शब्दप्रमाण
धर्मवाद्यांच्या, श्रद्धावाद्यांच्या शस्त्रागारातील एक महत्त्वाचे आयुध म्हणजे शब्दप्रमाण. जगातील सर्व धर्मानी शब्दाचे (म्हणजे विशिष्ट वाक्यांचे किंवा वचनांचे) प्रामाण्य मानले आहे. ख्रिस्ती नोक बायबलातील वचने, मुसलमान कुराणातील वचने, बौद्ध गौतम बुद्धाची वचने पूर्णपणे सत्य आणि अशंकाई मानतात, तसेच हिंदृही वेद, उपनिषदे, आणि विविध स्मृती यांतील वचने पूर्णपणे विश्वसनीय आणि संशयातीत मानतात. शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला हा अधिकार कोठून प्राप्त होतो? अशी काही वचने आहेत हे खरे आहे काय? अशी वचने आहेत हे मी मानले जाते? इत्यादि प्रश्न येथे उपस्थित होतात.
या प्रकारच्या वचनांच्या अधिकाराविषयी प्रत्येक धर्माची स्वतंत्र उपपत्ती आहे.