विषय «शिक्षण»

ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य

एकेकाळी मी पण ज्योतिषी होतो. पत्रिका वगैरे बघायचो, लोकांना मार्गदर्शन करायचो. एका ज्योतिषी असण्यापासून ते ज्योतिषाचा टीकाकार होणे या बदलाचे श्रेय माझ्या ज्योतिषशास्त्राच्या Empirical परीक्षणाच्या (Empirical testing) प्रयोगांना द्यावे लागेल. मी जसेजसे हे प्रयोग करत गेलो तसेतसे ज्योतिषविद्येविषयीचे माझे मत बदलत गेले आणि आज मी दहा वर्षांच्या संशोधनानंतर, अनेक प्रयोगांच्या आधारे आणि हजारो पत्रिकांच्या विश्लेषणानंतर असं विश्वासाने म्हणू शकतो की ज्योतिष हे विज्ञान नाही आणि शास्त्र म्हणून ते अथवा त्याची तत्त्वेही वैध नाहीत.

जेव्हा ज्योतिषविद्येची सत्यासत्यता तपासून बघण्याचा विषय येतो तेव्हा Double Blind परीक्षा हा सर्वात सोपा पर्याय असतो.

पुढे वाचा

फलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (इग्नू) जुलै २०२१पासून दूर-शिक्षणाद्वारे तरुणाईला नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एम.ए.(ज्योतिष) अभ्यासक्रम सुरू करीत आहे. सदर अभ्यासक्रमामध्ये पंचाग, मुहूर्त, कुंडली, ग्रहणवेध, ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आदींचा समावेशअसणार असल्याची माहिती विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेली आहे. सन २००१मध्ये यूजीसीच्या माध्यमातून ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करण्याचानिर्णय तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. परंतु ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, प्रो. यशपाल आणि इतर अनेक वैज्ञानिकांनीविरोध केल्याने सदर प्रस्ताव रद्द करावा लागला होता. ही पार्श्वभूमी असतानादेखील २०२१मध्ये कोरोनाच्या भीषण परिस्थितीत पुन्हा एकदा हाच विषय आणण्याच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते. कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश, बेरोजगारीचा प्रश्न, उद्योगविश्वात आलेली मरगळ, शेतीविषयक आंदोलन, इत्यादी विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठीचे हे प्रयोजन असण्याची दाट शक्यता वाटते.

पुढे वाचा

फलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता

फलज्योतिषाविरुद्धचे नव्याने शोधले गेले आहेत असे फारसे युक्तिवाद माझ्या माहितीत नाहीत. भारतात अनेक समाजसुधारकांनी, नेत्यांनी, विद्वानांनी फलज्योतिषाविरुद्धचे बहुतेक युक्तिवाद एकोणिसाव्या शतकापासूनच मांडलेले आहेत. आणि तरीही लोकांचा फलज्योतिषावरील विश्वास घटल्याचे जाणवत नाही. ही अंधश्रद्धा केवळ भारतातच रुजली आहे असे नाही, जगभरातच यशस्वी अंधश्रद्धांपैकी फलज्योतिष ही एक महत्त्वाची अंधश्रद्धा आहे.

राजकीय प्रतलावरही या विषयात आपल्याला फारसे डावे-उजवे करता येत नाही. फलज्योतिषाला पाठिंबा देणे हे भाजपच्या एकूण विचारधारेशी सुसंगत तरी आहे. परंतु, वाजपेयी सरकारने २००१ साली विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे (UGC) सुरू केलेले फलज्योतिष अभ्यासक्रम २००४ ते २०१४ या काळातील UPA सरकारनेही बंद केले नाहीत. काँग्रेसचे आणि कम्युनिस्टांचे अनेक नेते उघडपणे ज्योतिष्यांकडे जात आणि जातात.

पुढे वाचा

फलज्योतिष“शास्त्र?”

पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच.

पुढे वाचा

रेषा आणि कविता…!

अंधारात भविष्य शोधताना
मी मेंदूला ठेवत असतो कोंडून
मनगटातील बळ विसरून 
दाखवत फिरतो हाताच्या रेषा 
वाळूचे कण रगडण्याचे सोडून 
दिसरात जपतो दगडाचे नाव 
घाम गाळायच्या ऐवजी 
देत असतो ग्रह-ताऱ्यांना दूषणं 
तरीही,
निघाला नाही कुठलाच प्रश्न निकाली…!

सीमेवर शत्रू उभे ठाकले असताना 
राजा शांतपणे करत होता यज्ञ 
शत्रू महालाजवळ आले असतानाही 
राजा करत राहिला मंत्रांचा जाप 
पराभवाची फिकीर सोडून 
तो देत राहिला जांभई 
शेवटी बंदिस्त झाल्यावर, 
“छाटण्यात यावे माझे हात” 
अशी याचना करत राहिला…!

उघड्या डोळ्यांनी
मी नाकारू शकत नाही सत्य म्हणून
ते दाखवत असतात भीती 
माझी लायकी ठरवून 
ते घट्ट ठेवतात पाय बांधून 
देत राहतात धडे मानसिक गुलामीचे 
सांगू लागतात नशीब हाताच्या आरशात 
अवघं विश्वच बांधून ठेवतात आडव्या उभ्या रेषेत 
काळाच्या पुढचं सांगून मिचकवतात डोळे 
त्यांचं पोट भरल्यावर 
मी मात्र पहात राहतो काळ्याशार आभाळात…!

पुढे वाचा

ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ

ज्योतिष : शास्त्र की थोतांड?
“याचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर थोतांड हेच आहे.” ३ जुलै २०२१ ला साम टीव्ही मराठीवर मी चर्चेत सहभागी झालो होतो. वेळेच्या अभावी अनेक मुद्दे मांडायचे राहून गेले. त्यातील काही मुद्दे सविस्तरपणे मांडतो. प्रसारमाध्यमे असोत वा राजकारण, आपल्या देशात तार्किक आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे अगदी तुरळक पर्याय आहेत. ‘आजचा सुधारक’ या विषयांवर विशेषांक प्रकशित करत आहे हे निश्चितच आशादायी आहे.

IGNOU सोबत आणखी ७-८ विद्यापीठे आहेत (जसे की बनारस हिंदू विद्यापीठ, कालिदास संस्कृत विद्यापीठ इत्यादी) जिथे हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. पण तो कलाशाखेत! हे

पुढे वाचा

बालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे

बालकांना आहे भान, समाजाला केव्हा?

“बालमजूर म्हणजे काय आहे हे लोकांना कळतच नाही म्हणून ते आपल्या लहान-लहान मुला-मुलींना आपल्याबरोबर कामाला नेतात. कां नेतात याचे कारण काय आहे हे तरी कुणाला कळतेय का?

यंदा आठव्या वर्गात जाणारी १३ वर्षे वयाची पिपरी (पुनर्वसन) गावाची सुश्री अमिता महाजन त्वेषाने प्रश्न विचारते आणि समाजाला याचे उत्तर देता येणार नाही हे कदाचित माहीत असल्याने स्वतःच उत्तर देते –

“मोठ्या साहेबांच्या ऑफिसमधील सावलीत काम करणाऱ्या शिपायाला दिवसाचे ६०० रुपये रोज मिळतात; त्यात त्याचे घर आरामात चालते आणि त्याच्या मुलांना कधीच मजुरी करावी लागत नाही; … आणि जे मजूर दिवसभर उन्हांत मेहनत करतात, त्यांना फक्त १५० किंवा १०० रुपये रोज मिळतात.

पुढे वाचा

ऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव

सामाजिक समावेशकतेच्या व समतेच्या संदर्भात सार्वजनिक शिक्षणसंस्था बजावत असलेल्या महत्त्वाच्या आणि आदर्श भूमिकेकडे आपण खूप काळापासून दुर्लक्ष केले आहे. भारतासारख्या देशात त्यांची ही भूमिका निर्विवादपणे त्यांच्या शैक्षणिक भूमिकेपेक्षाही महत्त्वाची ठरते.

सध्याच्या ऑनलाइन  शिक्षणाचे खूळ मला उत्तर भारतातील नागरी वसाहतींमध्ये भिंतीवर  आढळणाऱ्या लैंगिक समस्यावरील रामबाण इलाजाच्या गुप्तरोग क्लिनिकच्या जाहिरातींची आठवण करून देते. या जाहिरातीत ‘जालीम उपाय’ या नावाखाली सर्व प्रकारच्या आजारांवर १००%  इलाजाची हमी दिले जाते. आज भारतीय शैक्षणिक वर्तुळात शाळा-महाविद्यालयांत आणि विद्यापीठांत सर्व स्तरांवर प्रत्येक कामात ऑनलाइन शिक्षण म्हणजे एक जादूची कांडी….शर्तिया

पुढे वाचा

मुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा

सॅनिटायझर लावू कुठे-कुठे?

सन्माननीय अधिकारी यांनी अजूनही विचार करावा. शाळा सुरू करण्याचा अट्टाहास करताना होणार्‍या इतर दुष्परिणामांचा शांतपणे विचार करा व माझ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या संकटातून मुक्तपणे जगू द्या.

मुले पेन, पेन्सिल तोंडात घालतात. अंगठा चोखतात. एवढेच काय, कपडेसुद्धा तोंडात घालतात. म्हणून म्हणतो सॅनिटायझर लावू कुठे-कुठे? किती वेळा?

शंभर मुलांत एकच मुतारी. चार पाण्याचे ग्लास. त्याची ओढाओढी.

एकमेकांच्या अंगावर उड्या मारणारी पोरे, आनंदाने एकमेकांना टाळ्या देणारी मुले, एकमेकांच्या कानात बोलणारी, मिळून-मिसळून राहणारी पोरे… पेन्सिल, पेन, वही, पुस्तके, पट्टी, पाण्याचा ग्लास, पाणी बॉटल्स, कंपासपेटी, एक ना अनेक गोष्टींची देवाणघेवाण सातत्याने करत असतात.

पुढे वाचा

तंत्रज्ञानाची कास – प्राजक्ता अतुल

‘कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत’, ‘कोरोना टेस्टिंग किट्सची संख्या गरजेपेक्षा कमी’, ‘ढसाळ सरकारी नियोजन’, ‘राज्यसरकारने उचलली कडक पावले’पासून तर कोरोनाष्टक, कोरोनॉलॉजी, कोविडोस्कोप, कोरोनाचा कहरपर्यंत विविध मथळ्यांखाली अनेक बातम्या आपल्या रोजच्या वाचनात येत आहेत. कोरोनाविषयीच्या वैज्ञानिक माहितीपासून ते महामृत्युंजय पठनापर्यंतच्या अवैज्ञानिक सल्ल्यापर्यंतचे संदेश समाजमाध्यमांतून आपल्यापुढे अक्षरशः आदळले जात आहेत. जादुगाराच्या पोतडीतून निघणार्‍या विस्मयकारी गुपितांसारखी कधी सरकारधार्जिणी, कधी सरकारविरोधी, कधी धोरणांचे कौतुक तर कधी कमतरतांची यादी, कधी वैज्ञानिक पडताळणी तर कधी तांत्रिक-मांत्रिक ह्यांच्या उपाययोजना अशी सगळी जंत्री आपल्यापुढे उलगडली जात आहे. यातून विवेकी विचार नेमकेपणाने उचलणे म्हणजे नीरक्षीर परीक्षाच आहे.

पुढे वाचा