विषय «नीती»

औषधकंपन्या आणि इलेक्टोरल बाँड्स

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती असलेले प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. प्रभाकर यांनी इलेक्टोरल बाँड्स अर्थात् निवडणूक रोख्यांविषयी भाष्य करताना असे म्हटले आहे की, ‘निवडणूक रोखे हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे आता निवडणूक रोख्यसंबंधीची लढाई ही फक्त सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये सीमित राहिली नसून, आता ही लढाई सरकार आणि जनता यांच्यामधली बनली आहे.’निवडणूक रोख्यांमुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या सर्व देणग्या बँकेमार्फत येतील आणि साहजिकच काळ्या पैशाचा वापर संपेल असा युक्तिवाद केला जात आहे.

पुढे वाचा

आदिवासींचे करायचे काय?

अलीकडे आदिवासी समूह एका प्रश्नाने फारच अस्वस्थ झाला आहे. त्या प्रश्नाने आदिवासींमध्ये उभी फूट पडली आहे. संपूर्ण आदिवासी समूह ढवळून निघाला आहे. ‘हे’ की ‘ते’ अशा दोलायमान स्थितीत तो हेलकावे खात आहे. तो प्रश्न आहे डी-लिस्टिंग. आरएसएस च्या ‘जनजाती सुरक्षा मंच’ ह्या एका फळीने गेले काही वर्षे या मुद्द्याला हळूहळू भुरुभुरु पेटत ठेवले. आज ह्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रूप घेतले आहे. ह्यामुळे आदिवासींच्या जगण्याच्या खऱ्या प्रश्नांची चर्चा परिघावरच राहिली आहे. त्याची चर्चा होऊ नये अशी रणनीती ठरवली गेली आहे. तसेही ‘वनवासी कल्याण आश्रम’च्या माध्यमातून गेले काही दशक आदिवासींमध्ये ‘वनवासी’ असल्याची भावना रुजवण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

पुढे वाचा

भारतीय लोकशाहीपुढील संधी आणि आव्हाने

सर्वांत मोठ्या लोकशाहीपुढील संधी आणि आव्हानेही प्रचंड मोठी आहेत, हे प्रथम मान्य केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या संदर्भात निर्णायक महत्त्वाच्या वाटणाऱ्या खालील दहा स्तंभांचा विचार या लेखात करीत आहे.

१. विधिमंडळ
२. कार्यपालिका
३. न्यायपालिका (कायदा व न्याय)
४. प्रसारमाध्यमे (माहिती व ज्ञान)
५. संघराज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था
६. राजकीय पक्ष आणि व्यवस्था
७. सोशल मीडिया
८. मानवी हक्क (समानता, समावेशन व प्रतिनिधित्व)
९. स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज (सरकारबरोबर काम तसेच स्वातंत्र्य, न्याय आणि लोकांच्या कल्याणासाठी समर्थन आणि संघर्ष)
१०.

पुढे वाचा

मैं और मेरी नास्तिकता

मैँ बहुत आभारी हूं कि आप लोगों ने मुझे यहां, इस जलसे में बुलाया. यहां आकर मुझे बहुत खुशी है कि इतने अंधेरे में भी लोग दीये जलाये हुए हैं.  और गम इस बात का है कि २१वीं सदी में नास्तिकता पर चर्चा हो रही है. एक ऐसा विषय जिसका फैसला १८वीं सदी में ही हो जाना चाहिए था. सच्ची बात तो यह है कि नास्तिकता तो ऐसी होनी चाहिए थी, जैसे ऑक्सीजन. हम सांस लेते हैं, तो सोचते थोड़े हैं कि हम सांस में ऑक्सीजन ले रहे हैं.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता : आळं की आळा

नोव्हेंबर २०२२ च्या शेवटी जन्म झालेल्या चॅटजीपीटीने कृत्रिमप्रज्ञेच्या जगतात खळबळ उडवली. चॅटजीपीटीची महती हा हा म्हणता बहुतांश सांख्यीक-साक्षर जगतात पोचली आणि उलट-सुलट चर्चांना ऊत आला. चॅटजीपीटी हा तुमच्यासोबतच्या चर्चेतून तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे देणारा तुमचा सखा आहे(१). लार्ज लॅंग्वेज मॉडेलवर (LLM) आधारित असल्याने निबंध लिहिणे, कविता करणे, ज्या ज्या विषयांची माहिती उपलब्ध आहे त्या विषयांवर संभाषण करणे यात तो तरबेज आहे. OpenAI च्या या प्रारूपापाठोपाठ बाजारात अनेक प्रारूपे आली. आधी आकाराने गलेलठ्ठ असलेली ही प्रारूपे फाईन-ट्युनिंगद्वारे हळूहळू रोड होताहेत.

पुढे वाचा

तंत्रज्ञान आणि नीतिमूल्य

कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि त्यावर आधारित ChatGPT सारख्या अनेक प्रभावशाली प्रणालींचा गेल्या एक-दोन वर्षांतच माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात जोरदार प्रवेश झाला आहे. अशा प्रकारच्या साधनांमुळे व्यवसायक्षेत्रात मोठे बदल होतील. कृत्रिमप्रज्ञेच्या वापरतून जर मानवी बुद्धिमत्तेचा वापर कमी झाला तर त्याचे अनेक फायदे आहेत – त्यातून खर्च कमी होईल, चुका कमी होतील, दिवसातले २४ तासही काम करता येईल आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल. म्हणजे उद्योगधंद्यांचा आणि देशाचा फायदा. आज प्रत्येक मोठ्या कंपनीतून कृत्रिमप्रज्ञेचा वापर चालू झाला आहे. पण कृत्रिमप्रज्ञेमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील ही भीती आहे. 

पुढे वाचा

तुका म्हणे सोपी केली पायवाट ….

विलियम झिन्सरचे पुस्तक Writing to Learn (१९८८) मध्ये ते म्हणतात, “विचारांचा आणि शिकण्याचा परिपाक म्हणजे लिहिणे नव्हे; तर विचार करणे हेच लिहिणे”. लिहिण्याची कृती आपली समजूत अधिक प्रगत करत जाते असेही ते पुढे म्हणतात. असे म्हणणारे किंवा लिहिणारे झिन्सर एकटेच नाहीत. आईनस्टाईननंतरचे सर्वांत महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे, नोबल पारितोषिकाचे मानकरी, पुरोगामी विचारांचे भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईन्मन ह्यांनी केलेल्या काही नोंदी वाचून त्यांचा एक सहकारी म्हणाला, “तुझ्या लिखाणातून तुझे विचार खूप चांगल्या रीतीने प्रगट झाले आहेत.” यावर त्याला खोडत रिचर्ड फाईन्मन त्वरित उद्गारले, “लिखाण माझ्या विचारांचे प्रगटीकरण नाही, माझे विचार हेच माझे लिहिणे होय.

पुढे वाचा

नैनान् विसंगतयः छिन्दति कुंभोजकर

पुणे येथे १८ डिसेंबर २०२२ ला ‘ब्राईट्स सोसायटी’तर्फे आयोजित नास्तिक परिषदेच्या निमित्ताने हरिहर कुंभोजकर यांनी लिहिलेल्या लेखावर मी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया म्हणून लेख लिहिल्याबद्दल कुंभोजकरांचे आभार. मी कुंभोजकरांचे किंवा कुंभोजकर माझे मतपरिवर्तन करू शकतील अशी फारशी आशा माझ्या मनात नाही. त्यामुळे, ‘आजचा सुधारक’च्या वाचकांचे मतपरिवर्तन करणे (किंवा, जे आधीच आपल्या विचारांशी अनुकूल आहेत त्यांचे मत प्रतिपक्षाकडे वळण्यापासून वाचवणे) हाच आम्हा दोघांच्या प्रयासांचा मुख्य उद्देश असू शकतो, तो खासगी चर्चेने साध्य होणारा नाही.

प्रसिद्धीसाठी आलेल्या लेखांवर प्रकाशनपूर्व प्रतिक्रिया मिळवून ती लेखासोबतच छापणे हे ‘आजचा सुधारक’मध्ये नवे नाही.

पुढे वाचा

श्री. जोशींना दिसलेल्या विसंगतींचे पोस्ट-मॉर्टम

निखिल जोशी ह्यांनी माझ्या लेखाची इतकी सविस्तर दखल घेतली याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांचे उत्तर माझ्या लेखाबरोबरच प्रसिद्ध झाले याचा अर्थ माझा लेख प्रसिद्धीपूर्वीच त्यांना उपलब्ध झाला होता हे उघड आहे. लेखाच्या शेवटी माझा फोन नंबर आणि ई-मेल ID असल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर अधिक सविस्तर चर्चा होऊ शकली असती. त्यांच्या लेखाचे स्वरूपही काहीसे वेगळे झाले असते. कदाचित, त्यानंतर त्यांना आपले उत्तर लिहिण्याची आवश्यकताही भासली नसती. माझेही काही श्रम वाचले असते. पण झाले ते एका अर्थाने फार चांगले झाले.

पुढे वाचा

बाबा लगीन आणि नास्तिक्य – हरिहर कुंभोजकर ह्यांच्या लेखावरील प्रतिक्रिया

भारतात लग्न करण्यासाठी पुरुषांनी (अपवाद वगळता) किमान २१ वर्षांचे असणे गरजेचे आहे. २१ व्या वाढदिवशी मध्यरात्रीची घंटा वाजते आणि पुरुषांना लग्न करण्याचा अधिकार मिळतो. अर्थातच, २० वर्षे ३६४ दिवस एवढे वय असताना ते जेवढे ‘सज्ञान’ किंवा ‘प्रौढ’ असतात त्यापेक्षा २१ वर्षे वय झाल्यावर फार काही जास्त सज्ञान किंवा प्रौढ होतात असे काहीही नाही. तरीही कायदेशीर उपबंधाने असे ठरवून दिल्यामुळे आपल्याला ते मान्य करावे लागते. सज्ञानता किंवा प्रौढत्व हे कायद्याने ठरवण्याचे मुद्दे आहेत असे मला वाटत नाही. त्या संकल्पनांचा विचार केला असता पुढील काही बाबी महत्त्वाच्या ठरतात.

पुढे वाचा