इंग्रजी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय समाजजीवन क्रमाक्रमाने बदलू लागले. पऱ्यायाने एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून महाराष्ट्रातही बदल सुरू झाले. यातील महत्वाचा बदल म्हणजे भारतीय माणूस मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेकडून आधुनिकतेकडे येऊ लागला. त्याचे कारणही यंत्रयुगाचे आगमन आणि अर्थव्यवस्थेने घेतलेले भांडवलदारी वळण हे होते. परिणामी आतापर्यंत मूक असणारे समाजघटक जाती घटक मुखर होऊ लागले. ते व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले. संतांनी जातीमुळे होणाऱ्या कुचंबनेचा निर्देश केला होता. परमेश्वराच्या दृष्टीने कोणी श्रेष्ठ नाही की कोणी कनिष्ठ नाही हे ठासून सांगितले होते. परंतु वास्तव जीवनामध्ये मात्र श्रेष्ठ कनिष्ठ भाव होताच.
विषय «समाज»
मानवी बुद्धी आणि ज्ञान
गीतेच्या तिसर्या अध्यायातील बेचाळीसावा श्लोक आहे :
इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।
मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स: ।(गीता 3.42)
अर्थ: (स्थूल शरीराहून) कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे. तर मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि बुद्धीच्याही पलीकडे सर्वश्रेष्ठ असा “तो” आहे. इथे तो या सर्वनामाच्या ठिकाणी आत्मा अभिप्रेत आहे.
या श्लोकात श्रेष्ठतेची जी चढती भाजणी दिली आहे ती अचूक आहे. इंद्रियांवर मनाचे नियंत्रण असायला हवे. तसेच मनावर बुद्धीचे. बुद्धीच्या पलीकडे असलेला आत्मा हा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे.
विवेकवाद विकसित करण्यासाठी…
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय विवेकवादाचं मुख्य स्वरूप सातत्यानं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संकुचित भूमिका घेतली म्हणून दुसऱ्या संकुचितांनी त्यांच्यावर हल्ला केला असं अजिबात नाही. त्यांनी व्यापक भूमिका घेतली. ती सहन न झाल्यामुळे जी संकुचित विचारांची मंडळी आहेत, त्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारतीय विवेकवादाचं व्यापक स्वरूप लक्षात घेताना याची उभी विभागणी करण्याची जी पद्धत आहे, ती मुळातून तपासली पाहिजे. उभ्या विभागणीत विवेकवादी एकीकडे आणि अविवेवकवादी दुसरीकडे किंवा अमूक एक परंपरा एकीकडे आणि दुसरी परंपरा दुसरीकडे अशी विभागणी केली जाते.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने…
महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.
पुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कसे जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत – तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.
जातीचा प्रश्न
एकूण या वादामध्ये ब्राह्मणी छावणी (ब्राह्मण नाही) हुशारीने ‘मूळ प्रश्न ‘जातीचा आहे’, ‘पुरंदरेंच्या जातीमुळे त्यांना विरोध’ असे ‘तांडव’ करून आपण किती ‘सोवळे’, ‘जात पात विसरून पुढारलेले’ अशी मुद्द्याला बगल देत आहे.
समानतेचे अवघड गणित
समता, समानता आणि समरसता या संज्ञा-संकल्पना वरवर समानार्थी वाटल्या तरी त्यातील आशय आणि अन्वयार्थ वेगवेगळे आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर (1779) लिबर्टी (स्वातंत्र्य), इक्वॅलीटी (समता) आणि फ्रॅटर्निटी (बंधुत्व) या घोषणा एक तत्त्व म्हणून जगाच्या प्रगत इतिहासात रूजत गेल्या. परंतु त्या प्रत्यक्षात आणणे व्यक्तीगत व सामाजिक जीवनात सोपे नाही. किंबहुना अनेकदा समता आणि स्वातंत्र्य या संकल्पना तर परस्परविरोधात जातात. बंधुत्व हे तर किती कठीण आहे हे खुद्द फ्रान्समध्येच दिसून आले आहे. बंधुत्वाच्या मुल्यात सहिष्णुता, सहृदयता आणि आदरभावना अभिप्रेत आहेत. फ्रान्समध्ये कृष्णवर्णीयांना, इस्लाम धर्मीयांना आणि अन्य संस्कृती-समुदायांना कसे वागविले जाते हे पाहिले की फ्रान्सनेच ही मूल्ये टाकून दिली आहेत हे दिसून येते!
संघ बदलला की दलित विचारवंत?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना राज्यातील काही दलित साहित्यिकांनी उपस्थिती लावली. अशा कार्यक्रमांमुळे, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात? दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय? असे प्रश्न उपस्थित होतात.
केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे सत्तारूढ झाल्यानंतर संघ आणि संघ परिवाराशी संलग्न असणाऱ्या संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाचा पान्हा फुटलेला पाहावयास मिळतो आहे. उदाहरणार्थ संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केलेली जयंती, संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ व ‘ऑर्गनायझर’ने आंबेडकर जयंतीनिमित्त प्रसिद्ध केलेले विशेषांक, ‘ऑर्गनायझर’ व ‘पांचजन्य’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमास; तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्याख्यानमालेस दलित समाजातील एक विचारवंत डॉ.
पटेलांच्या आंदोलनातून निर्माण होणारे धोके
गेल्या महिन्यात गुजराथमधील पटेल समाजाने खांद्यावर बंदूक घेउन वावरणाऱ्या 22 वर्षीय हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलच्या नेतृत्त्वाला आव्हान देत सरकारविरोधात आरक्षणाच्या मुद्यावर जोरदार धुमश्चक्री केली. आजही भाजपचा पाठीराखा असलेला, जमीनजुमल्यावर बऱ्यापैकी मालकी असलेला, देशांतर्गत व्यापारउदीमावर वर्चस्व असलेला, विदेशातही बळकट आर्थिक स्थान मिळवलेला, राज्य व केंद्र सरकारात मोठा सहभाग असलेला, सामाजिकदृष्ट्याही अस्पृश्य नसल्याने ब्राम्हणाखालोखाल वरचढ असलेला, खाजगी क्षेत्रात एस.सी,एस.टी व ओ.बी.सीं.ना आरक्षण नसल्याने त्या क्षेत्रातील 100 टक्के नोकऱ्या बळकावलेल्या, हिरे,मोती, जडजवाहिर व सुवर्णालंकार देशात विकणाऱ्या आणि विदेशात निर्यात करणाऱ्या या समाजाला आपण मागासवर्गीय असल्याचा शोध लागला आहे.
थोड्याशांचे स्वातंत्र्य
मला स्वातंत्र्यावर लिहायला सांगणे हे काहीसे व्यंगरूप आहे, कारण मी गेली सहा वर्षे एका तुरंगातल्या ‘ बाले ’-तुरूंगात (तिहार जेलच्या अति धोकादायक कैदी विभागात) कोंडलेला आहे. इथे मुख्य तुरूंगात जाण्याचे किंवा आजारी पडल्यास इस्पितळात जाण्याचेही स्वातंत्र्य नाही.
अराजकापासून लोकशाही केंद्रीकृत सत्तेपर्यंतच्या पटात स्वातंत्र्य कुठेतरी बसवले जाते ती तशी ही एक सापेक्ष संकल्पना आहे. पण जी कोणती व्यवस्था असेल तिच्यात काही जणांना इतरांपेक्षा जास्त स्वातंत्र्य असते. भारतात ‘सितारे’ – सिनेक्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील, उद्योगधंद्यातील वा राजकारणातील – पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत असतात; अगदी खून करण्याचेही.
शंका समाधान @शाखा
गेली अनेक वर्षे जो युक्तिवाद ऐकू येई, तो आताही ऐकू यावा याचा अर्थ कोणी काहीच बदललेले नाही काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कोणी काही विधान केले की, संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठरावीक उत्तर येते; ते म्हणजे टीकाकारांनी प्रत्यक्ष संघशाखेवर जावे आणि आपल्या शंकांचे निरसन करवून घ्यावे! गेल्या महिन्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघावर टीका करताच केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन यांनी त्यांना असाच सल्ला दिला. एक तर असा सल्ला राहुल गांधीच काय, अन्य कोणताही टीकाकार पाळणार नाही हे जितके खरे, तितकेच खरोखर कोणी टीकाकार शाखेवर येऊन गेले आणि त्याने/तिने आपले मत बदलले असेही झाल्याचे आढळून आले नाही.
शोषितांमध्ये असंघटित मध्यमवर्गीयही
कामगार चळवळ हे डाव्या पक्षांचे एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र. परंतु, काळ जसा बदलतो आहे, त्यानुसार कामगार लढ्यांची रणनीतीही बदलावी लागेल, हे लक्षात घेण्याची गरज आहे. कार्ल मार्क्स यांचा विचार हा या लढ्यांचा मुख्य स्रोत राहिला; परंतु मार्क्स यांच्या काळात त्यांच्यासमोर जो ‘औद्योगिक कामगार’ होता, तो जसाच्या तसा आजच्या काळात नाही. कामगार किंवा मजूर ही संकल्पना बऱ्याच अंशी बदलली आहे. हा बदल समजावून घेऊनच कामगार चळवळींनी काम केले पाहिजे. भारतात जागतिकीकरणाच्या काळात कामगार वर्ग हा मध्यमवर्गात बदलल्याचे म्हटले जाते. खरे तर या वर्गाला मध्यमवर्ग असे म्हणणेही अन्यायकारक ठरेल.