पुरुष-मुक्तिवादी
स्त्री-मुक्तिवाद्यांचे पुरुषी रूप म्हणजे पुरुष- मुक्तिवादी — असा माणूस ज्याला आयुष्यभर बायकोला पोसण्यासाठी नोकरी करण्यातील अन्याय्यपण उमगले आहे (ज्यामुळे तो मेल्यावर त्याच्या विधवेला आरामात राहता यावे); त्याच्या पत्नीने उपनगरातील घरात स्वतःला डांबून घेणे जितके दमनकारी आहे, तितकेच त्याने न आवडणाऱ्या नोकरीसाठी रोज घर ते । कार्यालय हेलपाटा घालणेही आहे हे जो सांगू शकतो; मूल जन्माला घालणे आणि लहान मुलाना वाढविण्याच्या अत्यंत आनंददायक प्रक्रियेत त्याला सहभागी होण्यापासून रोखण्याचा जो विरोध करतो – असा पुरुष, ज्याला इतर व्यक्ती व त्याच्या भोवतालच्या जगाशी व्यक्ती म्हणून नाते जोडायचे आहे.
विषय «लैंगिकता»
सिमाँ दि बोवा
प्रिय सार्च, मला महिलाप्रश्नाविषयी तुझी मते जाणून घ्यायची आहेत. ते मुख्यतः ह्या कारणासाठी, की तू ह्या विषयावर कधीही मोकळेपणाने बोलला नाहीस. आणि मला विचारायचे आहे, तेही हेच, की तू जर कृष्णवर्णीय, कामगार इत्यादी सर्वच शोषितांबद्दल बोलतोस, तर स्त्रियांबद्दल का नाही ? सार्च – मला वाटते, ह्याचे मूळ कारण माझ्या बालपणात दडलेले आहे. मी महिलांच्याच घोळक्यात लहानाचा मोठा झालो. माझी आई व आजी दोघींनी माझे खूप लाड केले. माझ्या अवतीभवती अनेक लहान मुली असत. त्यामुळे मुली व महिला हेच एका परीने माझे विश होते.
लैंगिक धर्म — व्यक्त आणि अव्यक्त
[सातत्याने घडणारे लैंगिक गुन्हे ही आपल्या समाजातील तीव्र समस्या बनली आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर हे वास्तव अधिकच विदारकपणे आपल्यासमोर आले. त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र गेल्या वर्षांत अशा गुन्ह्यांची वा प्रसारमाध्यमांनी दखल घेतलेल्या गुन्ह्यांची संख्या कमी न होता वाढली आहे. दिल्लीतील पीडित युवतीने अत्यंत धीराने व कणखरपणे त्या प्रसंगाच्या परिणामांना तोंड दिले. ह्याचा आपणा सर्व संवेदनशील स्त्री-पुरुषांना अभिमान आहे. म्हणूनच आपण तिला ‘निर्भया’ म्हटले. परंतु आपण कुणी तिला वाचवू मात्र शकलो नाही. आणखी किती युवतींवर असे अत्याचार होत राहणार आहेत.
नवी लढाई
मानवी दु:खे, मानवी हक्क, आधुनिक विज्ञान, सामाजिक न्याय व नीतिमूल्ये लक्षात घेऊन वेळोवेळी पुरोगामी कायदेकानून बनवावे लागतात.’ आधुनिक पुरोगामी राष्ट्र असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या भारताच्या संविधानाने नागरिकांना बहाल केलेले अधिकारः अनुच्छेद १४ : सर्व नागरिक समान आहेत. अनुच्छेद १५ : नागरिकांध्ये लिंगावरून (अर्थात लिंगभावावरूनही) भेदभाव करता येणार नाही. अनुच्छेद २१ : सर्व भारतीयाना स्वतःचे खाजगी आयुष्य प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे.
मानवी संस्कृतीच्या उत्कर्षात न्याय व नीती हातात हात घेऊन वावरत असतात. अज्ञान व त्यातून उद्भवणारा अन्याय नव्या ज्ञानाच्या आधारे दूर करीत जावे लागते.
स्त्री-द्वेष, बलात्कार आणि औषधविज्ञान
आपण बलात्काराबद्दल बोलतो तेव्हा कशाबद्दल बोलतो? आता आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. १६ डिसेंबर २०१२ नंतर भीतीचे एक राष्ट्रीय शोकनाट्य सादर झाले. स्त्रीद्वेषाचे सहसा दिसणारे परिणाम-भीती, जखमा आणि असुरक्षितता सगळीकडे व्यक्त झाले. विरोधाभास असा की, किंवा कदाचित विरोधाभास नाहीच, की दिल्लीतल्या त्या भयंकर रविवारनंतर जास्त विनयभंग, जास्त बलात्कार आणि जास्त खून घडले. या प्रश्नाच्या उत्तरातून कृती (अॅक्ट) आणि धारणा (अटिट्यूड) यातला फरक शोधण्याचा मी प्रयत्न करतो. या दोन्हीचा काही संबंध आहे का? मला माहीत नाही. पण आपण कृती आणि धारणा समांतर आहेत असे मानतो.
कामव्यवहाराची उत्क्रांती
स्त्री आणि पुरुष जेव्हा जोडीदार निवडतात तेव्हा ते कोणते डावपेच आखतात? स्त्रियांना कोणते पुरुष हवे असतात? पुरुष स्त्रियांना कोणत्या निकषांवर निवडतात? एकत्र राहण्यासाठी आणि वेगळे होण्यासाठी दोघेही विविध क्लृप्त्या कश्या योजतात? स्त्री पुरुष फक्त मित्र म्हणून राहू शकतात काय? अशा बहुविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे शोधणारे एक सुंदर व विचार करायला लावणारे पुस्तक आहे. ‘द इव्होल्यूशन ऑफ डिझायर-स्ट्रॅटजीज ऑफ ह्यूमन मेटिंग’. हे पुस्तक लिहिण्यासाठी पुस्तकाचे लेखक डेव्हिड बस यांना सखोल संशोधन करावे लागले आहे. ते युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये मानसविज्ञानाचे प्राध्यापक आहेत.
आम्ही खंबीर आहोत
अनौरस मुलांचा कैवार घ्यावयाचा म्हणून त्यांना बापाचे नाव लावता येत नाही म्हणून कोणीच ते लावले नाही म्हणजे प्रश्न सुटला असे डॉ. संजीवनी केळकरांना वाटत असावे. मला मात्र वेगळे वाटते. मला त्या निरागस मुलांच्या मातांचा कैवार घेण्याची गरज वाटते. त्यांच्याकडे क्षमाशील दृष्टीने पाहावेसे वाटते. त्यांचे आचरण मला निंद्य वाटत नाही. त्या मातांचे आचरण सध्याच्या तथाकथित उच्चवर्णीयांच्या मूल्यव्यवस्थेच्या विरुद्ध आहे एवढाच त्यांचा अपराध मला वाटतो. मला सध्याची मूल्यव्यवस्था मान्य नाही. ती कायमची नष्ट केली पाहिजे असे विचार अलीकडे माझ्या मनात येत आहेत.
आजची मूल्यव्यवस्था – स्त्रीपुरुषविषयक नीती – ही पुरुषांना झुकते माप देणारी आहे.
लैंगिक स्वातंत्र्य
ह्या अंकामध्ये प्रा. ह. चं. घोंगे यांचा ‘सखीबंधन’ नावाचा लेख प्रकाशित झाला आहे. त्या लेखात मी ज्याचा तात्त्विक पाठपुरावा करतो अशा विषयाचा ऊहापोह त्यांनी केला आहे. स्त्रीपुरुषांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित व्हावेत असे मी पूर्वी प्रतिपादन केले आहे असे श्री. घोंग्यांचे म्हणणे. तसेच ह्या विषयामधले पूर्वसूरी रघुनाथ धोंडो कर्वे ह्यांच्या आणि माझ्या भूमिकांमध्ये काय फरक आहे तो त्यांनी विशद करून मागितला आहे. मला येथे कबूल केले पाहिजे की मी कर्व्यांचे लिखाण फार थोडे वाचले आहे. त्यामुळे अशी तुलनात्मक भूमिका मांडताना माझ्याकडून त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे.
चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ४)
स्त्रीपुरुषसमागमाची किंवा योनीची व पावित्र्याची जी सांगड आमच्या मनामध्ये कायमची घातली गेली आहे ती मोडून काढण्याची, त्यांची फारकत करण्याची गरज मला वाटते, कारण मी पूर्ण समतेचा चाहता आहे. माझ्या मते समता आणि पावित्र्य ह्या दोन्ही एकत्र, एका ठिकाणी नांदू शकत नाहीत. एका वस्तूला कायमची पवित्र म्हटले की दुसरी कोणतीतरी नेहमीसाठी अपवित्र ठरते. म्हणजेच एक श्रेष्ठ आणि दुसरी कनिष्ठ ठरते – आणि समतेच्या तत्त्वाला बाधा येते. समतेच्या तत्त्वाला बाधा असणारे कोणतेही वर्तन त्याज्य आहे ह्या मतावर मी ठाम आहे.
हे जे योनीचे पावित्र्य आहे ते गंगेसारखे किंवा अग्नीसारखे पावित्र्य नाही.
चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ३)
मागच्या लेखांकात प्रा.म.ना. लोही ह्यांच्या सविस्तर पत्राचा मी उल्लेख केला होता. त्यांच्या लेखामधील महत्त्वाचा अंश घेऊन त्यावर मी माझे म्हणणे पुढे मांडणार आहे. मजकडे आलेले लेख किंवा पत्रे ही स्वतंत्रपणे लिहिलेली व वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली असल्यामुळे त्यात कोठे कोठे पुनरुक्ती आहे, तसेच त्यांच्या काही भागांचा संक्षेप करता येण्याजोगा आहे असे वाटल्यावरून त्यांच्या मुद्द्यांचा तेवढा परामर्श घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे हा वादविवाद नाही; मी कोठलाही पवित्रा घेतलेला नाही. म्हणून मला एखादा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही आणि त्यामुळे तो माझ्या विवेचनातून गळला तर तो पुन्हा माझ्या लक्षात आणून द्यावयाला हरकत नाही.