स. न.
माझ्या, ‘या मार्गानेच जाऊया’ (सुधारक, मे २०२०) या लेखाचा प्रतिवाद करणारे डॉ. शेवडे व अंबुजा साळगावकर यांचे टिपण वाचले.
पारंपरिक आणि पूरक उपचार हे आपोआप जसे उपयुक्त ठरत नाहीत तसे ते निरर्थकही ठरत नाहीत. पण ते उपयुक्त आहेत हा दावा करायचा तर त्याला सबळ पुरावा हवा. जी औषधे/शस्त्रक्रिया शास्त्रीय कसोटीवर उतरतात ती आपोआपच आधुनिक औषधशास्त्राचा भाग बनतात. आयुर्वेदाधारीत रिसरपीन हे औषध, भगेंद्रासाठी सूत्रचिकित्सा किंवा चिनी वनस्पतीचे अरटेमेसुर हे मलेरियासाठीचे औषध अशी काही मूळ ‘देशी’ औषधे आता आधुनिक वैद्यकीचा भाग आहेत.