तुरुंग, गुन्हेगारी, वचक, सामाजिक मानसशास्त्र
तुरुंगरक्षकांमध्ये असलेले क्रूरपणा व आक्रमकता हे गुण ‘स्वाभाविक’ असतात की परिस्थितिजन्य ह्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रयोगाचीही कहाणी. प्रयोगासोबातच प्रयोगकार्त्यांचे मानस उलगडून दाखवणारी व आपल्या आसपास असणाऱ्या काही प्रश्नाची उत्तरे सुचविणारी..
१७ ऑगस्ट १९७१ च्या सकाळी, कॅलिफोर्नियामधील पालो अल्टो परिसरात नऊ तरुणांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकसत्र चालवलं. त्या तरुणांवर कलम २११ आणि ४५९ (सशस्त्र दरोडा आणि घरफोडी) यांच्या उल्लंघनाचा आरोप ठेवण्यात आला होता. रीतसर झडती, बेड्या वगैरे सोपस्कार उरकून त्यांना वाजत गाजत (सायरनच्या आवाजात) पालो अल्टो पोलीस ठाण्यात नेण्यात आले.