखाने आणून वाढविली आहे.

पुढे वाचा

डार्विन: तत्त्वज्ञ की वैज्ञानिक?

‘फिलॉसॉफर्स मॅगेझिन’ नावाच्या तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या मासिकाने अलि-कडेच एक ‘जन’ मत चाचणी घेतली. काल्पनिक अशा एका जागतिक ग्रंथालयाला आर्थिक अडचणीमुळे केवळ पाच तत्त्वज्ञांच्या पुस्तकांचा संग्रह ठेवावयाचे असून त्यासाठी कुठल्या तत्त्वज्ञांची निवड करावी याविषयी मते मागितली होती. अपेक्षे-प्रमाणे प्लेटो, कांट, अरिस्टॉटल, देकार्त, विटगिन्स्टाइन व ह्यूम यांची नावे त्यात होती. परंतु या जगद्विख्यात तत्त्वज्ञांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डार्विनचे नाव वाचून संपादकाना आ चर्याचा धक्का बसला. याविषयीचा एक स्फुट लेख ‘दि लॅन्सेट’ या साप्ताहिकात आला आहे.
रूढ अर्थाने डार्विन हा तत्त्वज्ञ नाही. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक चिकित्सा, निरीक्षण, संशोधन, प्रयोग व विश्लेषण यावर भर देत असले तरी तात्विक अभ्यासाच्या मर्यादांची पुरेपूर कल्पना त्यांना असते.

पुढे वाचा

शेती: काही सामाजिक, काही आर्थिक, काही तांत्रिक

१. भारत आजही खेड्यांचा आणि कृषिप्रधान देश आहे. जवळ जवळ ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे आणि तिचा चरितार्थ शेतीकामाशी जोडलेला आहे. अमेरिका एक तृतीयांश जगाला जेवायला घालते पण तिला आपण कृषिप्रधान म्हणत नाही कारण तिची ५-६ टक्के लोकसंख्याच शेतीकामात गुंतलेली आहे. भारतात ४० टक्के प्रजा दारिद्र्यरेषेखाली आहे. याचा अर्थ असा की एक जेवण झालेकीच तिला पुढच्या जेवणाच्या काळजीने पछाडलेले असते. गाडगीमडकी आणि चिरगुटे हीच त्यांची संपत्ती. एरवी ती पूर्णपणे कफल्लक आहेत. अशी सदैव भुकेच्या विवंचनेत वावरणारी माणसे आपली जीवनेच्छाच हरवून बसलेली असतात.

पुढे वाचा

“धर्मप्राय” श्रद्धा

आ.सु.(१२.५) मध्ये श्री. सुधीर बेडेकर यांचे ‘धर्मश्रद्धा आणि दि. के. बेडेकर’ हे टिपण प्रसिद्ध झाले आहे. आंदोलन या मासिकाच्या ऑगस्ट २००० च्या अंकात माझा ‘धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्याचा संक्षेप आ.सु. (११.८) मध्ये प्रसिद्ध झाला व त्यावर श्री. दि. य. देशपांडे यांची टिप्पणीही प्रसिद्ध झाली. प्रस्तुत संक्षेप मी केला नव्हता; तसेच, तो मला दाखवून संमतही करून घेतला नव्हता, ही वस्तुस्थिती येथे नोंदवणे आवश्यक आहे.
दि. के. बेडेकर यांच्या भूमिकांविषयी गैरसमज होऊ नये, त्यांच्या भूमिकेचा विपर्यास केला जाऊ नये, याविषयी सुधीर बेडेकर यांच्याशी माझे शंभर टक्के एकमत आहे.

पुढे वाचा

विनाश पर्व

अकरा सप्टेंबर दोन हजार एक. एकविसावे शतक उदयाचली असतानाच महासत्ता अमेरिकेवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला. आर्थिक सत्तेचे केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे गगनचुंबी जुळे मनोरे आणि संरक्षण व्यवस्थेचा किल्ला पेंटॅगॉनच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. आणि अमेरिकेसकट जग सैरभैर झाले.
महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक व विख्यात विचारवंत श्री. कुमार केतकर हे त्यावेळी शिकागोहून न्यूयॉर्ककडे निघण्याच्या तयारीत होते. हतबुद्ध अमेरिकेतील स्पंदने ते इ-मेलने मित्रांपर्यंत पोहोचवत होते. त्या पत्रांतील निवडक भागाचा भावानुवाद.
प्रिय मित्रांनो,
अमेरिकेतील मूड संताप, धक्का, हतबलता, असहाय्यता, दुःख, सांत्वन, आशा, सहकार्य, करुणा, धीर, मदत इ.

पुढे वाचा

गॉड इज डेड

गॉड इज डेड असे कुणीतरी हट्टी तत्त्ववादी मागेच सांगून गेला म्हणे. असेलही कदाचित हे सपशेल खरे किंवा धादान्त खोटेही अथवा अर्धे खरे अर्धे खोटे. पण ज्या काळी तू खऱ्या अर्थाने जिवंत होतास तेव्हा तरी काय दिवे लावलेस? सोळा सहस्र गवळणींसह नाचलास आपल्या बायकोसह वनात
चालता झालास रोजच घडणारे आम रस्त्यावरचे इन-मिन-तीन सीन बघून सारा संसार असार म्हणत महाशून्यात पसार झालास किंवा सर्वांगावर खिळे ठोकून घेत शेवटी आपलीच मान खाली घातलीस वा स्वतःचाच देह चरकात पिळून घेत त्याचे सताड चिपाड केलेस: आणि ज्या क्षणी हा तुझा पवित्र-पीडित अन्तरात्मा चाबुकराणीचा रोग लागलेल्या उसागत शेंड्यावर निमूळ होत होत दिवंगत झाला तेव्हा तुझ्या ह्या ग्यानी अनुगामी भक्तांनी तुलाच आकाशात व पाताळात समुद्रात नी पहाडात ढकलून दिले (आगामी सिसिफसच्या गड चढणीसाठी) इतकेच नव्हे तर म्हातारी मेली उन्हाळ्यात नी रड आला पावसाळ्यात या म्हणीनुसार त्याच बिलंदर बुकींनी इहलोकाशी विचित्र फिक्सिंग करून तुझ्या अज्ञात व अदृष्ट गढी-मढी वर मोठमोठाली देवळे — रावळे पुतळे व मकबरे उभारलेत, कला आणि साहित्य याचे उदंड पीक अशाच मूठ मातीतून तरारलेत असे नंतरचे शोधकर्ते सांगतात: आणि आजकाल तर सारा आनंदी आनंदच परमेश्वरा!

पुढे वाचा