विषय «माध्यम»

संकोच स्थलकालाचा: आणखी कशाकशाचा?

दूरचित्रवाणी व संगणक–महाजाल प्रणालीने माध्यम व शिक्षण यात काय प्रगती/क्रांती केली त्याची वर्णने नव्याने करण्याची गरज नाही. ती गृहीत धरून, या माध्यमांच्या दुसऱ्या बाजूविषयी व एकंदरच संज्ञापन, ज्ञान, शिक्षण यांबद्दल आपण चिकित्सक व्हावे, त्यासाठी काही मुद्दे:
शिक्षणाच्या दोन अंगांचा माध्यमांच्या दृष्टीने अधिक विचार होणे जरुरीचे आहे : मुलीचे, युवतीचे किंवा विद्यार्थिनीचे आकलन कसे घडत जाते; आपल्या स्वतःचे व बाह्य जगाचे तिचे आकलन (पर्सेप्शन) बनवायची प्रक्रिया ही शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर तिच्यात कोणती मूल्ये ठसवली जातात, अंगभूत होतात हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

पुढे वाचा

मराठी भाषेचे चिंताजनक भवितव्य

आजचा सुधारकच्या जून ९९ (१०.३) ह्या अंकामध्ये माझे ‘मराठी भाषाप्रेमींना अनावृत पत्र’ प्रकाशित झाले. त्यावर बरीच उत्तरे आली. त्यांपैकी काही सप्टेंबर ९९ अंकामध्ये प्रसिद्ध झाली. काहींनी ऑगस्टअखेरपर्यंत उत्तर लिहून पाठवितो असे आश्वासन दिले होते पण ती उत्तरे सप्टेंबरअखेरपर्यंत, अजून, आलेली नाहीत, आणि आता येण्याची शक्यताही नाही, म्हणून ह्या चर्चेचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. शिवाय आता संपादक बदलले असल्यामुळे हा विषय लवकर आटोपता घेतलेला बरा.

हस्ताक्षर चांगले काढावे हा विवादाचा विषय नाही – पण शुद्धलेखन हा विवादाचा विषय झालेला आहे ह्याची कारणे पुष्कळ आहेत.

पुढे वाचा