विषय «विवेक विचार»

विवेकवाद – १९

मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय

प्रकरण १८
सुप्रजननशास्त्र

सुप्रजननशास्त्र म्हणजे एखाद्या जीवजातीचा मुद्दाम हेतुपूर्वक वापरलेल्या जीवशास्त्रीय उपायांनी उत्कर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न. या प्रयत्नाची आधारभूत कल्पना डार्विनवादी आहे, आणि सुप्रजननशास्त्रीय संघटनेचा अध्यक्ष चार्ल्स डार्विनचा पुत्र आहे हे उचितच आहे. परंतु सुप्रजननशास्त्राच्या कल्पनेचा जनक फ्रॅन्सिस गॉल्टन हा होता, गॉल्टनने मानवी संपादतात (achievement) अनुवांशिक घटकांवर विशेष भर दिला होता. आज, विशेषतः अमेरिकेत, अनुवंश (heredity) हा पक्षीय प्रश्न बनला आहे. सनातनी अमेरिकन लोक म्हणतात की प्रौढ मनुष्याचा स्वभाव प्रामुख्याने सहजात गुणांमुळे बनतो; याच्या उलट अमेरिकन आमूलपरिवर्तवाद्यांचे (radicals) म्हणणे असे आहे की शिक्षण सर्व काही आहे, आणि अनुवंश ही गोष्ट शून्यवत् आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – १४

साक्षात्कार, विज्ञान आणि विवेकवाद

प्रा. श्याम कुळकर्णी यांच्या पत्राला उत्तर दिल्यानंतर त्यांची पुन्हा अनेक पत्रे आली आहेत. त्यांपैकी एक याच अंकात अन्यत्र छापले आहे. या पत्रात त्यांनी विवेकवादासंबंधाने मी जे वेळोवेळी लिहिले आहे त्यासंबंधी अनेक आक्षेप घेतले आहेत, आणि काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वास्तविक या प्रश्नांपैकी बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालेत ठिकठिकाणी आली आहेत. ( विशेषतः ‘विवेकवाद – ४: जुलै १९९०, पृ. ११-१६ पहावा.) परंतु त्यांचे पुरेसे आकलन न झाल्यामुळे ते प्रश्न अनुत्तरित आहेत अशी त्यांची समजूत झाली आहे.

पुढे वाचा

रक्षण की राखण ?

मनूचा पुढील श्लोक प्रसिद्ध आहेः
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।।

या श्लोकातील पहिले तीन चरण स्त्रीचे रक्षण करण्याचे काम अनुक्रमे तिचा पिता, तिचा पती आणि तिचा पुत्र यांच्याकडे सोपवितात. हे नैसर्गिक आणि न्याय्यही दिसते. स्त्री पुरुषापेक्षा शारीरिक सामर्थ्याने दुर्बल आहे, आणि तसेच तिच्यावर पुरुषाकडून बलात्कार होऊ शकतो, त्यामुळे तिला पुरुषाच्या मदतीची गरज आहे, असे मानणे रास्त आहे. त्यामुळे पहिल्या तीन चरणांबद्दल आक्षेप घेण्यासारखे काही नाही असे म्हणता येईल. परंतु या विचाराशी चौथ्या चरणातील ‘स्त्री स्वातंत्र्याला पात्र नाही’ हा विचार विसंगत दिसतो.

पुढे वाचा

खरा सुधारक कोण? प्रा. य. दि. फडके ह्यांच्या भाषणाचा सारांश

सुधारक कोणाला म्हणावे हा एक मूलभूत मुद्दा आहे. शंभर वर्षापूर्वीच्या ज्या अनेक प्रश्नांना आजही उत्तर दिले गेलेले नाही त्यापैकी हा एक प्रश्न आहे. १८९३ साली प्रार्थनासमाजात दिलेल्या एका व्याख्यानात न्या.मू. रानड्यांनी “सुधारक कोण?” असा प्रश्न उपस्थित केला होता. लोकांना राजकारणात भाग घेण्याची हौस असते. अशा वाचाळवीरांची सामाजिक सुधारणेच्या वेळी मात्र दातखीळ बसते. राजकारणाच्या वेळी आणलेला ताव पार नाहीसा होतो. त्या काळी केला जाणारा एक सवाल सुधारणाविरोधी आजही करतात. “सगळ्या सुधारणा हिंदू समाजालाच तेवढ्या का?” असा प्रश्न लोक विचारीत. त्यावेळी जे पाच जणांना जमवू शकत नसत असे वक्ते हा प्रश्न करीत.

पुढे वाचा