तुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. माणसाचे आचार-विचार, आरोग्य, बुद्धिमत्ता, स्वभाव, शारीरिक क्षमता, सारे आहारावरच अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त होणे हे आहाराच्याच आधीन आहेत. योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी राहील. आणि कितीही औषधे घेतली पण पथ्य केले नाही तर त्या औषधांचा उपयोग नीट होणार नाही.
कोणताही रोग एका रात्रीत उपटत नाही त्याच्या मुळाशी बऱ्याच वेळपर्यंत होत राहिलेली अन्नघटकांची कमतरता असते. आहार योग्य असेल तर आजारपण येणारच नाही असे नाही, परंतु त्याचे प्रमाण व तीव्रता कमी राहील.