राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांनी अलिकडेच केलेले ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नये‘ असे विधान चर्चेत आले आहे. सरसंघचालकांच्या या विधानाचे स्वागत झाले आहे. या विधानामुळे देशातील धार्मिक वाद तूर्तास शमतील असे अनेकांना वाटत आहे. एकप्रकारे देशातील धार्मिक स्थळे जशी आहेत तशी राहावीत या ‘राव सरकार’च्या काळातील कायद्याची ही पाठराखण आहे असे वाटू शकते. संघ बदलला, असेही अनेकांना वाटू शकते. व्यक्तिशः मला तसे वाटले नाही म्हणून हा लेखनप्रपंच!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची भाषणे एरवीही सुरू असतात. संघातील प्रचलित भाषेत त्याला ‘बौद्धिक’ असे म्हणतात.