नास्तिकांच्या परिषदेत सगळ्यांना नमस्कार केला तर चालतो का? बरं मला लँग्वेज ऑफ इंस्ट्र्क्शन काय आहे? नाही, म्हणजे सगळे बहुतांश कोण आहेत? मराठी चालेल ना? Ok. तसेही, महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय गोष्टी वस्तुतः पुणे, लोणावळा, ठाणे, कल्याण, डोंबिवली याच लेव्हलला असतात त्यामुळे मराठीच बोलावं लागतं. मी फार वेळ घेत नाही कारण वस्तुतः शेड्यूलनुसार आता लंचटाईम होणं अपेक्षित होतं. त्यामुळे मी जास्तीत जास्त पंधरा मिनिटं घेईन. आणि त्यानंतर आपण परब्रह्माच्या आराधनेसाठी बाहेर जाऊ. तर मी विचारपीठावरील-नास्तिक परिषदेमध्ये व्यासपीठ म्हणायचे नसते, विचारपीठ म्हणायचे असते. विचारपीठावरील सगळे मान्यवर, आणि पुरस्कारार्थी, त्यामध्ये अलकासुद्धा आहे.
विषय «नास्तिक्य»
प्रसन्न जोशी ह्यांच्या सूचनांबद्दल आयोजकांची मते व खुलासे
१. पारलौकिक संदर्भ असलेल्या ‘शुभेच्छा’, ‘दुर्दैव’, इ. शब्दांच्या आणि रूढींच्या सयुक्तिकतेविषयी जोशी यांनी विनोद केले. परंतु, गांभीर्याने पाहिले तर अनेक शब्दांचे आणि रूढींचे अर्थ कालौघात बदललेले आहेत. समाजावर पारलौकिक धारणांचा पगडा होता तेव्हा भाषेत आणि संस्कृतीत त्यांचे प्रतिबिंब दिसणारच. पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती ‘पुत्’-नरकातून वाचवणारा अशी आहे. Mundane या शब्दाचा मूळ अर्थ ‘ऐहिक’ असा आहे. नास्तिक या शब्दाचा मूळ अर्थही ‘वेदप्रामाण्य न मानणारे’ असा आहे. हे शब्द आता वेगळ्या अर्थाने वापरले जातात. मूळ अर्थ टाळणे पूर्णपणे शक्य किंवा आवश्यक आहे का याविषयी आम्हाला खात्री नाही आणि ऐहिकतेसाठी भाषाशुद्धी हा विषय आमच्या प्राधान्यक्रमातही नाही.
प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांचे भाषण
माझ्यावर मुख्य दोन जबाबदाऱ्या आहेत. एक म्हणजे आभार मानायचे. पण मी सुरुवातीला आजच्या सत्राबद्दल बोलणार आहे. शिवाय संघटनेला कशाची गरज आहे आणि तुम्ही त्यासाठी काय करू शकता, हेही सांगणार आहे.
तर आजचं सत्र मी खरोखर एन्जॉय केलं. मला वाटलं नव्हतं की या बाजूने एन्जॉय करणं मला कधी जमेल! पण खाली बसून एन्जॉय करण्यासारखंच हे सत्र होतं. प्रत्येक वक्ता खूपच इंटरेस्टिंग बोलला असं मला वाटलं. इथं मुख्यतः, मला फार चांगलं वाटलं की प्रसन्न इथे आलेत आणि त्यांनी एक वेगळी बाजू मांडली. आपल्याकडे कसं असतं, एक कुणी संशयवादी असतो.
विश्वंभर चौधरी ह्यांचे भाषण
मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यात आधी मी माझे मित्र कुमार नागे आणि ब्राइट्सच्या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो. मी नास्तिक नसूनही त्यांनी मला आमंत्रण दिलं. हा सहिष्णुतेचा भाग आहे आणि ती तुमच्यात आहे त्याबाबत मला आनंद वाटला. आजकाल ‘माझी कोणती ओळख’ हे माझं मलाच कळत नाही. विचारधारांचा इतका गुंता झालेला आहे तरी, मी असं समजतो की मी काही भक्तांपैकी नाही. आणि मी असेही समजतो की त्यातल्यात्यात मला जवळची वैचारिक परंपरा रानडे, गोखले, गांधी, विनोबांची वाटते, वैचारिकदृष्ट्या! आणि ते जेवढे धार्मिक आहेत तेवढा मी धार्मिक आहे असेही मी मानतो.
विश्वंभर चौधरी ह्यांच्या भाषणावरील खुलासा
विश्वंभर चौधरी यांनी ब्राइट्सच्या नास्तिक परिषदेत आपल्या भाषणाची सुरुवात “तुम्हाला जगण्याचा सांवैधानिक हक्क आहे, पण देशाच्या प्राचीन संस्कृतीला घेऊन चालावे लागेल” असे सांगून केली. उजवे लोक मुस्लिम लोकांना देतात तेवढी जगण्याची मुभा विश्वंभर यांनी आम्हा नास्तिक लोकांना दिली. अर्थातच, “हिंदुस्थान मे रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा”. पण आपल्या खांद्यावर मृत इतिहासाचे ओझे वाहत आपण पुरोगामी कसे होणार?
चौधरी यांनी सुरुवातीलाच हे नमूद केले की politically correct असण्यासाठी धर्म गरजेचा असतो. पूर्ण भाषण politically correct पद्धतीने केल्यावर शेवटी मानाचा तुरा म्हणजे त्यांचे स्वतःला गांधी आणि आंबेडकर या दोघांचे अनुयायी आहे हे सांगणे.
विचार तर कराल?
१८ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यामध्ये ‘ब्राइट्स’ संस्थेतर्फे नास्तिक परिषद घेण्यात आली होती. नास्तिकता ही वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार जगण्याचा एक आयाम आहे याबद्दल दुमत नसले तरी ते आस्तिकांच्या पचनी पडणे कठीण असते. म्हणूनच काही आस्तिकांना नास्तिकांबद्दल घृणा, राग, द्वेष वगैरे वगैरे असतो. पण याची कारणे वैयक्तिक आहेत का? तर नाही. आस्तिकांना नास्तिकांबद्दल वाटणाऱ्या रागाचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे नास्तिकांकडून होणारी धर्माची चिकित्सा आणि धर्माच्या उन्मादाविरोधातील त्यांची भूमिका. म्हणूनच ‘देवा-धर्माची चिकित्सा करू नये, त्याबद्दल प्रश्न निर्माण करू नये’, अशी शिकवण असणाऱ्या आस्तिकांना नास्तिकांचा राग येणे स्वाभाविक आहे.
विचार तर कराल
डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा आणि माझा परिचय साधारणपणे १९९४-९५ च्या दरम्यान झाला. आम्ही सारे त्यांना डॉ. दाभोलकर वा नुसते डॉक्टर म्हणत असू पण त्यांच्या पुस्तकांवर दाभोलकर असे लिहिले जाते. त्यावेळी वास्तुशास्त्रावर दादरला एक सभा होती. एक वास्तुशास्त्रावर बोलणारे वकील, एक प्रतिवाद करणारे आर्किटेक्ट, दाभोलकर आणि अध्यक्ष एक निवृत्त न्यायमूर्ती अशी ती सभा होती. दाभोलकरांचे भाषण विनोदी आणि वास्तुशास्त्राची खिल्ली उडवणारे होते. मुद्दे इतके बिनतोड होते की प्रतिवाद करण्याची संधी मिळूनही वकील महाशयांना फारसे काही बोलता आले नाही.
ह्याच दरम्यान माझा ‘आजचा सुधारक’शी परिचय झाला.
आस्तिक/नास्तिक
नास्तिकांचे दोन प्रकार असतात. एक म्हणतात ईश्वर नाही. ते सरळ बोलत असतात. दुसरे बिरबलाप्रमाणे वक्रोक्तीने बोलतात. बिरबल म्हणतो की बादशहाचा पोपट खात नाही, पीत नाही, बोलत नाही, श्वास घेत नाही, चोच वासून उलटा पडला आहे. पण तो स्पष्टपणे “पोपट मेला आहे’ असे म्हणणार नाही. तसेच काही नास्तिक “ईश्वर निराकार, निर्गुण, निर्विकार, इंद्रियगम्य नसलेला, व सर्वव्यापी – म्हणजे खास कोठेही आहे सांगता येणार नाही असा आहे असे म्हणतात. ते स्वतःला आस्तिक म्हणवून घेतात; पण खरे म्हणजे तेईश्वर नाही हेच विधान वेगळ्या शब्दात करत असतात.
परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद (उत्तरार्ध)
(७) विवेकनिष्ठेचा सांभाळ
पण हा विषय एवढ्यावरच सोडून द्यावा असे मला वाटत नाही. विवेकनिष्ठा मला प्रिय आहे आणि राष्ट्रवादही. म्हणून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एक उपाय सुचतो तो सांगतो.
विवेकनिष्ठा आदर्श समाजाचा आधार म्हणून इष्ट तर आहेच, पण एकूण विचार करता राष्ट्रवादालाही पोषक आहे. कारण राष्ट्रवादाला संघटनेच्या आड येणारे समाजाचे दोषही दूर करायचे असतात. हे दोष परंपरेतून, इतिहासातून निर्माण झालेले असतात. त्यांची नीट चिकित्सा झाली पाहिजे; कारण चिकित्सा झाल्याशिवाय त्यांच्यावर उपाययोजना करता येत नाही. पण आवाहनात्मक, स्फूर्तिकारक मांडणी करताना गटाच्या दौर्बल्यांचे विश्लेषण करणे टाळले जाते आणि त्याची उभारणी निरोगी पायावर होत नाही.
धर्म आणि विवेकवाद -प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर
आजचा सुधारकच्या जुलै आणि चालू अंकात डॉ. स.ह. देशपांडे यांचा ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा उत्तरार्ध (या अंकात प्रसिद्ध झालेला) पूर्णपणे मला उद्देशून लिहिला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ईश्वर ही कल्पना मानवी मनातून सर्वस्वी काढून टाकणे शक्य दिसत नाही. मी या प्रश्नाशी नीट भिडत नाही. माझी उत्तरे मूळ मुद्दा सोडून असतात. मनुष्य जगात एकटा असून त्याला आधाराला ईश्वर लागतो या मुद्याचा प्रतिवाद मी केला तरी तो उपयुक्त होईल. एरव्ही ईश्वर आणि धर्म यांच्या समाजजीवनावरील प्रभावाचा मी पुरेसा विचार करीत नाही असा आरोप मला पत्करावा लागेल.