प्राचीन काळापासून मानव जिज्ञासेपोटी निसर्गाची गूढं उकलण्याचा प्रयत्न करीत आलाय. त्या-त्या काळात त्याच्या प्रगल्भतेनुसार मनावर विविध प्रकारचे संस्कार होत गेलेत. त्यातूनच मानवानं प्रगतीची वाटचाल केलीय. काही वेळा समजून-उमजून जुन्या काळच्या मागासलेल्या विचारांना, समजुतींना त्यागलंय. तर काही वेळेस कळत असूनही त्याच गलितगात्र, भ्रामक समजुतींना चिकटून राहण्याचा वेडेपणाही तो करत आलाय. मग प्रश्न असा पडतो की, एका बाजूनं एवढा शहाणपणानं प्रगती करणारा माणूस दुसऱ्या बाजूनं एवढा पांगळा का होतो? हे पांगळेपण त्यानं तात्कालिक हितसंबंधांच्या जोपासनेपोटी तर आणलेलं नसतं ना? की मुद्दामहूनच आणलेलं असतं?
विषय «श्रद्धा-अंधश्रद्धा»
ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
एकेकाळी मी पण ज्योतिषी होतो. पत्रिका वगैरे बघायचो, लोकांना मार्गदर्शन करायचो. एका ज्योतिषी असण्यापासून ते ज्योतिषाचा टीकाकार होणे या बदलाचे श्रेय माझ्या ज्योतिषशास्त्राच्या Empirical परीक्षणाच्या (Empirical testing) प्रयोगांना द्यावे लागेल. मी जसेजसे हे प्रयोग करत गेलो तसेतसे ज्योतिषविद्येविषयीचे माझे मत बदलत गेले आणि आज मी दहा वर्षांच्या संशोधनानंतर, अनेक प्रयोगांच्या आधारे आणि हजारो पत्रिकांच्या विश्लेषणानंतर असं विश्वासाने म्हणू शकतो की ज्योतिष हे विज्ञान नाही आणि शास्त्र म्हणून ते अथवा त्याची तत्त्वेही वैध नाहीत.
जेव्हा ज्योतिषविद्येची सत्यासत्यता तपासून बघण्याचा विषय येतो तेव्हा Double Blind परीक्षा हा सर्वात सोपा पर्याय असतो.
विक्रम आणि वेताळ – भाग १
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला, आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“हे राजन्, नेहमी मी तुला गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीच्या आधाराने तुला प्रश्न विचारतो, पण नेहमी मीच का सांगायची गोष्ट तुला? आणि खरंतर इतकी वर्षं तुला गोष्टी सांगून सांगून आता माझा गोष्टींचा स्टॉकही संपला आहे. तेव्हा असं कर की आज तूच मला गोष्ट सांग कसा! मग मी विचारीन त्यावर माझे प्रश्न!”
“असं कसं म्हणतोस तू?” विक्रमादित्य म्हणाला. “तू गोष्ट सांगायची हे तर नियत आहे, विधिलिखित! त्यात आपल्याला बदल कसा करता येईल?”
मुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे –
प्रो. हरिमोहन झा (१९०८ – १९८४) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील ‘फलित ज्योतिष’ या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर ‘आजचा सुधारक’च्या वाचकांसाठी देत आहे. हा लेख १९४८ साली लिहिलेला असला तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारा आहे.
खट्टर काका हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु हरिमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापीठाचे हे मैथिली भाषेचे तज्ज्ञ होते.
ज्योतिषशास्त्राबद्दल थोडे
IGNOU चे हिंदीतील MA (ज्योतिष) आणि त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया
असे म्हणतात की भारतीय भविष्य (ज्योतिष) व्यवसाय हा ७०००० कोटींचा आहे. (https://www.exchange4media.com/marketing-news/shemaroo-enters-astrology-market-with-50-stake-in-dominiche-productions-96104.html) म्हणजे साधारण २० लाख ज्योतिषी. माझ्या मते हा आकडा अतिशयोक्त आहे. ज्योतिषी संघ असतात, त्यांच्या सभासदांची संख्या बघून नीट अंदाज बांधता येईल. कदाचित या आकड्यात प्रसिद्धीमाध्यमांचा समावेश असावा. त्यामुळे पुस्तके, वर्तमानपत्रे, चित्रवाहिन्या यांतील पैसा (त्याप्रमाणात) त्यात धरला गेला असेल. याशिवाय नारायण नागबळी, शांत अशा खर्चिक प्रकारांचा समावेश असणार.
माझ्या परिचयातील लोक साधारणपणे लग्न (पत्रिका जुळविणे) पत्रिका मांडणे आणि अडीअडचणीत सल्ला घेणे यापलीकडे ज्योतिषाकडे जात नाहीत.
फलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (इग्नू) जुलै २०२१पासून दूर-शिक्षणाद्वारे तरुणाईला नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एम.ए.(ज्योतिष) अभ्यासक्रम सुरू करीत आहे. सदर अभ्यासक्रमामध्ये पंचाग, मुहूर्त, कुंडली, ग्रहणवेध, ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आदींचा समावेशअसणार असल्याची माहिती विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेली आहे. सन २००१मध्ये यूजीसीच्या माध्यमातून ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करण्याचानिर्णय तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. परंतु ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, प्रो. यशपाल आणि इतर अनेक वैज्ञानिकांनीविरोध केल्याने सदर प्रस्ताव रद्द करावा लागला होता. ही पार्श्वभूमी असतानादेखील २०२१मध्ये कोरोनाच्या भीषण परिस्थितीत पुन्हा एकदा हाच विषय आणण्याच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते. कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश, बेरोजगारीचा प्रश्न, उद्योगविश्वात आलेली मरगळ, शेतीविषयक आंदोलन, इत्यादी विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठीचे हे प्रयोजन असण्याची दाट शक्यता वाटते.
संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन
“मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा, अनुच्छेद 21 नुसारचा मूलभूत हक्क आम्हाला वापरता आला पाहिजे. समानता केवळ पुस्तकात आहे, कारण आमच्यावर नेहमी भेदभाव व विषमता सहन करायची वेळ येते” असे म्हणत “अनुच्छेद 14 नुसार समानता द्या, अनुच्छेद 15 नुसार कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक द्या” अश्या मागण्या करणारी आंदोलने भारतात अनेकदा होताना दिसतात. पण अनुच्छेद 51-A मधील मूलभूत कर्तव्यांबद्दल जाहीर चर्चेच्या स्वरूपात कुणी काही बोलतांना दिसत नाही. हक्काची भाषा शिकणे व अधिकार मागणे ही लोकशाही शिकण्यातील महत्त्वाची पायरी असते. पण केवळ हक्कच मागण्यात पुढे असलेला पण कर्तव्यांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या बाबतीत मागे असलेला समाजसुद्धा वैचारिकदृष्ट्या मागासलेला व एका अर्थाने भांडवलशाही मानणारा होत जातो हे सूत्र महत्त्वाचे असते.
फलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता
फलज्योतिषाविरुद्धचे नव्याने शोधले गेले आहेत असे फारसे युक्तिवाद माझ्या माहितीत नाहीत. भारतात अनेक समाजसुधारकांनी, नेत्यांनी, विद्वानांनी फलज्योतिषाविरुद्धचे बहुतेक युक्तिवाद एकोणिसाव्या शतकापासूनच मांडलेले आहेत. आणि तरीही लोकांचा फलज्योतिषावरील विश्वास घटल्याचे जाणवत नाही. ही अंधश्रद्धा केवळ भारतातच रुजली आहे असे नाही, जगभरातच यशस्वी अंधश्रद्धांपैकी फलज्योतिष ही एक महत्त्वाची अंधश्रद्धा आहे.
राजकीय प्रतलावरही या विषयात आपल्याला फारसे डावे-उजवे करता येत नाही. फलज्योतिषाला पाठिंबा देणे हे भाजपच्या एकूण विचारधारेशी सुसंगत तरी आहे. परंतु, वाजपेयी सरकारने २००१ साली विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे (UGC) सुरू केलेले फलज्योतिष अभ्यासक्रम २००४ ते २०१४ या काळातील UPA सरकारनेही बंद केले नाहीत. काँग्रेसचे आणि कम्युनिस्टांचे अनेक नेते उघडपणे ज्योतिष्यांकडे जात आणि जातात.
ज्योतिष : शास्त्र की थोतांड
IGNOU ने ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल गेले काही दिवस खमंग चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने काही चिंतन –
** ज्या शास्त्रात केलेली भाकितं अचूक ठरतात तेच खऱ्या अर्थाने शास्त्र असतं हे जर मान्य केले तर ज्योतिष हे शास्त्र ठरत नाही.
हा निकषच चुकीचा आहे. असं म्हटलं तर हवामानशास्त्र, निवडणूक निकालांचे अनुमान लावणारं आणि विश्लेषण करणारं शास्त्र (psephology), वैद्यकशास्त्र अश्या अनेक ज्ञानशाखांमधल्या विद्वानांची त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील भाकिते चुकतात. पण म्हणून त्या ज्ञानशाखा खोट्या ठरत नाहीत. ज्योतिषशास्त्रातही इतर शास्त्रांप्रमाणे चुकलेली मूळची गृहितके बदलून, नव्या गृहितकांना सिद्ध करून, त्याची शास्त्रोक्त मांडणी करून संकल्पनांचं पुनर्मूल्यांकन नक्कीच केलं जातं.
फलज्योतिष“शास्त्र?”
पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच.