स्नेह.
नवीन कृषी कायदे मागे घेताना “आम्ही खुल्या अंतःकरणाने शेतकऱ्यांना समजावत राहिलो. पण आमच्याच प्रयत्नात काही कसर राहिली. देशवासियांची आम्ही माफी मागतो.” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. आजवर याच कायद्यांचे गुणगान गाणारे आणि दहशतवादी, माओवादी, सोंग घेतलेले गुंड, एवढेच नव्हे, तर अराजकतावाद्यांचे गिनिपिग्ज अशा वेगवेगळ्या शब्दांत आंदोलनकर्त्यांचा उपमर्द करणारे भारतीय जनता पक्षाचे सदस्य पंतप्रधानांच्या या कथनानंतर वेगळ्याच भूमिकेत शिरले. उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी नवीन कृषी कायदे मागे घेतले असल्याची विरोधकांची सुरू असणारी ओरड दाबण्यासाठी आता “शेतकरी याच देशाचा नागरिक आहे आणि भारताचा प्रत्येक नागरिक आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.” अशी पुस्ती ते जोडू लागले.
पक्षांतर्गत परस्परविरोधी अशा या विधानांमुळे राजकारणात नेतृत्वाचा आणि त्यांच्या निर्णयाचा पाया नेमका कोणत्या तथ्यांवर आधारित असतो याविषयी मनात संभ्रमच उमटतो. मग