गेले अनेक दिवस राज्यातील एस.टी. कामगारांचा संप सुरू आहे. विलीनीकरण व्हावे म्हणून हा संप सुरू आहे. एस.टी. सरकारची आहे. विलीनीकरण सरकारमध्ये हवे आहे. म्हणजे एस.टी. कामगारांना आपण सरकारचा भाग आहोत असे वाटत नाही. त्यांना तसे वाटावे ही सरकारची जबाबदारी आहे. कामगारांना तसे का वाटत नाही? याचे उत्तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाले. विलीनीकरण करता येणार नाही असे तीन सदस्यीय समितीने सांगितले. मंत्री त्याच्यापुढे गेले आणि एस.टी.चे खाजगीकरण करू या म्हणू लागले. आपण सरकारी नाही असे कामगारांना का वाटते याचे उत्तर मिळाले. एस.टी.चे खाजगीकरण आधीच सुरू झाले आहे असे सांगितले गेले.
विषय «उपरोध»
बहुमूल्यी विश्व
“इंडिया विरुद्ध भारत हा झगडा नवा नाही. कित्येक वर्षांपासून तो सुरू आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण, आहे-रे विरुद्ध नाही-रे, संधी असणारे विरुद्ध संधी नसणारे, उच्चवर्गीय/वर्णीय विरुद्ध इतर असा सगळा हा झगडा आहे. वेगवेगळ्या जाती, समूह, त्यांचे प्रयोजन, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची गरज, त्यांतील तरल किंवा स्पष्ट भेद या सगळ्यांविषयी आपल्याला बोलावे लागणार आहे.”
‘आजचा सुधारक’च्या अंकाची ही थीम हातात पडली त्यावेळी नुकतेच २०२१ चे अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाचे सूप वाजले होते नि त्यामुळे अध्यक्षीय भाषणाचा हॅंगओव्हर होता. म्हटलं, त्यावर लिहू का? आणि संपादकांनी “हो, तोही महत्त्वाचा विषय आहेच” असा प्रतिसाद दिला. मात्र लिहायला घेतल्यावर अंकाची थीम डोक्यात घोळायला लागली नि मनातल्या त्या विचाराची हीच बाजू जास्त प्रकर्षाने दिसायला लागली. अर्थात
विक्रम आणि वेताळ – भाग ७
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“हां, तर कुठे होतो आपण राजन्?”
“तू त्या झाडाच्या फांदीवर उलटा लोम्बकळत होतास; मी तिकडून, काट्याकुटयांनी भरलेल्या पायवाटेने येऊन तुला फांदीवरून कसंबसं उतरवून खांद्यावर घेतलं आणि आता स्मशानाच्या दिशेने निघालो आहे.”
“तसं नाही रे बाबा, मी म्हणत होतो की गेल्या खेपेस, दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपण कुठवर आलो होतो?”
“ओह्ह…. विसरला असशील तर बरंच आहे.”
तीन कविता
१. तुला डॉलच बनून रहायचे असेल तर
तुला डॉलच बनून रहायचे असेल तर
पाठवत राहा शुभेच्छा
महिला दिनाच्या..
बस कुरवाळत
तुझ्या सहनशीलतेच्या दागिन्याला
तसेच, आयुष्यभर पुन्हा
सहन करण्यासाठी…
करत रहा अभिमान
तुझ्या स्वत्वाच्या त्यागाचा
दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नाला
गुलाबी रंगाचा डोहात
बुडवून मारण्यासाठी …
भरत रहा ऊर
‘कशी तारेवरची कसरत करते’
हे ऐकून
तुझ्या मनावर कोरलेल्या
भूमिकेला न्याय देत
घराचा ‘तोल’ तुझ्या मूकपणाच्या
पायावर सांभाळण्यासाठी…
टाकत राहा
मनगटात बांगड्यांचे थर
नेसत राहा
नवरात्रीच्या नऊ साड्या
करत रहा
मेंदूला गहाण ठेवणारे उपवास
भरत रहा
टिकल्यांचा ठिपका
तुझ्या प्रशस्त कपाळाच्या
स्वातंत्र्याच्या चंद्रावर
ग्रहणासारखा
तुला डॉलच बनून राहायचे असेल तर….
मराठी साहित्य सम्मेलनाचा अखिल भारतीय तमाशा
आपले तथाकथित अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलन परंपरेप्रमाणे आपला घरंदाज घाटीपणा सिद्ध करून गेले. माय मराठी, माझा मऱ्हाटीची बोलू कवतुके, लाभले भाग्य आम्हा, मराठी माणूस, अणूरेणू या तोकडा, मराठी वर्ष, मराठी अस्मिता….. अशा नानाविध अस्मितादर्शी पताका आम्ही रोवल्या आहेत. हे आम्ही पांघरलेलं वाघाचं कातडं, साहित्यसम्मेलनात आपोआप गळून पडतं. साहित्यसम्मेलन आलं की गर्दी जमवण्यासाठी आम्हाला कुणी चिंटू भगत, जावेदभाऊ अख्तर यांच्या रूपाने वाघ बाहेरून आणावा लागतो. आणि आम्ही सारे बनगरवाडीतील मेंढरं म्हणून आपले घरंदाज घाटीपण खालच्या मानेनं सिद्ध करतो.
सम्मेलन जाहीर झाले की बहुजन विरुद्ध ब्राह्मण हा आधीच बेतलेला/pre-cooked वाद सुरू करून आम्ही माय मराठीच्या अस्मितेवर थुंकायला सुरुवात करून आमच्या घरंदाज घाटी ॲटिट्यूडची दिवाळी साजरी करायला सुरुवात करतो.
अर्थात! तुमचे बोट तुमच्याच डोळ्यात…!
नागरीकरणाच्या प्रक्रियेत माणूस कधीतरी टोळी करून राहू लागला. त्याची अवस्था जरी रानटी असली तरी शेतीच्या शोधाने काही प्रमाणात का होईना त्याच्या जगण्याला स्थिरता लाभली. संवादाच्या गरजेतून भाषा निपजली. व्यक्तिंच्या एकत्रीकरणातून समाज निर्माण झाला. पुढे कधीतरी ‘राष्ट्र’, ‘देश’ ह्या संज्ञा रूढ झाल्या. अनाकलनीय घटकांच्या भीतीतून वा नैतिक शिकवणुकीसाठी धर्म समोर आला. धर्म मानवाला तथाकथित नीती शिकवू लागला. ह्या धर्माला प्रचलित रूप देण्यात व समाजावर हा धर्म थोपवण्यात एका विशिष्ट समूहाचे वर्चस्व दिसून येते.
विक्रम आणि वेताळ – भाग ६
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“राजन्, गेल्या खेपेत तू आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधताना आपल्या स्वभावामुळे येणाऱ्या अडचणींविषयी बोललास.
त्यातील पहिली: वैचारिक आणि शारीरिक शक्ती खर्च करण्याची आपली अनिच्छा; आणि त्यातून येणारी सोयीस्कर अनुकरणप्रियता.
दुसरी: अनुक्रमाने घडलेल्या कोणत्याही दोन यादृच्छिक (random) घटनांत काल्पनिक/अतार्किक कार्यकारण संबंध जोडण्याची आपली सवय.
तिसरी: आपल्या विचारात असणारी तर्कदोषाची शक्यता.
चवथी: बुवाबाजीतून, बाबावाक्य प्रमाण मानण्याच्या आपल्या सवयीमुळे, आपली फसवणूक होण्याची शक्यता.
बर्बादीचा माहामार्ग
{प्रस्तुत फोटो हे आभासी तथा इंन्स्टाग्राम/गुगलवरून घेतलेले नसून आमच्या शेत-शिवारातले जिवंत फोटो आहेत.}
स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही…
वावरात हातभर लांबीच्या बंडीभर काकड्या,
नारळाएवढाले सीताफळं निरानाम सडू घातलेले.
पान्यामुळं बाबडलेला मुंग, वांझोटा भुईमुंग,
काळंवडलेल्या तीळाची मती गुंग
घरी आनाचं कसं एकाएकी गर्भपात झालेलं सुयाबीन ?
वावराजौळचे असे दूरदूर चिखलप्रेस समृद्ध हायवे
ऐन हंगामावर अभाळाले हैजा झालेला
रस्त्यानं आपलाच जीव आपल्याले भारी
कुठून इथं जल्म घेतला इच्यामारी !
खालून चिक्कट चिखलगाळ
अन् वरतून ओरबाडणाऱ्या चिल्हाट्या-बोराट्या!
चालता चालताच जातेत सरनावर तुऱ्हाट्या.
बैलबंड्या फसतेत,
वाटसरू घसरून मोडतेत
कोनाचा हेंगडते पाय
कुठं नुसतीच रुतून बसते पान्हावली गाय
अवंदा दुरूस्तीसाठी कास्तकारांजवळ नाई दमडं
ज्याच्याजौळ लुगडं, थेच पडलं उघडं !!
विक्रम आणि वेताळ – भाग ५
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
“राजन्, गेल्या खेपेत, आपल्याला आपल्या कल्पनासाम्राज्यात वास्तवाची किंवा तर्कबुद्धीची बोच कशी नकोशी वाटते आणि सभोवतालचं वास्तव जितकं जास्त कटू/दुस्सह असेल तितकं आपल्याला आपल्या काल्पनिकविश्वाचं आकर्षण कसं जास्त असतं, हे जे तू सांगितलंस ते तर अगदी खरं आहे. करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात तर हा अनुभव नेहमीच येतो. आपल्याकडे बहुसंख्य लोकांना कोणते चित्रपट आवडतात ते बघ. ज्या चित्रपटात निव्वळ कल्पनारंजन असेल, वास्तवाला किंवा तर्काला थारा नसेल, असेच ‘दे मार’ चित्रपट लोकप्रिय होतात.
विक्रम आणि वेताळ – भाग ४
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
“राजन्, भारतीय तत्त्वज्ञानाच्या षट्दर्शनांतील प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या दोन प्रमुख ज्ञानस्रोतांच्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नसून निव्वळ भ्रम कसा आहे हे तू सिद्ध केलंस. त्यामुळे आता ते मान्य करणं तर भागच आहे. पण असं सिद्ध केल्यानं फलज्योतिषाची लोकप्रियता कमी होईल असं तुला खरोखरंच वाटतं का? “
“खरं सांगू का? फलज्योतिष हे केवळ भ्रामक कल्पनामात्र आहे, हे सिद्ध केल्याने त्याची लोकप्रियता कमी होण्याची सूतरामही शक्यता नाही!”