शेवटी शेतकरी कशासाठी शेती करतात? काय मिळवायचे असते त्यांना? त्यांची सर्व शक्ती उत्पादनापेक्षा अनिश्चिततेच्या दडपणाखालीच खर्च होते. बऱ्याचवेळा त्याला माहीत असते की पेरण्या करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. पण तो तरी दुसरे काय करू शकतो? संपूर्ण दिवाळखोरीत जाइस्तोवर शेतकरी पेरीतच राहणार.
आजची अर्थव्यवस्था अगदी भिन्न-भिन्न नैसर्गिक परिस्थितीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांत जीवघेणी चढाओढ लावते. आणि खरोखरच शेतकरी घायाळ होतात, मरतातही.
श्रीमंत आणि गरीब यांना आहार-उष्मांक (food calories) सारखेच लागतात. अन्नधान्याच्या पुरवठ्यात म्हणून फारशी लवचीकता असत नाही. शेतकऱ्यांना सातत्याने उत्पादन वाढवायला म्हणून वावच नसतो, लिोकसंख्यावाढ सोडू५ पीक खलास होणे आणि अमाप येणे त्याच्यासाठी आपत्तीच ठरतात.