विषय «विवेक विचार»

सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे : उत्तरार्ध (ग्रंथसमीक्षा)

प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात श्री.रसेल ह्यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ ह्या ग्रंथाच्या सारांशाविषयी जे विवेचन केले होते, ते मुख्यतः मांडणीप्रधान असून, ग्रंथाची स्थूलमानाने रूपरेषा देणे, एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. परंतु मांडणी म्हणजे चिकित्सा नव्हे. त्यामुळे, आता आपण खंडणप्रधान विवेचनाकडे वळूया, ज्यायोगे श्री. रसेलांची नेमकी भूमिका वाचकांसमोर येईल, अशी आशा आहे. परंतु जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो, तेव्हा तिला काही मर्यादा घालणे हितकारक ठरत असते. म्हणून या समीक्षेची मर्यादा हीच की यामध्ये आपण प्रस्तुत ग्रंथांतील ‘मालमत्ता’ (Property) या प्रकरणाचीच विशेषतः दखल घेणार आहोत.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ५

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

“राजन्, गेल्या खेपेत, आपल्याला आपल्या कल्पनासाम्राज्यात वास्तवाची किंवा तर्कबुद्धीची बोच कशी नकोशी वाटते आणि सभोवतालचं वास्तव जितकं जास्त कटू/दुस्सह असेल तितकं आपल्याला आपल्या काल्पनिकविश्वाचं आकर्षण कसं जास्त असतं, हे जे तू सांगितलंस ते तर अगदी खरं आहे. करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात तर हा अनुभव नेहमीच येतो. आपल्याकडे बहुसंख्य लोकांना कोणते चित्रपट आवडतात ते बघ. ज्या चित्रपटात निव्वळ कल्पनारंजन असेल, वास्तवाला किंवा तर्काला थारा नसेल, असेच ‘दे मार’ चित्रपट लोकप्रिय होतात.

पुढे वाचा

अंत्यसंस्कार

पुरातत्त्ववेत्त्यांनी शोधलेल्या खूप जुन्या काळातल्या सामुदायिक दफनभूमी पाहता, अग्नीचा शोध लागायच्या आधी सर्व खंडांतील, सर्व प्रकारच्या मानव समुदायांनी मृतदेहांना एखाद्या झाडाखाली, गुहेमध्ये अथवा विवरामध्ये ठेवले असेल. पालापाचोळा आणि फारतर काही फांद्या इत्यादींनी ते मृतदेह झाकले असतील. कारण ‘खोल खोदणे’ हेसुद्धा मानवाच्या त्या आदिम अवस्थेमध्ये, अवजारांच्या अभावी सहज शक्य नसणार. बहुसंख्य ठिकाणी आपापल्या टोळीची जिथे जिथे जागा असेल, त्या जागांवर ते मृतदेह ठेवले जात असतील, कारण बऱ्याच ठिकाणी दगडांच्या मोठ्या वर्तुळात सांगाडे पहावयास मिळाले.

मृतदेहांची विल्हेवाट लावणे हे काम निसर्गाने विविध प्राण्यांना दिलेले आहे.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ४

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

“राजन्, भारतीय तत्त्वज्ञानाच्या षट्दर्शनांतील प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या दोन प्रमुख ज्ञानस्रोतांच्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नसून निव्वळ भ्रम कसा आहे हे तू सिद्ध केलंस. त्यामुळे आता ते मान्य करणं तर भागच आहे. पण असं सिद्ध केल्यानं फलज्योतिषाची लोकप्रियता कमी होईल असं तुला खरोखरंच वाटतं का? “

“खरं सांगू का? फलज्योतिष हे केवळ भ्रामक कल्पनामात्र आहे, हे सिद्ध केल्याने त्याची लोकप्रियता कमी होण्याची सूतरामही शक्यता नाही!”

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ३

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातील षट्दर्शनांच्या प्रत्यक्षप्रमाण ह्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नाही, हे तू गेल्या खेपेत सिद्ध केलंस. परंतु फलज्योतिष हे भविष्याचा वेध घेतं, त्यामुळे आपण ते ‘अनुमान’ ह्या ज्ञानाच्या दुसऱ्या स्रोताच्या कसोटीवर तपासून बघायला नको का?”

“खरं सांगू का, ‘प्रत्यक्षप्रमाण’ ह्या भारतीय तत्त्वज्ञानातील दर्शनांच्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या कसोटीवर जी गोष्ट निव्वळ ‘भ्रम’ आहे हे सिद्ध झाले आहे, त्याविषयी आणखीन काही चर्चा करणे निरर्थक आहे.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग २

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, अरे गेल्या खेपेला तू माझ्यावर एकदम तलवारच उगारलीस, त्यामुळे मी माझं पूर्ण समाधान झालं असं म्हणून तर टाकलं, पण खरं सांगू? माझं अर्धवटच समाधान झालं होतं. त्याविषयीचे आणखीनही बरेच प्रश्न मला छळताहेत.

आता हेच बघ ना, IGNOU, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, आता फलज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचं ऐकतोय. त्यांच्या मते ते एक विज्ञानाधारित शास्त्र आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाचं नेमकं भविष्य सांगणं शक्य आहे तर!

पुढे वाचा

फलज्योतिष कशासाठी? याची मानसशास्त्रीय मीमांसा

एखादी हानिकारक गोष्ट उत्पन्न झाली तरी ती फार वेळ टिकून रहात नाही हे उत्क्रांतीच्या अभ्यासाने आपल्याला दाखवून दिले आहे. मानवी मेंदू हा सध्याच्या स्वरुपात काही लक्ष वर्षे टिकून आहे पण तो अशा अनेक गोष्टी निर्माण करतो ज्या तर्काच्या चाळणीत टिकत नाहीत. तरीही लिखित आणि मौखिक इतिहास असे सांगतो की या क्रिया, सवयी आणि परम्परा हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. जगभर आहेत. कोणताही मानवी समूह – भाषा , धर्म, भौगोलिक जागा याने इतरांपेक्षा वेगळा पडला असला तरीही – या नियमाला अपवाद नाही.

जी गोष्ट हजारो वर्ष टिकून आहे ती काहीतरी उपयोगाची असावी असाही निसर्गनियम आहे.

पुढे वाचा

ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?

प्राचीन काळापासून मानव जिज्ञासेपोटी निसर्गाची गूढं उकलण्याचा प्रयत्न करीत आलाय. त्या-त्या काळात त्याच्या प्रगल्भतेनुसार मनावर विविध प्रकारचे संस्कार होत गेलेत. त्यातूनच मानवानं प्रगतीची वाटचाल केलीय. काही वेळा समजून-उमजून जुन्या काळच्या मागासलेल्या विचारांना, समजुतींना त्यागलंय. तर काही वेळेस कळत असूनही त्याच गलितगात्र, भ्रामक समजुतींना चिकटून राहण्याचा वेडेपणाही तो करत आलाय. मग प्रश्न असा पडतो की, एका बाजूनं एवढा शहाणपणानं प्रगती करणारा माणूस दुसऱ्या बाजूनं एवढा पांगळा का होतो? हे पांगळेपण त्यानं तात्कालिक हितसंबंधांच्या जोपासनेपोटी तर आणलेलं नसतं ना? की मुद्दामहूनच आणलेलं असतं?

पुढे वाचा

ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य

एकेकाळी मी पण ज्योतिषी होतो. पत्रिका वगैरे बघायचो, लोकांना मार्गदर्शन करायचो. एका ज्योतिषी असण्यापासून ते ज्योतिषाचा टीकाकार होणे या बदलाचे श्रेय माझ्या ज्योतिषशास्त्राच्या Empirical परीक्षणाच्या (Empirical testing) प्रयोगांना द्यावे लागेल. मी जसेजसे हे प्रयोग करत गेलो तसेतसे ज्योतिषविद्येविषयीचे माझे मत बदलत गेले आणि आज मी दहा वर्षांच्या संशोधनानंतर, अनेक प्रयोगांच्या आधारे आणि हजारो पत्रिकांच्या विश्लेषणानंतर असं विश्वासाने म्हणू शकतो की ज्योतिष हे विज्ञान नाही आणि शास्त्र म्हणून ते अथवा त्याची तत्त्वेही वैध नाहीत.

जेव्हा ज्योतिषविद्येची सत्यासत्यता तपासून बघण्याचा विषय येतो तेव्हा Double Blind परीक्षा हा सर्वात सोपा पर्याय असतो.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग १

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला, आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. 

“हे राजन्, नेहमी मी तुला गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीच्या आधाराने तुला प्रश्न विचारतो, पण नेहमी मीच का सांगायची गोष्ट तुला? आणि खरंतर इतकी वर्षं तुला गोष्टी सांगून सांगून आता माझा गोष्टींचा स्टॉकही संपला आहे. तेव्हा असं कर की आज तूच मला गोष्ट सांग कसा! मग मी विचारीन त्यावर माझे प्रश्न!”

“असं कसं म्हणतोस तू?” विक्रमादित्य म्हणाला. “तू गोष्ट सांगायची हे तर नियत आहे, विधिलिखित! त्यात आपल्याला बदल कसा करता येईल?”

पुढे वाचा