देवानारचा डोंगर आणि फर्झाना
पुस्तक परिचय
लेखिका – सौम्या रॉय
भाषांतर – छाया दातार
पाने – २३०
किंमत – २९० रुपये
‘देवनारचा डोंगर आणि फर्झाना’ हे एक विलक्षण पुस्तक आहे. ही एक भयकथा आहे, पण ही काल्पनिक नाही, तर वास्तव आहे आणि हे वास्तव जळजळीत आहे.
देवनार हा मुंबईतलाच विभाग आहे. मध्य-मुंबईपासून अगदी जवळ असलेला. पण सुखवस्तू मुंबईकराला देवनार म्हणजे देवनार कत्तलखाना आणि देवनार डम्पिंग ग्राऊंड ह्या दोनच गोष्टींची थोडीफार माहिती असते, आणि ती पण पेपरमध्ये अधूनमधून येणाऱ्या तुरळक बातम्या वाचून.