विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“राजन्, अरे गेल्या खेपेला तू माझ्यावर एकदम तलवारच उगारलीस, त्यामुळे मी माझं पूर्ण समाधान झालं असं म्हणून तर टाकलं, पण खरं सांगू? माझं अर्धवटच समाधान झालं होतं. त्याविषयीचे आणखीनही बरेच प्रश्न मला छळताहेत.
आता हेच बघ ना, IGNOU, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, आता फलज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचं ऐकतोय. त्यांच्या मते ते एक विज्ञानाधारित शास्त्र आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाचं नेमकं भविष्य सांगणं शक्य आहे तर!