- निवडणुकांमध्ये सत्तेसाठी, आणि त्यानंतर सत्ता टिकविण्यासाठी सत्यनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेचा त्याग करणाऱ्या व्यवस्थांनी समाजाला असहाय अवस्थेत ढकलले आहे. अशा परिस्थितीत विवेकवादी नागरिकांवर सत्याच्या आधारे जनजागृती करून योग्य दिशा दाखविण्याची मोठी जबाबदारी आहे.
महाराष्ट्रातील अलीकडच्या निवडणुकांमध्ये “बटेंगे तो कटेंगे” ही घोषणा, आणि अचानक समोर आलेली “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना, हे दोन निर्णायक मुद्दे ठरले. माध्यमांनी ह्या मुद्द्यांचा गाजावाजा केला, परंतु सखोल आणि विवेचक चर्चा करण्याचे टाळले. परिणामी, ह्या घोषणा/योजनांना जनतेचा भावुक असा मोठा प्रतिसाद मिळाला, आणि दक्षिणपंथी सत्ताधारी पक्षाने प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली.