अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्काराच्या नावाखाली देव-धर्म यांची शिकवण दिली जाते. पालकांना जरी देव-धर्माचे अवडंबर पसंद नसले तरी समाजात वावरताना त्यांच्या मुलां/मुलींची कळत-नकळत देव-धर्माची, पुसटशी का होईना ओळख होते. सण-उत्सव साजरा करत असताना देव-धर्माच्या उदात्तीकरणाला पर्याय नसतो. कुठल्याही गावातील वा शहरातील गल्लीबोळात एक फेरी मारली तरी कुठे ना कुठे देऊळ दिसते. या देवळाच्या गाभाऱ्यातील देवाच्या/देवीच्या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करणाऱ्यांची कधीच कमतरता नसते.
परंतु एकविसाव्या शतकात वावरताना आजच्या पिढीतील विचार करू शकणाऱ्या तरुण/तरुणींच्या मनात देव-धर्म, पूजा-अर्चा, सण-उत्सव, जत्रा-यात्रा इत्यादींच्याबद्दल नक्कीच प्रश्न पडत असतील.